News18 Lokmat

तुमचं घर तुम्हाला मिळवून देईल पेन्शन, बँकांनी आणलीय नवी योजना

निवृत्तीनंतर तुमचं घर तुम्हाला पेन्शन म्हणून दर महिन्याला ठराविक रक्कम देऊ शकेल. SBI आणि PNB यांनी आणि इतर बँकांनीही रिव्हर्स मोर्गेज स्किम आणलीय.

News18 Lokmat | Updated On: Apr 19, 2019 07:27 PM IST

तुमचं घर तुम्हाला मिळवून देईल पेन्शन, बँकांनी आणलीय नवी योजना

मुंबई, 19 एप्रिल : अनेकदा लोक घर खरेदी करण्यासाठी मोठी गुंतवणूक करतात. त्यामुळे निवृत्तीनंतर त्यांच्याकडे खूप पैसे रहात नाही. खाजगी कंपन्या पेन्शनही देत नाहीत. त्यामुळे भविष्याची चिंता सतावत राहते. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, निवृत्तीनंतर तुमचं घर तुम्हाला कसं पेन्शन मिळवून देईल ते.

निवृत्तीनंतर तुमचं घर तुम्हाला पेन्शन म्हणून दर महिन्याला ठराविक रक्कम देऊ शकेल. SBI आणि PNB यांनी आणि इतर बँकांनीही रिव्हर्स मोर्गेज स्किम आणलीय.

काय आहे रिव्हर्स मोर्गेज स्किम ? - या योजनेमुळे 60 वर्षांच्या वरील व्यक्तीला नियमित पेन्शन मिळेल. यासाठी तुमचं स्वत:चं घर हवं. हे घर बँक स्वत:कडे गहाण ठेवतं आणि ठरलेली रक्कम दर महिन्याला देते.

या योजनेत बँकेकडून मिळणारे पैसे परत करावे लागत नाहीत. व्यक्तीच्या मृत्यूनंतर घर बँकेच्या ताब्यात जातं. कुटुंबातल्या लोकांना ते घर हवं असेल तर बँकेकडून ते विकत घेता येतं. घराच्या किमचीवर पेन्शन दिलं जातं.

कोण घेऊ शकतो फायदा? - 60 वर्षांच्या पुढचे कुणीही भारतीय ही योजना स्वीकारू शकतात. पती-पत्नी मिळून हे करू शकतात. पत्नीचं वय 58 हवं. बँक 10 ते 15 वर्षांसाठी निवृत्ती वेतन देतं. SBI या योजनेअंतर्गत 3 लाख रुपये ते 1 कोटीपर्यंत कर्ज देतात. महिलांना 11 टक्के व्याज दरावर कर्ज मिळतं. तर SBI पेन्शनर्सना वर्षाला 10 टक्के व्याजदरावर कर्ज देतात.

Loading...

कोणाला आहे फायदेशीर ? - स्वत:चं घर आहे पण मिळकत नाही अशांना निवृत्तीनंतर हे फायदेशीर आहे.

भारतात फक्त 7 टक्के तरुणांना फायदा - भारतात फक्त 7 टक्के तरुणांना पेन्शन मिळू शकेल. 93 टक्के तरुणांकडे पेन्शनचा पर्याय नाही. त्यामुळे रिव्हर्स मोर्गेज स्किम हा चांगला पर्याय आहे.


VIDEO : साध्वी यांच्यावर टीका करत प्रकाश आंबेडकरांचा संघावर निशाणा, म्हणाले...


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 19, 2019 07:27 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...