फक्त 5 हजार रुपयात पोस्ट ऑफिसची फ्रेंचाइजी, पहिल्या दिवसापासून सुरू होणार कमाई

फ्रेंचाइजीमधून तुम्ही स्टँप, स्टेशनरी, स्पीड पोस्ट आर्टिकल्स, मनी आॅर्डरचं बुकिंग या सेवा देऊ शकतात. त्यात तुम्हाला कमिशन मिळेल.

News18 Lokmat | Updated On: Apr 18, 2019 01:03 PM IST

फक्त 5 हजार रुपयात पोस्ट ऑफिसची फ्रेंचाइजी, पहिल्या दिवसापासून सुरू होणार कमाई

मुंबई, 18 एप्रिल : तुम्हाला कमी गुंतवणुकीत व्यवसाय करायचा असेल तर हा चांगला पर्याय आहे. देशात 1.55 लाख पोस्ट आॅफिसेस असून अनेक भागांमध्ये पोस्ट आॅफिसेस नाहीयत. हे लक्षात घेता पोस्टल डिपार्टमेंट इंडिया पोस्ट ( India Post ) पोस्ट आॅफिस फ्रेंचाइजी उघडण्याची आणि कमाई करण्याची संधी घेऊन आलंय. तुम्हाला फ्रेंचाइजी घ्यायची असेल तर तुम्ही 5000 रुपयांचं सिक्युरिटी डिपाॅझिट ठेवावं लागेल. फ्रेंचाइजीमधून तुम्ही स्टँप, स्टेशनरी, स्पीड पोस्ट आर्टिकल्स, मनी आॅर्डरचं बुकिंग या सेवा देऊ शकतात. त्यात तुम्हाला कमिशन मिळेल.

फ्रेंचाइजी कोण घेऊ शकतं? - कोणीही व्यक्ती, इन्स्टिट्युशन्स, संस्था किंवा किराणेवाले, पानवाले, स्टेशनरी शाॅप, स्माॅल शाॅपकीपर इत्यादी पोस्ट आॅफिस फ्रेंचाइजी घेऊ शकतात. याशिवाय शहरात सुरू होणारी टाऊनशिप, स्पेशल इकाॅनाॅमिक झोन्स, इंडस्ट्रियल सेंटर, काॅलेज, पाॅलिटेक्निक्स, विद्यापीठं, व्यावसायिक काॅलेजेस इत्यादी फ्रेंचाइजीचं काम घेऊ शकतात. फ्रेंचाइजी घेण्यासाठी कमीत कमी 8वी उत्तीर्ण हवं. व्यक्तीचं वय कमीत कमी 18 वर्ष असायला हवं.निवडलेल्या व्यक्तींना डिपार्टमेंटबरोबर MoU साइन करायला हवं.


कशी होते निवड? - फ्रेंचाइजी घेणाऱ्याची निवड डिव्हिजनल हेड करतो. अर्ज मिळाल्यानंतर 14 दिवसांच्या आत ASP/SDIच्या रिपोर्टवर आधारित असते.

कोणाला फ्रेंचाइजी मिळू शकत नाही? - पोस्ट आॅफिसमध्ये काम करणारे कार्मचाऱ्यांच्या कुटुंबापैकी कुणी त्याच विभागात फ्रेंचाइजी घेऊ शकत नाही. पण कर्मचाऱ्याची पत्नी, सख्खी किंवा सावत्र मुलं आणि त्याच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्ती फ्रेंचाइजी घेऊ शकतात.

Loading...

या सेवा मिळतील - स्टँप आणि स्टेशनरी, रजिस्टर्ड आर्टिकल्स, स्पीड पोस्ट आर्टिकल्स, मनी आॅर्डरचं बुकिंग, पोस्टल लाइफ इन्शुरन्स या सगळ्या सेवा उपलब्ध असतात. बिल, कर , दंड भरणं याही सुविधा इथे मिळू शकतात.


VIDEO: कोणतही चिन्हं दाबलं तरी मत कमळालाच जातं: प्रकाश आंबेडकर


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 18, 2019 01:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...