Home /News /money /

SBI च्या कार्डवर आहे 5% कॅशबॅक, 31 डिसेंबरपर्यंत अशाप्रकारे मिळेल फायदा

SBI च्या कार्डवर आहे 5% कॅशबॅक, 31 डिसेंबरपर्यंत अशाप्रकारे मिळेल फायदा

SBI चं कार्ड वापरून जर तुम्ही कॅशलेस ट्रान्झॅक्शन (Cashless transaction) करत असाल, तर तुम्हाला तीन बिलांच्या पेमेंट्सवर 5 टक्के कॅशबॅक (Cashback) मिळू शकतो.

    नवी दिल्ली, 06 डिसेंबर: ऑनलाइन ट्रान्झॅक्शन करताना आपण नेहमी कॅशबॅक आहे का ते तपासतो. एसबीआय (SBI) देखील त्यांच्या कार्डवरून पेमेंट केल्यानंतर कॅशबॅकची ऑफर देत आहे.जर तुम्ही एसबीआयच्या कार्डवरून कॅशलेस ट्रान्झॅक्शन करत असाल तर तुम्हाला तीन बिल पेमेंट्स साठी 5 टक्के कॅशबॅक मिळू शकतो. एसबीआयची ही ऑफर याच महिन्याकरता आहे. अर्थात 31 डिसेंबरपर्यंत तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. जाणून घ्या कशाप्रकारे एसबीआय कार्डवरून पेमेंट करून 5 टक्के कॅशबॅकचा फायदा घेऊ शकता. SBI Card ची कॅशबैक ऑफर एसबीआयच्या कॅशबॅक ऑफरकरता तुम्हाला SBI Card Website/Mobile App वरऑटोपे रजिस्ट्रेशन करावं लागेल. ज्तीन बिल पेमेंट्स साठी 5 टक्के कॅशबॅक मिळेल. एसबीआयच्या नियमानुसार एका बिल पेमेंटसाठी तुम्हाला 100 रुपयापर्यंत कॅशबॅक मिळेल. अर्थात तीन बिल पेमेंट्सवर तुम्हाला 300 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळवता येईल. (हे वाचा-नशीबच फळफळलं! या भारतीयाने असे जिंकले 24 कोटी रुपये, तुम्ही देखील जाणून घ्या...) एसबीआयच्या माहितीनुसार कॅशबॅक मिळवण्यासाठी ऑटोपे रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला 4 महिन्याच्या आतमध्ये तीन पेमेंट केल्यास त्यावर ही कॅशबॅक ऑफर मिळेल. एसबीआय कार्डने पेमेंट केल्यानंतर जो कॅशबॅक तुम्हाला मिळाला आहे, तो 31 मार्च 2021 पर्यंत तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट होईल. एसबीआयच्या या कार्डवर मिळेल ऑफर ही ऑफर कॉरपोरेट कार्ड्स सोडून एसबीआयच्या सर्व क्रेडिट कार्ड्सवर ही ऑफर उपलब्ध आहे. याशिवाय या ऑफरचा फायदा तुम्हाला इस्टंट रिचार्ज किंवा बिल पेमेंट्सवर देखील मिळणार नाही. अशाप्रकारे मिळेल फायदा (हे वाचा-14 डिसेंबरपासून होणार मोठा बदल! पैसे ट्रान्सफर करण्याच्या नियमात बदलाव) एसबीआय कार्डच्या मोबाइल app वर लॉग इन करा. यानंतर E-Store वर क्लिक करा. ज्यानंतर Bill Pay & Recharge हा पर्याय येईल. ज्याठिकाणी तुम्हाला क्लिक करायचे आहे. याठिकाणी डिस्क्लेमर वाचून Proceed वर क्लिक करा. त्यानंतर  Add Biller वर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला याठिकाणी सर्व माहिती दाखल करून ऑटोपे सेटअप पूर्ण करावं लागेल. ही प्रोसस तुम्ही एसबीआय वेबसाइटवर देखील करू शकता. याकरता सर्वात आधी एसबीआयच्या वेबसाइटवर लॉग इन करा. त्यानंतर Utility Bill Payment वर क्लिक केल्यानंतर Pay Now चा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा आणि डिस्क्लेमर वाचून Proceed वर क्लिक करा. त्यानंतर  Add Biller वर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला याठिकाणी सर्व माहिती दाखल करून ऑटोपे सेटअप पूर्ण करावं लागेल.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: SBI, Sbi account, Sbi ATM, SBI bank, SBI Bank News

    पुढील बातम्या