चला गरजेच्या वेळी एकमेकांना मदत करूया, हे करण्यासाठी आमच्यापाशी आहे एक सोपा मार्ग 

चला गरजेच्या वेळी एकमेकांना मदत करूया, हे करण्यासाठी आमच्यापाशी आहे एक सोपा मार्ग 

Amazon.in ने एक नवीन पाउल उचलले आहे, ज्याद्वारे तुम्ही तुमची देणगी थेट PM-Cares फंडात जमा करू शकता.

  • Share this:

आपण सर्वजण कठीण काळात जगत आहोत. देशभरात हाहाःकार उडवून देणाऱ्या COVID-19 ने विविध मार्गांनी आपले जीवन बदलून टाकले आहे, आणि याचा खूप मोठा वैश्विक परिणाम घडत आहे. जरी आपल्यापैकी बरेचजण आपापल्या घरी सुरक्षित असले आणि रोगाच्या कारणांपासून स्वतःला दूर ठेवत असले; तरीही आपल्यापैकी अनेक लोक असे आहेत की, जे आघाडीवर राहून या रोगाविरुद्धच्या लढ्यात आपल्या जीवाची बाजी लावून आपले रक्षण करण्यासाठी कार्यरत आहेत. आता सर्वांत मोठा प्रश्न हा आहे की,

डॉक्टर्स, सुरक्षारक्षक, डिलिव्हरी एजंट्स आणि अशाच बऱ्याच जणांना आपल्या रक्षणासाठी घरापासून दूर राहावे लागते आहे, अशा वेळी आपण कशाप्रकारे एक होऊन त्यांना मदत करू शकतो?

अशा बिकट प्रसंगी, भारतीय म्हणून आपण एक होऊन आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे. लोकांना त्रास होतो आहे, त्यांच्या नोकऱ्या संकटात आहेत, तसेच डॉक्टर्स व आरोग्य विभागाशी संबंधित व्यक्ती पुरेशी सुरक्षा साधने मिळवण्यासाठी झगडत आहेत, यामध्ये तुम्ही त्यांना कशाप्रकारे मदत करू शकाल?

आपले  कर्तव्य पार पाडून

Amazon.in ने एक नवीन पाउल उचलले आहे, ज्याद्वारे तुम्ही तुमची देणगी थेट PM-Cares फंडात जमा करू शकता, ज्याचा उपयोग  COVID-19 सारख्या राष्ट्रीय आपत्तींसाठी केला जातो. UPI च्या माध्यमातून तुम्ही तुमच्या बँक खात्यातून देणगी थेट व सुरक्षितपणे PM-Cares फंडात जमा करू शकता. तुमच्या देणगीची देशामध्ये सध्या तुटवडा असलेल्या आवश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी मदत होईल, त्यामुळे अनेकांचे जीवन सुसह्य होईल. त्याचबरोबर, Amazon ने त्यांच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या देणग्यांच्या बाबतीत, प्रत्येक देणगीदाराच्या देणगीमागे देणगीच्या १०% इतकी रक्कम एकदा दान करण्याचे वचन दिले आहे. ६ सोप्या पायऱ्या ओलांडून तुम्ही हे करू शकता:

एवढेच नाही तर, Amazon India ने मोठ्या प्रमाणात आवश्यक कार्य व सेवा करणाऱ्या विविध एनजीओजशी हात मिळवला आहे. एनजीओज व तुम्ही कोणाला दान करता त्याची सूची:

अक्षय पात्र फाउंडेशन:

हा सहाय्यता निधी देशभरातील गरजू लोकांना अन्न व कोरडा धान्यसाठा पुरवण्यासाठी कार्य करतो.

युनायटेड वे मुंबई:

ही सेवाभावी संस्था आवश्यक सुरक्षा साधने वापरून आपले सर्व काम करतानाच अन्नसेवन करणाऱ्या लोकांसाठी अन्न पुरवते तसेच गरजूंना अन्न व स्वच्छतेची साधने पुरवते.

ऑक्सफेम इंडिया:

ही संस्था सेवकांना हेल्थ किट्सचा पुरवठा करते तसेच गरजूंना अत्यावश्यक सेवा पुरवते.

हॅबिटेट फॉर ह्युमॅनिटी:

अल्प उत्पन्न असलेल्या कुटुंबांना अन्नधान्याचा पुरवठा करण्याबरोबरच ही संस्था गरजूंना आरोग्य व स्वच्छतेची किट्सही पुरवते.

प्रत्येक देणगी महत्त्वाची:

एक गोष्ट लक्षात घ्या की, कोणतीही देणगी कमी किंवा जास्त नसते. प्रत्येक देणगी ही मोलाची आहे. आणि म्हणूनच Amazon India प्रत्येक देणगीदाराचे आभारी आहे. 1 रुपया किंवा त्याहून अधिक दान द्या, मग Amazon 10 रु. व तुम्ही दिलेल्या देणगीच्या 10% रकमेचे योगदान देईल. Amazon India त्यांच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या देणग्याही स्वीकारत आहे आणि गरजवंतांचे जीवन सुलभ करत आहे.

एक जुनी म्हण आहे, जेव्हा परिस्थिती कठीण असते तेव्हा कणखर माणसेच त्यातून मार्ग शोधतात. आपण कठीण काळातून जात आहोत, या काळात आपल्याला आणि एक होऊन देशभरात पसरलेल्या COVID-19 चा सामना करायचा आहे. कोरोनाला आळा घालण्याविषयी आपले कर्तव्य पार पाडायचे तसेच आपल्याला घरात थांबायचे आहे. चला, यथाशक्ती योगदान  देऊन या लढ्यातील सेनानींना मदत आणि आधार देऊया. आपल्याला याची जाणीव आहेच की ते याचा अत्यंत चांगल्या पद्धतीने वापर करू शकतात.

आपले योगदान देऊन एखाद्याला मदत करण्यासाठी येथे क्लिक करा व या युद्धात विजय मिळवा.

First published: April 28, 2020, 4:58 PM IST
Tags:

ताज्या बातम्या