• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • Zomato ची खास ऑफर, पंतप्रधानांचं नाव सांगा आणि...

Zomato ची खास ऑफर, पंतप्रधानांचं नाव सांगा आणि...

ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफाॅर्म झोमॅटोनं (zomato ) जनतेसाठी एक बक्षीस ठेवलंय. ग्राहकांना फक्त एक भविष्यवाणी करायची आहे.

 • Share this:
  मुंबई, 21 मे : लोकसभा निवडणुकीचे निकाल 23मे रोजी लागतील. त्याआधी आलेल्या एक्झिट पोलमध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार येईल, हे स्पष्ट झालंय. विरोधी पक्षही अनेकविध शक्यता पडताळून पाहायला लागलेत. दरम्यान, ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफाॅर्म झोमॅटोनं (zomato ) जनतेसाठी एक बक्षीस ठेवलंय. ग्राहकांना फक्त एक भविष्यवाणी करायची आहे. सत्ता मोदींचीच, पण शेअर बाजाराला येणार नाहीत 'अच्छे दिन' झोमॅटोनं सांगितलंय की ग्राहकांनी 23 मे रोजी होणाऱ्या मतमोजणी आधी देशाचे पुढचे पंतप्रधान कोण होणार ते सांगायचं आणि फूड ऑर्डर करायची. पंतप्रधानांचं नाव अचूक आलं तर ग्राहकांना कॅशबॅक मिळणार, असं कंपनीनं सांगितलंय. कंपनीनं याआधी झोमॅटो प्रीमियर लीगच्या माध्यमातून IPLमध्ये विजेत्या टीमबद्दल अचूक अंदाज वर्तवणाऱ्या ग्राहकांना कॅशबॅक दिला होता. दरम्यान,  @iN3IL नावाच्या एका ट्विटर हँडलं झोमॅटोच्या या ऑफरबद्दल आनंद व्यक्त केला. काँग्रेसला मोठा झटका, 'या' नेत्याने उचलला नाही पवारांचा फोन! प्रत्येक  ऑर्डरवर 40 टक्के डिस्काउंट कंपनीनं सांगितलं की प्रत्येक ऑर्डरवर ग्राहकांना 40 टक्के डिस्काउंट मिळेल. त्यांची भविष्यवाणी खरी ठरली तर त्यांना 30 टक्के कॅशबॅक मिळेल. 22मेपर्यंत कुणीही या आॅफरचा फायदा घेऊ शकतात. कंपनीनं सांगितलं की जसं पंतप्रधानांचं नाव घोषित होईल तसे ग्राहकांच्या वाॅलेटमध्ये पैसे येतील. कंपनीनं सांगितलं की आतापर्यंत 250 शहरांमधून 3 लाख 20 हजार लोकांनी या ऑफरमध्ये भाग घेतलाय. 106 कर्णधार तोडू शकले नाहीत 'दादा'चा विक्रम, विराटला संधी! झोमॅटोचं मुख्य ऑफिस आहे गुरगावला. 200 शहरांमध्ये झोमॅटोची सेवा आहे. एक लाखापेक्षा जास्त रेस्टाॅरंट्स झोमॅटोवर लिस्टेड आहेत. मार्च 2019मध्ये 30 मिलियन डिलिव्हरीज झाल्यात. झोमॅटोचे मुख्य अधिकारी दीपिंदर गोयल म्हणाले, झोमॅटोची टेबल रिझर्वेशनचीही सुविधा आहे. ही सेवा भारतासह 8 देशांत आहे. 16000 रेस्टाॅरंटपैकी तुम्ही तुम्हाला हव्या असलेल्या रेस्टाॅरंटमध्ये झोमॅटोवरून टेबल बुक करू शकता. VIDEO: ...अन् रिक्षाचं पुढचं चाक उचललं, चालकाची तारांबळ
  First published: