मराठी बातम्या /बातम्या /मनी /

नापास झालेल्या या तरुणाला जेवताना सुचली कल्पना आणि उभी राहिली 25000 कोटींची कंपनी

नापास झालेल्या या तरुणाला जेवताना सुचली कल्पना आणि उभी राहिली 25000 कोटींची कंपनी

मोबाईलवरच्या Application च्या माध्यमातून घरबसल्या जेवण मागवण्याचा पर्याय देणारी कंपनी Zomato बद्दल तुम्ही ऐकलंच असेल. शाळेत दोन वेळा नापास झालेल्या तरुणाला जेवता जेवता एक कल्पना सुचली आणि त्यातून ही कंपनी सुरू झाली.

  • Published by:  Arundhati Ranade Joshi
मुंबई : मोबाईलवरच्या Application च्या माध्यमातून घरबसल्या जेवण मागवण्याचा पर्याय देणारी कंपनी Zomato बद्दल तुम्ही ऐकलंच असेल. गेल्या महिन्यापासून झोमॅटो विविध कारणांनी सतत चर्चेत आहे. अॅक्टिव्ह युजर्सची संख्या कोट्यवधीत असलेली ही कंपनी सुरू कशी झाली याची गोष्ट रंजक आहे. 11 वर्षांत 25000 कोटींची उलाढाल असलेली कंपनी सुरू करणारे Zomato चे प्रवर्तक दीपिंदर गोयल तरुणपणी अभ्यासात फार विद्यार्थी नव्हते. शाळेत असताना तर दीपिंदर दोन वेळा नापासही झाला होता. झोमॅटोची कल्पना तर जेवता जेवता... खरं तर जेवण ऑर्डर करण्यासाठी लाईनमध्ये उभे असताना या कल्पनेचा जन्म झाला आणि देशातली सगळ्यात यशस्वी मोबाईल अॅप कंपनी अस्तित्वात आली. एकदा लंचसाठी आपल्या सहकाऱ्यांबरोबर कॅफेटेरियात फक्त मेन्यू पाहण्यासाठी लाईन लागली होती. हे फार वाईट असल्याची जाणीव दीपिंदरला त्याच वेळी झाला. यातच कर्मचाऱ्यांचा कितीतरी वेळ जातो हे लक्षात आल्यावर दीपिंदरने आपल्या वेबसाईटवर या कॅफेचं मेन्यूकार्ड स्कॅन करून टाकलं. आपल्या मित्रांचा वेळ वाचवण्यासाठी अशी मेन्यूकार्ड स्कॅनिंग करून अपलोड करण्याची पद्धत सुरू केली. त्याला खूप प्रतिसाद मिळाला. वेबसाईटवर या मेन्यूकार्डसाठी हिट्सवर हिट्स मिळायला लागले. यातूनच फूड पोर्टलचा जन्म झाला. मग मोबाईल अॅप अस्तित्वात आलं. सुरुवातीला वेबसाईट आणि मग मोबाईल अॅप झोमॅटो नावाने सुरू झालं. हे वाचा - काय आहे Soft tissue sarcoma ज्याच्याशी अरुण जेटलींची झुंज अपयशी ठरली? पंजाबमध्ये जन्मलेल्या दीपिंदर गोयल यांचे आई-वडील शिक्षक होते. तरीही सहावी आणि अकरावीत दीपिंदर नापास झाला. त्यानंतर मात्र अभ्यासाकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आणि पहिल्याच प्रयत्नात IIT ची एंट्रन्स एक्झॅम क्रॅक केली. दीपिंदरला दिल्लीच्या आयआयटीमध्ये प्रवेळ मिळाला.  2006 मध्ये IIT Delhi मधून उत्तीर्ण होऊन बाहेर पडल्यानंतर एका मॅनेजमेंट कन्सल्टिंग कंपनीत नोकरी केली. त्याच वेळी स्टार्टअपची कल्पना डोक्यात सुरू होती.पहिला स्टार्टअप फार यशस्वी झाला नाही. हे वाचा - खूशखबर : शेअर बाजार, म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांना दिलासा 2007 नंतर दीपिंदर यांनी आपला आयआयटीमधला मित्र पंकज चड्ढासमवेत फूड पोर्टल सुरू केलं. रेस्टॉरंटमधून मेन्यू उचलून तो स्कॅन करून रेस्टॉरंटच्या नंबरसह अपलोड करायचं काम सुरू केलं. त्यातूनच आजच्या झोमॅटोचा डोलारा उभा राहिला. VIDEO: ट्रॅफिक पोलिसांनी पावती फाडताच तरुणाने पेटवली बाईक
First published:

Tags: Startup, Zomato

पुढील बातम्या