मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Zomato IPO : रोख रक्कम उभी करण्यासाठी तातडीने आणावा लागला IPO; झोमॅटोच्या सीईओंची माहिती

Zomato IPO : रोख रक्कम उभी करण्यासाठी तातडीने आणावा लागला IPO; झोमॅटोच्या सीईओंची माहिती

Zomato कडे पुढील सहा महिन्यांच्या गरजा पूर्ण करता येतील फक्त एवढीच रोख रक्कम उरली होती. त्यामुळे कंपनीसाठी IPO आणणे हा एकमेव पर्याय होता.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 27 ऑक्टोबर : फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोचा (Food Delivery Company ZOMATO) आयपीओ काही महिन्यांपूर्वी लिस्ट झाला. झोमॅटो IPO च्या यशानंतर, अनेक इंटरनेट कंपन्या सार्वजनिक ऑफरद्वारे निधी उभारण्यासाठी रांगेत आहेत. मात्र, झोमॅटोचे सह-संस्थापक आणि सीईओ, दिपिंदर गोयल (ZOmato CEO Dipinder Goel) म्हणतात की, कंपनीला मोठ्या रोकड तुटवड्यामुळे निधी उभारण्यासाठी आयपीओ आणावा लागला.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत लॉकडाऊनचा (Lockdown Effect) झोमॅटोच्या बिझनेसवर मोठा परिणाम झाला. यासोबतच थेट विदेशी गुंतवणुकीशी (Foreign Direct Investment) संबंधित नियम बदलल्याने अँट फायनान्शियल (ant financial) सारख्या चिनी गुंतवणूकदारांकडून निधी न मिळाल्याने कंपनीला फटका बसला.

JSL Share : जिंदाल स्टेनलेसमध्ये गेल्या 6 महिन्यात 140 टक्के नफा, अजूनही कमाईची संधी

झोमॅटोकडे पुढील सहा महिन्यांच्या गरजा पूर्ण करता येतील फक्त एवढीच रोख रक्कम उरली होती. त्यामुळे कंपनीसाठी IPO आणणे हा एकमेव पर्याय होता, असं गोयल यांनी सांगितलं. पुढे ते म्हणाले की, कोरोनाच्या पहिल्या लाटेत कंपनीचा व्यवसाय 90 टक्क्यांनी कमी झाला होता. एफडीआय नियम बदलल्यामुळे कंपनीचे गुंतवणूकदार अँट फायनान्शिअलकडून निधीही येत नव्हता.

Gold Price: दिवाळीपर्यंत 50000 रुपयांवर पोहोचणार सोन्याचे दर, आता खरेदी कराल तर 8 दिवसांत किती मिळेल नफा?

कंपनीने फंडासाठी अनेक गुंतवणूकदारांशी बोलणी केली पण ती यशस्वी झाली नाही. कंपनीला 50 कोटी डॉलर्सची तातडीची गरज होती आणि त्यासाठी कमी वॅल्युएशनवरही IPO आणण्यासाठी आम्ही तयार होतो. झोमॅटोसमोर पब्लिक ऑफर आणण्याच्या मार्गात अनेक अडथळे आले. मात्र, मार्केट रेग्युलेटर सेबीकडून बरीच मदत झाली आणि त्यामुळे आयपीओ सुरू झाला, असं दिपिंदर गोयल यांनी सांगितलं.

First published:

Tags: Money, Share market, Zomato