मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Zeptoचे को-फाउंडर कैवल्य वोहरा देशातील सर्वांत तरुण श्रीमंत व्यक्ती, वयाच्या 19 व्या वर्षी तब्बल 1,000 कोटींचे मालक

Zeptoचे को-फाउंडर कैवल्य वोहरा देशातील सर्वांत तरुण श्रीमंत व्यक्ती, वयाच्या 19 व्या वर्षी तब्बल 1,000 कोटींचे मालक

मागच्या एका वर्षात त्याच्या व्हॅल्युएशनमध्ये 50 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. याचा थेट फायदा कैवल्य वोहरा यांना झाला आहे.

मागच्या एका वर्षात त्याच्या व्हॅल्युएशनमध्ये 50 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. याचा थेट फायदा कैवल्य वोहरा यांना झाला आहे.

मागच्या एका वर्षात त्याच्या व्हॅल्युएशनमध्ये 50 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. याचा थेट फायदा कैवल्य वोहरा यांना झाला आहे.

    नवी दिल्ली : या जगात काही लोक त्यांच्या मेहनतीमुळे आणि जिद्दीमुळे लहान वयातच मोठी उंची गाठतात. असंच एक लहान वयातील व्यक्तिमत्व म्हणजे झेप्टोचे संस्थापक कैवल्य वोहरा आहेत. क्विक-कॉमर्स कंपनी झेप्टोचे (Zepto) को-फाउंडर म्हणजेच सह-संस्थापक कैवल्य वोहरा (Kaivalya Vohra) देशातील सर्वात श्रीमंत टीनएजर बनले आहेत. भारतातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींची IIFL वेल्थ हुरून 2022 ही (IIFL Wealth Hurun list) यादी जाहीर झाली आहे. कैवल्य वोहरा यांनी या वर्षी पहिल्यांदाच या यादीत स्थान मिळवलं आहे. वोहरांव्यतिरिक्त, फिजिक्सवालाचे (PhysicsWallah) को-फाउंडर अलख पांडे (Alakh Pandey) यांच्यासह इतर अनेक स्टार्ट-अप फाउंडर्सदेखील पहिल्यांदाच या यादीत सामील झाले आहेत. कैवल्य वोहरांचं वय केवळ 19 वर्षं कैवल्य वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी देशातील सर्वात श्रीमंत भारतीय तरुण बनले आहेत, हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल. तसंच, ते देशातील पहिले टीनएजर आहेत, ज्यांच्याकडे 1,000 कोटींहून अधिक रुपयांची संपत्ती आहे. IIFL वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट 2022 नुसार, कैवल्य वोहरा यांनी 2020 मध्ये आदित पलीचाबरोबर (Aadit Palicha) मिळून झेप्टोची स्थापना केली. मागच्या एका वर्षात त्याच्या व्हॅल्युएशनमध्ये 50 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. याचा थेट फायदा कैवल्य वोहरा यांना झाला आहे. वोहरांव्यतिरिक्त त्यांचा पार्टनर 20 वर्षीय आदित पालीचानेदेखील या यादीत स्थान मिळवलं आहे. 10 वर्षांपूर्वी 'रिच लिस्ट'मध्ये देशातील सर्वांत तरुण श्रीमंत व्यक्तीचं वय 37 वर्ष होतं, असंही या अहवालात म्हटलं आहे. फिजिक्सवालाचे को-फाउंडर अलख पांडे यांनीही या यादीत स्थान मिळवलं आहे. युनिकॉर्न कंपनी फिजिक्सवालाचे को-फाउंडर अलख पांडे (30 वर्षे) आणि प्रतीक माहेश्वरी (Prateek Maheshwari) यांनीही या यादीत पहिल्यांदाच स्थान मिळवलं आहे. अहवालानुसार, पांडे आणि माहेश्वरी या दोघांकडे 4,000 कोटी रुपयांची वैयक्तिक संपत्ती आहे आणि सर्वांत श्रीमंत 1,103 व्यक्तींच्या यादीत ते 399 व्या क्रमांकावर आहेत. फिजिक्सवाला ही एक एडटेक कंपनी आहे जी अलख आणि माहेश्वरी यांनी कोरोना महामारीच्या काळात स्थापन केली होती. कंपनीने जूनमध्ये पहिल्यांदाच 100 मिलियन डॉलरचा फंडिंग राउंड पूर्ण केला होता आणि या कालावधीत तिचं व्हॅल्युएशन 1.1 अब्ज डॉलर इतकं झालं होतं. 2021 च्या तुलनेत 62 टक्क्यांनी झाली वाढ IIFL वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट 2022 ने एक निरीक्षण नोंदवलं आहे. त्यानुसार, 1,000 कोटी किंवा त्याहून अधिक वैयक्तिक संपत्ती असलेल्या भारतीयांची संख्या 2022 मध्ये पहिल्यांदाच 1,100 पेक्षा जास्त झाली आहे. 2021 च्या तुलनेत यंदा ही संख्या 96ने वाढली आहे. गेल्या पाच वर्षांत ही संख्या तब्बल 62 टक्क्यांनी वाढली आहे. नायकाच्या फाल्गुनी नायरने किरण मुझुमदार-शॉ यांना टाकलं मागे नायकाच्या (Nykaa) फाल्गुनी नायर आणि वेदांत फॅशन्सचे (Vedant Fashions) रवी मोदीदेखील पहिल्यांदाच या यादीत सामील झाले आहेत, ज्यांच्या कंपन्या नुकत्याच शेअर बाजारात लिस्ट झाल्या आहेत. फाल्गुनी नायरने भारतातील सर्वांत श्रीमंत सेल्फ-मेड महिला म्हणून प्रसिद्ध असलेल्या बायोकॉनच्या किरण मुझुमदार-शॉ यांना मागे टाकून यादीत स्थान मिळवलं आहे. गौतम अदानी अव्वलस्थानी अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी (Gautam Adani) यांनी भारतातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींच्या IIFL वेल्थ हुरून 2022 च्या यादीत अव्वल स्थान पटकावलं आहे. त्याचबरोबर या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे (RIL) चेअरमन मुकेश अंबानी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. यादीनुसार, गौतम अदानी हे 10.94 लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.
    First published:

    Tags: Business, Business News

    पुढील बातम्या