मराठी बातम्या /बातम्या /मनी /आता व्हा चिंतामुक्त, 'या' व्यवसायात कमी गुंतवणूक करुन चांगल्या कमाईची संधी

आता व्हा चिंतामुक्त, 'या' व्यवसायात कमी गुंतवणूक करुन चांगल्या कमाईची संधी

शेतकऱ्यांना आता चांगले पैसे कमावण्याची संधी आहे.

शेतकऱ्यांना आता चांगले पैसे कमावण्याची संधी आहे.

शेतकऱ्यांना आता चांगले पैसे कमावण्याची संधी आहे.

  • Local18
  • Last Updated :
  • Maharashtra, India

मुंबई, 12 मार्च : अनेकांना शेती करत असताना जोडधंदा करायची इच्छा असते. मात्र, त्यामध्ये कोणता जोडधंदा करावा, याबाबत अनेक जण विचारात असतात. मात्र, तुम्ही दुग्ध व्यवसाय करुन चांगले पैसे कमवू शकतात. कारण दूध उत्पादनात भारत जगात अग्रेसर आहे. त्यात भारतात चाऱ्याची कमतरता नाही. त्यामुळे तुम्ही दुग्ध व्यवसाय करुन चांगले पैसे कमवू शकतात. हॅलो कृषी डॉट कॉमने याबाबतची माहिती प्रकाशित केली आहे.

दुग्धजन्य पदार्थ व्यवसाय –

दुग्धव्यवसायासाठी सरकारकडून कर्ज आणि अनुदानही मिळते. नाबार्ड योजनेंतर्गत डेअरी उघडण्यासाठी कर्जावर अनुदान मिळते. सर्वसाधारण वर्गाला 25% अनुदान आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमातींना 33% अनुदान दिले जाते. तसेच डेअरी उघडण्यासाठी बँकेकडून 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते. त्यात दुग्धजन्य पदार्थांची मागणी वर्षभर राहते. अशा परिस्थितीत दुग्धजन्य पदार्थांचा व्यवसाय छोट्या प्रमाणावर सुरू केल्यास तो मोठा होऊ शकतो.

इतकेच नव्हे तर दुधापासून बनवलेले चॉकलेट सर्वांनाच आवडते. बाजारात अनेक प्रकारची चॉकलेट्स उपलब्ध आहेत. मोठ्या कंपन्याही या व्यवसायात गुंतल्या आहेत. याशिवाय स्थानिक पातळीवरही अनेक छोटे ब्रँड्स खूप चांगली कमाई करत आहेत. या माध्यमातून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. तसेच तुम्ही तुमचा स्वतःचा ब्रँड बनवून विकू शकता किंवा रॉ चॉकलेट बनवून मोठ्या कंपन्यांना विकू शकता.

दूध संकलन केंद्र –

दूध संकलन व्यवसाय म्हणजेच दूध संकलन केंद्र उघडूनही तुम्ही चांगली कमाई करू शकता. जवळच्या दूधवाल्यांकडून दूध विकत घेऊन ते मोठ्या कंपन्यांना दूध पुरवठा करता येईल. मदर डेअरी, अमूल, सरस यांसारख्या कंपन्याही मिल्क पॉइंट आणि डेअरी पॉइंट उघडण्याची सुविधा देतात. याशिवाय तुम्हा तुमची स्वतःची दूध डेअरी किंवा मिल्क पॉइंट किंवा सेंटर उघडता येऊ शकते.

पावसाळी हवामानात कशी घेणार पिकांची काळजी? कृषी विभागानं दिल्या महत्त्वाच्या टिप्स

या माध्यमातूनही तुम्ही चांगली कमाई करू शकता. यासाठी दूध संकलनासाठी अशी जागा निवडावी जिथे ग्राहक आणि शेतकरी सहज पोहोचू शकतील. दूध संकलन व्यवसायात तुम्ही कमी दराने दूध खरेदी केल्यावर ते बाजारभावाने विक्री करू शकतात. यामाध्यमातूनही चांगले पैसे कमवू शकता.

First published:
top videos

    Tags: Business, Farmer, Money