Home /News /money /

Zomato चे शेअर्स पडल्यानंतरही CEO म्हणाले- 'मी या घसरणीची वाट पाहत होतो'

Zomato चे शेअर्स पडल्यानंतरही CEO म्हणाले- 'मी या घसरणीची वाट पाहत होतो'

ऑनलाइन फूड डिलिव्हरी फर्म झोमॅटो (Zomato Share Price) कंपनीच्या शेअरमध्ये सोमवारी (24 जानेवारी 22) मोठी घसरण झाली असतानाच प्रतिस्पर्धी कंपनी स्विगीला चांगले फडिंग मिळाले

मुंबई, 25 जानेवारी: ऑनलाइन फूड डिलिव्हरी फर्म झोमॅटो (Zomato Share Price) कंपनीच्या शेअरमध्ये सोमवारी (24 जानेवारी 22) मोठी घसरण झाली असतानाच प्रतिस्पर्धी कंपनी स्विगीला चांगले फडिंग मिळाले. त्याचवेळी, झोमॅटो कंपनीचे शेअर खाली आले त्यानंतर झोमॅटोचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दीपिंदर गोयल (Deepinder Goyal) म्हणाले की, 'आमच्या नियंत्रणात असलेली एकमेव गोष्ट म्हणजे अंमलबजावणी. कंपनीचे व्हॅल्युएशन वर जाते की खाली जाते, यावर आमचे नियंत्रण नसते.' कर्मचाऱ्यांना दिला धीर झोमॅटोचा स्टॉक मोठ्या प्रमाणात विक्री झाल्यानंतर कंपनीचे मार्केट कॅप 9.78 अब्ज डॉलरवर घसरल्यानंतर कर्मचाऱ्यांना धीर देताना गोयल म्हणाले, 'मी बऱ्याच काळापासून अशा कमकुवत मार्केटची वाट पाहत होतो. जेव्हा प्रत्येकासाठी फडिंग संपते, आणि सर्वात सॉलिड टीम आणि अंमलबजावणी असलेल्या कंपन्या टॉपवर येतात, तेव्हा असं होतं. नेहमीप्रमाणे स्टॉकच्या किंमतीकडे पाहू नका. चला काम करू, व्हॅल्यु क्रिएट करू, खर्च कमी करू.' हे वाचा-या 3 बँकांचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी, लवकरच बदलणार हे नियम स्विगीने 70 करोड डॉलर उभारले विशेष म्हणजे, ज्या दिवशी फूड आणि ग्रोसरी डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगीने 10.7 अब्ज डॉलरच्या व्हॅल्युसह 70 करोड डॉलर उभारल्याची घोषणा केली, त्या दिवशी हे घडले. जुलै 2021 मध्ये झालेल्या शेवटच्या फडिंग राऊंडमध्ये स्विगीने 5.5 अब्ज डॉलर व्हॅल्युएशनसोबतच सॉफ्टबँक व्हिजन फंड 2, प्रोसस, एक्सेल आणि वेलिंग्टनमधून 1.25 अब्ज डॉलर उभे केले. या गुंतवणुकीसह, बेंगळुरूची स्विगी ही देशातील चौथी डेकाकॉर्न बनली आहे, म्हणजेच 10 अब्ज डॉलर्स किंवा त्याहून अधिक व्हॅल्यु असलेली खासगी कंपनी बनली आहे. याआधी फिनटेक कंपनी पेटीएम, हॉटेल अग्रीगेटर ओयो आणि एड-टेक कंपनी बायजूज डेकाकॉर्न बनली आहे. हे वाचा-घरबसल्या महिन्याला कमवा 60 हजार रुपये, जाणून घ्या SBI ची नवी योजना आयपीओपेक्षा अजूनही व्हॅल्युएशन जास्त आहे कर्मचार्‍यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये गोयल यांनी म्हटले आहे की, '10 अब्ज डॉलर असतानाही, कंपनीचे मार्केट कॅप त्याच्या 8 अब्ज डॉलर आयपीओ व्हॅल्युएशनपेक्षा जास्त आहे. जागतिक आणि देशांतर्गत रोखे उत्पन्नात वाढ झाल्याने झोमॅटो तसेच पेटीएम आणि पॉलिसी बाझारसारख्या इंटरनेट कंपन्यांमध्ये विक्री सुरू झाली. 'शेअर बाजार आणि सार्वजनिक कंपन्यांमध्येही असेच आहे की, व्यवसायाच्या मूलभूत गोष्टींमध्ये कोणताही बदल न करता महागाई, व्याजदर इत्यादींसारख्या व्यापक आर्थिक घटकांमुळे व्हॅल्युएशन लक्षणीय बदलू शकतं,' असंही त्यांनी पत्रात लिहिलं आहे. 'आयपीओच्या शिखरावर कंपनीचे व्हॅल्युएशन 8 अब्ज डॉलर ते 17 अब्ज डॉलरपर्यंत जाणं आणि नंतर खाली येण्यावर आमचे कोणतेही नियंत्रण नव्हते,' असंही त्यांनी स्पष्ट केलं. बाजारातील परिस्थिती सुधारली की कंपनीची शेअर बाजारातील स्थितीही सुधारेल अशी अपेक्षा सगळ्यांनाच आहे. बघूया काय होतंय.
First published:

Tags: Zomato

पुढील बातम्या