सारखे लाइट जातायत का? मोदी सरकार देणार वीजकंपनी बदलण्याचा पर्याय

सारखे लाइट जातायत का? मोदी सरकार देणार वीजकंपनी बदलण्याचा पर्याय

मोदी सरकारने आता ग्राहकांना एक मोठी सुविधा दिली आहे. तुमची वीज कंपनी जर तुम्हाला चांगली सेवा देत नसेल तर ती कंपनी तुम्ही बदलू शकता.

  • Share this:

दिल्ली, 28 ऑगस्ट : मोदी सरकारने आता ग्राहकांना एक मोठी सुविधा दिली आहे. तुमची वीज कंपनी जर तुम्हाला चांगली सेवा देत नसेल तर ती कंपनी तुम्ही बदलू शकता. सध्या फोन कंपनीबद्दल अशी सोय आहे.

एकाच भागात वीज वितरण करणाऱ्या जास्त कंपन्या असाव्यात, असं सरकारने म्हटलं आहे. त्यामुळेच 3 महिन्यात खाजगी कंपन्यांची निवड करण्याची प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

वीज वितरण क्षेत्रात जर खाजगी कंपन्या आल्या तर वीजपुरवठ्याचा दर्जा वाढेल. या वीजबिलाची वसुली आणि वीजजोडणी हे दोन्ही त्या खाजगी कंपन्यांचीच जबाबदारी असेल.

वीजखरेदीचे अधिकार सरकार स्वत:कडेच ठेवणार आहे. वितरणाचे अधिकारही सरकारकडेच असतील. फक्त वीजपुरवठ्याचे अधिकार खाजगी कंपनीला दिले जातील. याचं कमिशन सरकारी कंपनीकडेच असेल.या सुधारणा करण्यासाठी सरकार इलेक्ट्रिसिटी अॅक्टमध्ये बदल करणार आहे. कारण त्यासाठी फ्रँचाइजी मॉडेल राबवलं जाणार आहे.

SBI ATM चे नियम बदलणार, ATM PIN सोबत हा नंबरही गरजेचा

मोबाइल फोनची सेवा चांगली मिळत नसेल तर आपण मोबाइलचं नेटवर्क बदलतो. तसंच वीज कंपनीची सेवा आवडली नाही तर ती कंपनीच बदलण्याचा अधिकार आपल्याला मिळू शकतो.

बऱ्याच वेळा वीजबिल, लोडशेडिंग याबद्दलच्या तक्रारी असतात. भरमसाठ वीजबिलाची तक्रार असेल तरी बिलाची रक्कम भरल्याशिवाय गत्यंतर नसतं. अशा वेळी वीजपुरवठ्याची कंपनी बदलायचा पर्याय असेल तर ग्राहकांचं नुकसानही होणार नाही.

सरकारने यासाठी काही अटीही घातल्या आहेत. जर एखादी सरकारी वीजवितरण कंपनी हे मॉडेल राबवत नसेल तर या कंपनीला कर्जपुरवठा केला जाणार नाही.

==================================================================================

VIDEO: खासदार अमोल कोल्हेंनी सुरेश धस यांची उडवली खिल्ली

Published by: Arti Kulkarni
First published: August 28, 2019, 6:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading