सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे कमी होणार पगार! खाजगी नोकरदारकांना मोठा फटका

सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे कमी होणार पगार! खाजगी नोकरदारकांना मोठा फटका

एकीकडे महागाईचे दर दिवसेंदिवस वाढत असताना खाजगी नोकरधारकांच्या चिंता काही कमी होत नाही आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर : एकीकडे महागाईचे दर दिवसेंदिवस वाढत असताना खाजगी नोकरधारकांच्या चिंता काही कमी होत नाही आहेत. भाज्या आणि दैनंदिन जीवनाच्या वस्तुंच्या किमती गगनाला भिडत असाताना, केंद्र सरकानं नोकरधारकांना एक मोठा झटका दिला आहे. आता काही महिन्यांनंतर तुमचा मासिक पगार कमी होण्याची शक्यता आहे. याचे कारण म्हणजे आता तुमच्या मासिक पगारामध्ये मासिक भत्ताही सामिल केला जाणार आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकरानं भत्त्यांबाबत योग्य निर्णय न घेतल्यामुळं खाजगी कंपन्यानी हा निर्णय घेतला आहे. खाजगी कंपन्यांनी मासिक पगारात किती भत्ता असावा, त्यात किती पैसे कंपनी जोडणार, कोणते भत्ते पगारात सामिल होतील आणि कोणते यात सामिल होणार नाहीत याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. खाजगी कंपनी आणि सरकार यांच्यातील या वादाचा निकाल काढण्याची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाला देण्यात आली होती.

वाचा-सोन्याच्या किमतीत पुन्हा एकदा घट, इथे पाहा सोमवारचे दर

भत्ता सामिल झाल्यास वाढणार पीएफ (PF)

खाजगी उद्योगांच्या त्रिपक्षीय बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. त्यामुळं आता मासिक पगारात सरकारी भत्ता सामिल करण्यात येणार आहे. दरम्यान असे झाल्यास, बेसिक सॅलरीवर परिणाम होईल. त्यामुळं पीएफमध्येही वाढ होऊ शकते. त्यामुळं आता तुमचे पीएफची रक्कम वाढून पगार कमी होणआर आहे.

वाचा-बॉयफ्रेंड काढायचा अश्लील व्हिडीओ, पॉप सिंगर गर्लफ्रेंडनं उचललं धक्कादायक पाऊल

कंपन्यांनी ठेवल्या या दोन अटी

दरम्यान खाजगी कंपन्यांनी यासाठी दोन अटी ठेवल्या आहेत. पहिली अट ही आहे की, सरकारनं कोणता भत्ता सामिल करावा आणि कोणता नाही याबाबत स्पष्टता द्यावी. तसेच, हा नियम सर्व खाजगी कंपन्यांना सरसकट लागू होणार नाही. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकार आणि खाजगी उद्योग धंद्यांच्या बैठकीत याबाबत मिळून निर्णय घेतला जाणार आहे.

वाचा-संजय राऊतांना वेड्याच्या इस्पितळात दाखल करा, दानवेंचा टोला

कधीपासून लागू होणार नियम

कमीत कमी वेतनसाठी एक ड्राफ्ट कोड सरकारनं जारी केला आहे. त्यावर सध्या नियम आणि कायदा तयार करण्याची प्रक्रीया सुरू झाली आहे. ही प्रक्रीया पूर्ण झाल्यानंतर तुमच्या पगारातून भत्ता कापण्यास सुरुवात होऊ शकते.

First published: November 25, 2019, 6:45 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading