Home /News /mumbai /

मुंब्य्रात इमारत कोसळून 1 ठार

मुंब्य्रात इमारत कोसळून 1 ठार

21 सप्टेंबर : ठाण्यातल्या मुंब्रामध्ये पुन्हा एकदा एक मृत्यूचा सापळा कोसळला. जीवनबाग परिसरात आज सकाळी एक पाच मजली इमारत कोसळलीय. या दुर्घटनेत एक ठार तर तीन जण जखमी झालेत. ढिगारा उपसण्याचं काम सुरु आहे. अजूनही काही जण अडकल्याची भीती आहे. मुंब्रामधल्या धोकादायक इमारती बाबत सरकारला वारंवार सुचना करुनही त्याची दखल घेतली नाही. ही इमारत कोसळताना एका व्यक्तीने मोबाईल फोनमध्ये ही घटना शूट केलीय.अंगावर काटा आणणारी ही दृश्यं आहे. पत्त्याच्या बंगल्यासारखी काही क्षणातच ही इमारत जमीन दोस्त झाली. दरम्यान,या अपघाताची सर्व जबाबदारी राज्य सरकारची आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली. तर किती बळी गेल्यावर सरकारला जाग येईल असा सवाल शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंनी विचारलाय. विशेष म्हणजे याच भागात लंकी कम्पाऊंडमध्ये एक इमारत कोसळली होती. या दुर्घटनेत 74 जणांचा मृत्यू झाला होता.
First published:

Tags: Thane building collapse, ठाणे, मुंब्रा

पुढील बातम्या