Home /News /money /

Zomato चे शेअर मोठ्या घसरणीनंतर 9 टक्के वाढले, तज्ज्ञांच्या मते आता गुंतवणूक करावी का?

Zomato चे शेअर मोठ्या घसरणीनंतर 9 टक्के वाढले, तज्ज्ञांच्या मते आता गुंतवणूक करावी का?

Zomato कंपनीचे शेअर्स दुपारी 2 वाजेच्या सुमारास 8.98 टक्क्यांनी वाढून 99.40 रुपयांवर ट्रेड करत होते. अशा स्थितीत झोमॅटोच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करावी की नाही याबाबत विश्लेषकांची वेगवेगळी मते आहेत.

    मुंबई, 25 जानेवारी : फूड डिलिव्हरी कंपनी Zomato चे शेअर्स त्यांच्या टॉपवरून 46 टक्क्यांपर्यंत घसरले आहेत. मात्र, आज सकाळी मोठ्या घसरणीनंतर झोमॅटोच्या शेअर्समध्ये करेक्शन झालं आहे. दुपारी 2 वाजेच्या सुमारास कंपनीचे शेअर्स 8.98 टक्क्यांनी वाढून 99.40 रुपयांवर ट्रेड करत होते. अशा स्थितीत झोमॅटोच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करावी की नाही याबाबत विश्लेषकांची वेगवेगळी मते आहेत. ET च्या मते, कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजचा असा विश्वास आहे की सध्याची घसरण ही गुंतवणूकीची चांगली संधी आहे. ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे की गेल्या दोन ट्रेडिंग सत्रांमध्ये कंपनीच्या शेअर्समध्ये 27 टक्क्यांची घसरण झाली आहे. ग्लोबल कंपन्यांच्या घसरणीचा हा परिणाम आहे. कंपनीच्या फंडामेंटल्समध्ये कोणताही बदल झालेला नाही. Mutual Fund SIP : दरमाह 1000 रुपये वाचवा आणि बना कोट्यधीश, छोट्या गुंतवणुकीत कमाईची संधी आकडेवारीनुसार, DoorDash सारख्या फूड डिलिव्हरी कंपन्यांचे शेअर्स यावर्षी आतापर्यंत 25 टक्क्यांनी घसरले आहेत. Delevery Hero चे शेअर्स आतापर्यंत 30.3 टक्के घसरले आहेत तर Deliveroo चे शेअर्स या कालावधीत 24.1 टक्क्यांपर्यंत घसरले आहेत. कोटकचे मत आहे की भारतीय फूड डिस्ट्रिब्युश पूर्णपणे झोमॅटो आणि स्विगी या दोन कंपन्यांवर केंद्रित आहे. 2021 च्या पहिल्या सहामाहीत स्विगीचे फूड डिलिव्हरी ग्रॉस मर्चेंडाईज व्हॅल्यू (GMV) 98.40 कोटी डॉलर इतके होते. त्याच वेळी, या कालावधीत झोमॅटोची GMV 1.05 अब्ज डॉलर झाली आहे. क्रेडिट कार्ड बिल वेळेत भरताय तरी खराब होतोय Credit Score; लोनसाठी होतेय अडचण, वाचा सविस्तर जेपी मॉर्गन देखील झोमॅटोच्या शेअर्सवर बुलिश आहे. ब्रोकरेज हाऊसचे म्हणणे आहे की शेअर्सच्या घसरणीचे कारण मायक्रो घटक आहेत. जागतिक बाजारपेठेत नव्या युगातील टेक कंपन्यांच्या शेअर्सच्या घसरणीचा परिणाम झोमॅटोच्या शेअर्सवर झाला आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Investment, Share market, Zomato

    पुढील बातम्या