Home /News /money /

तरुणांना 4000 रुपये देणाऱ्या 'या' सरकारी योजनेबाबत तुम्हालाही मेसेज आला का? नोंदणी करण्याआधी बातमी वाचा

तरुणांना 4000 रुपये देणाऱ्या 'या' सरकारी योजनेबाबत तुम्हालाही मेसेज आला का? नोंदणी करण्याआधी बातमी वाचा

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या मेसेजमध्ये असा दावा केला जात आहे की, या योजनेत देशभरातील तरुण 4 रुपयांचा फायदा घेऊ शकतात.

    मुंबई, 13 जून : केंद्र सरकारने (Central Government) प्रधानमंत्री रामबाण सुरक्षा योजना सुरू केली असून या योजनेत केंद्र सरकार देशातील सर्व तरुणांना 4,000 रुपये देत आहे, असा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल (Viral Massage) होत आहे. या मेसेजसोबत एक लिंकही शेअर केली जात आहे, ज्याद्वारे नोंदणी (Government Scheme Registration) केली जात आहे आणि त्यानंतरच लाभ मिळणार असल्याचा दावा केला जात आहे. तुम्हालाही गेल्या काही दिवसांत असा काही मेसेज आला असेल, तर तुम्ही या मेसेजमधील सत्य जाणून घ्या. सोशल मीडियावर (Social MEdia) व्हायरल झालेल्या मेसेजमध्ये असा दावा केला जात आहे की, या योजनेत देशभरातील तरुण 4 रुपयांचा फायदा घेऊ शकतात. यासाठी युवकांना व्हायरल मेसेजमध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन नोंदणी करावी लागणार आहे. त्यानंतरच तरुणांच्या खात्यावर 4 हजार रुपये जमा होतील. जनसत्ताने याबाबतचं वृत्त प्रसारित केलं आहे. मेसेज खरा की खोटा? PIB ने सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या प्रधानमंत्री रामबाण योजनेची चौकशी केली असता, सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा मेसेज खोटा असल्याचे आढळून आले. पीआयबीने आपल्या ट्विटर हँडलवर एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, प्रधानमंत्री रामबाण योजनेबाबतचा हा दावा पूर्णपणे खोटा आहे. PIB फॅक्ट चेक अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या दिशाभूल करणाऱ्या पोस्टची चौकशी करते. ज्यानंतर पीआयबी फॅक्ट चेक लोकांना अशा बनावट मेसेजबद्दल त्याच्या ट्विटर हँडल आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे सतर्क करते. लोकांनी अशा कोणत्याही फसव्या जाहिरातींवर नोंदणी केल्याने तुमची वैयक्तिक माहिती सायबर गुन्हेगारांपर्यंत पोहोचते आणि सायबर गुन्हेगार या वैयक्तिक माहितीचा फायदा घेऊन बँकिंग फसवणुकीसह इतर सायबर गुन्हे करतात.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Central government, Money, Photo viral

    पुढील बातम्या