मराठी बातम्या /बातम्या /मनी /''तरुणांनी आपली विचारसरणी बदला आणि स्वयंरोजगार करा,'', केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान खात्याचे मंत्री जितेंद्र सिंह यांचं आवाहन

''तरुणांनी आपली विचारसरणी बदला आणि स्वयंरोजगार करा,'', केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान खात्याचे मंत्री जितेंद्र सिंह यांचं आवाहन

जम्मूतील इंडियन इन्स्टिट्युट ऑफ इंटिग्रेटिव्ह मेडिसीनमध्ये ( Indian Institute of Integrative Medicine IIIM) एक दिवसाच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचं मंगळवारी जितेंद्र सिंह यांच्या हस्ते उदघाटन झालं त्यावेळी ते बोलत होते.

जम्मूतील इंडियन इन्स्टिट्युट ऑफ इंटिग्रेटिव्ह मेडिसीनमध्ये ( Indian Institute of Integrative Medicine IIIM) एक दिवसाच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचं मंगळवारी जितेंद्र सिंह यांच्या हस्ते उदघाटन झालं त्यावेळी ते बोलत होते.

जम्मूतील इंडियन इन्स्टिट्युट ऑफ इंटिग्रेटिव्ह मेडिसीनमध्ये ( Indian Institute of Integrative Medicine IIIM) एक दिवसाच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचं मंगळवारी जितेंद्र सिंह यांच्या हस्ते उदघाटन झालं त्यावेळी ते बोलत होते.

नवी दिल्ली, 19 ऑगस्ट: ‘आपल्या भारतात तरुण सामान्यपणे एखादी छोटी-मोठी नोकरी मिळावी यासाठी प्रयत्नशील असतात. पण सद्यस्थितीत स्टार्टअप सुरू करून अनेक तरुण सरकारी नोकरीपेक्षा (Government job) जास्त कमाई करत आहेत. नोकरीत मिळणाऱ्या किरकोळ पगाराच्या तुलनेत ही कमाई कितीतरी पटीने अधिक आहे. त्यामुळे तरुणांनी आपली विचारसरणी बदलून स्वयंरोजगार (Self employment) करावा,’ असं आवाहन केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान खात्याचे मंत्री जितेंद्र सिंह यांनी केलं.

काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्चच्या (Council of Scientific and Industrial Research CSIR) उपक्रमाअंतर्गत जम्मूतील इंडियन इन्स्टिट्युट ऑफ इंटिग्रेटिव्ह मेडिसीनमध्ये ( Indian Institute of Integrative Medicine IIIM) एक दिवसाच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचं मंगळवारी जितेंद्र सिंह यांच्या हस्ते उदघाटन झालं त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला उपस्थित कृषी क्षेत्रातील स्टार्टअप सुरू करणारे उद्योजक आणि शेतकऱ्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं. अरोमा मिशन फेज 2 च्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

या वेळी उपस्थित एका तरुणानी सांगितलं की शेतीमध्ये नवं तंत्रज्ञान वापरून तो सुरुवातीपासूनच वर्षाला 3 लाख रुपये कमवतो आहे. केवळ एक हेक्टर (1 Hector) जमिनीवर तो एवढी मोठी कमाई करत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. त्याचबरोबर बी. टेकचं शिक्षण घेतलेल्या दोन इंजिनिअर्सनी (B. Tech Engineers) सांगितलं की, त्यांनी असंच शेतीसंबंधी स्टार्टअप सुरू केलं आहे. ज्यामुळे फक्त पाच महिन्यांत त्यांची कमाई दुप्पट झाली आहे.

EPFO ने व्याजाच्या पैशासंदर्भात दिलं महत्त्वाचं अपडेट, तुमच्या खात्यात कधी येणार पैसे?

सिंह पुढे म्हणाले, ‘ आता कार्यक्रमात तरुणांनी त्यांच्या यशोगाथा सांगितल्या. भरकटलेल्या तरुणांना त्यातून एक संदेश मिळतो की काही रुपयांचा रोजगार मिळवून देणाऱ्या नोकरीसाठी जीवापाड कष्ट करण्यापेक्षा त्यांनी स्वयंरोजगार सुरू करावा. नोकरीत कितीही कष्ट केले तरीही त्यांना 6 हजार रुपयांपेक्षा जास्त पगार मिळणार नाही. पण स्टार्ट अप (Start Up) सुरू केलेल्या तरुणांनी केवळ त्यांच्यासाठीच पैसे कमावलेले नाहीत तर त्यांच्यासोबत इतरांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. ते मोठ्या प्रमाणात पैसे कमवत आहेत. त्यामुळे त्यांनी स्टार्टअप सुरू करण्यावर भर द्यावा.’

खात्यात झिरो बॅलन्स असेल तरीही काढता येतील पगाराच्या तिप्पट पैसे, काय आहे ही Bank Service?

केंद्रातील मोदी सरकारने सुरुवातीपासून तरुणाईला व्यवसाय करण्यासाठी प्रेरित केलं आहे. सध्याच्या कोरोना काळात तर तरुणांना लक्षात आलंय की नोकरी कधीही जाऊ शकते. अनेकांच्या नोकऱ्या गेल्यामुळे ते व्यवसायांकडे वळले आहेत. त्यामुळे जम्मू असो वा देशातली कुठलाही भाग तरुणांनी व्यवसायाकडे वळायला हवं. तसंच सरकार विविध योजनांतून तरुणांना कर्ज उपलब्ध करून देत आहे. तसंच व्यवसायासाठी लागणारी लायसन्स काढण्याची प्रक्रियाही सोपी केलेली आहे.

First published:

Tags: Business, Money