मराठी बातम्या /बातम्या /मनी /बँकेकडून गृहकर्ज मिळालं नाही? आईवडिलांकडून Loan घेऊन मिळवा करावर विशेष सवलत

बँकेकडून गृहकर्ज मिळालं नाही? आईवडिलांकडून Loan घेऊन मिळवा करावर विशेष सवलत

आवश्यकता भासल्यास आई-वडील, नातेवाईक, मित्रमंडळी यांच्यापैकी कोणीही आर्थिकदृष्ट्या सक्षम असेल, तर त्यांच्याकडूनही कर्ज घेता येतं. अशा प्रकारे कर्ज घेतलं, तर बँकेच्या दीर्घ प्रक्रियेपासून सुटका होते.

आवश्यकता भासल्यास आई-वडील, नातेवाईक, मित्रमंडळी यांच्यापैकी कोणीही आर्थिकदृष्ट्या सक्षम असेल, तर त्यांच्याकडूनही कर्ज घेता येतं. अशा प्रकारे कर्ज घेतलं, तर बँकेच्या दीर्घ प्रक्रियेपासून सुटका होते.

आवश्यकता भासल्यास आई-वडील, नातेवाईक, मित्रमंडळी यांच्यापैकी कोणीही आर्थिकदृष्ट्या सक्षम असेल, तर त्यांच्याकडूनही कर्ज घेता येतं. अशा प्रकारे कर्ज घेतलं, तर बँकेच्या दीर्घ प्रक्रियेपासून सुटका होते.

  नवी दिल्ली, 09 जुलै: घर बांधण्याचं स्वप्न प्रत्येकाचं असतं, मात्र त्याकरता आर्थिक बाजू सांभाळणं विशेष गरजेचं असतं. घर बांधताना येणारे विचित्र अनुभव, अडचणी आदी गोष्टी प्रत्यक्ष घर बांधणाऱ्यालाच कळतात; बाकीच्या कोणाला ते सांगूनही त्याचं गांभीर्य कळत नाही. आताच्या काळात घर बांधण्यापेक्षा विकत घेणाऱ्यांची संख्या तुलनेने जास्त आहे. त्यामुळे काही त्रास कदाचित कमी झाले असले, तरी काही त्रास नव्याने वाढले आहेत. त्यातीला एक महत्त्वाचा घटक म्हणजे घरासाठी लागणारे पैसे उभे करणं. आताच्या काळात घर घेणं ही सर्वसामान्य किंवा मध्यमवर्गीयांसाठी सहजसोपी गोष्ट राहिलेली नाही. त्यामुळे बचतीच्या पैशांतून घर घेणं वगैरे शक्य होत नाही. बचतीतून (Savings) फार तर कर्जासाठीची मूलभूत आवश्यक रक्कम उभी करता येते. त्यामुळे कर्ज घेतल्याशिवाय सर्वसामान्यांचं घराचं स्वप्न पूर्ण होत नाही.

  कर्ज (Home Loan) घ्यायचं म्हटलं की बँकेची पायरी चढणं आलं. कर्ज घेणारा माणूस कर्जाची परतफेड करू शकतो की नाही, हे तपासणं हे बँकांचं काम आहे आणि त्यात काही चूकही नाही; पण ही सगळी प्रक्रिया बघूनच काही जणांचा नवं घर घेण्याचा उत्साह ओसरू शकतो.

  आपली पत सिद्ध करण्यासाठी बँकेला अनेक कागदपत्रं सादर करावी लागतात. आपली क्रेडिट हिस्ट्री (Credit History), सिबिल स्कोअर बँक तपासते. शक्य त्या सगळ्या गोष्टींची पडताळणी केली जाते. एवढं होऊनही बँकेचं समाधान झालं नाही तर कर्ज मिळण्याची शक्यता नसते. सगळ्या गोष्टी बँकेला कागदपत्रांनिशी पटवण्यात आपण यशस्वी झालो, तरच आपल्याला कर्ज मिळू शकतं. बँकेचं कर्ज मिळालं, तर उत्तमच; पण ते नाही मिळालं, तरी निराश होण्याची गरज नाही.

  हे वाचा-SBI Alert: 10-11 तारखेला कोट्यवधी ग्राहकांना मिळणार नाहीत महत्त्वाच्या सेवा

  आपले आई-वडील, नातेवाईक, मित्रमंडळी यांच्यापैकी कोणी आर्थिकदृष्ट्या सक्षम असेल, तर त्यांच्याकडूनही कर्ज घेता येतं. अशा प्रकारे कर्ज घेतलं, तर बँकेच्या दीर्घ प्रक्रियेपासून सुटका होते. बँकेपेक्षा कमी व्याजदराने कर्ज मिळू शकतं. कर्ज किती कालावधीत फेडायचं हे परस्परांच्या चर्चेतून ठरवता येतं. एकमेकांच्या विश्वासावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. त्यामुळे कडक नियम नसतात, असे अनेक फायदे होतात. कर्जाच्या मुद्द्यावरून नातेवाईकांशी भविष्यात वादविवाद उद्भवू नयेत, म्हणून एखाद्या कायदेतज्ज्ञाची (Legal Expert) मदत घेतलेली चांगली.

  बँकेतून कर्ज घेतलं, तर कर्जाच्या मुद्दलाच्या रकमेवर (Principal Amount) कलम 80 सी अंतर्गत वर्षाला 1.5 लाख रुपये डिडक्शन (Deduction) मिळतं. त्यामुळे वैयक्तिक पातळीवर कोणाकडून कर्ज घेतलं, तर ही सवलत क्लेम करता येत नाही; पण मात्र (Interest) व्याजावर सेक्शन 24 अंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंत सवलत मिळू शकते.

  हे वाचा-Zomato Bug Bounty: बग शोधा आणि 3 लाख रुपये मिळवा! झोमॅटो देत आहे संधी

  उदाहरणार्थ जाणून घेऊया- कुटुंबातल्या व्यक्तीकडून एखाद्याने 20 लाख रुपयांचं कर्ज 20 वर्षांसाठी घेतलं आणि त्यासाठी सहा टक्के व्याजदर ठरला आहे. त्यासाठी मासिक EMI होईल 14,329 रुपये. त्यामुळे वार्षिक व्याज होईल 1,18,547 रुपये आणि वार्षिक मुद्दल असेल, 53,396 रुपये. यापैकी 1,18,547 रुपये या व्याजावर तुम्हाला सेक्शन 24 अंतर्गत सवलत मिळेल; पण मुद्दलावर मात्र सवलत मिळणार नाही. कारण हे कर्ज बँकेकडून घेतलेलं नाही.

  व्याजावर सेक्शन 24 अंतर्गत सवलत क्लेम करण्यासाठी ज्याच्याकडून कर्ज घेतलं आहे, त्याच्याकडून एक सर्टिफिकेट घ्यावं लागतं. त्यात किती व्याज घेण्यात आलं, याचा उल्लेख असतो. हे सर्टिफिकेट सादर केल्यावर इन्कम टॅक्स सवलत मिळू शकते. घराच्या दुरुस्तीसाठी नातेवाईकांकडून कर्ज घेतलं असेल, तरी व्याजावर 30 हजार रुपयांपर्यंत सवलत मिळू शकते. त्या घरात तुम्ही राहत असाल, तरच अशा कर्जांत व्याजावर करसवलत मिळू शकते. बांधकाम सुरू असलेल्या घराच्या बाबतीत व्याज करसवलत मिळत नाही. बांधकाम पूर्ण होण्यापूर्वी भरलेल्या व्याजावरची करसवलत पझेशननंतर पाच हप्त्यांत घेता येते.

  First published:
  top videos

   Tags: Home Loan