घर खरेदी करताय? मग म्युच्युअल फंडाची 'अशी' घ्या मदत आणि राहा टेंशन फ्री

घर खरेदी करताय? मग म्युच्युअल फंडाची 'अशी' घ्या मदत आणि राहा टेंशन फ्री

Mutual Fund, Savings - कर्ज काढून घर घेतलंत तरीही तुम्ही पैशाची बचत करू शकता. कशी ते वाचा -

  • Share this:

मुंबई, 10 ऑगस्ट : स्वत:चं घर हवं, हे स्वप्न तर प्रत्येक जण बघत असतं. तुम्हाला घर खरेदी करायचं असेल तर योग्य प्लॅनिंग करायला हवं. तज्ज्ञांच्या मते वय लहान असतानाच नीट प्लॅनिंग केलं तर बरंच काही मिळवता येतं. तुम्ही घरासाठी कर्ज घेताना थोडी हुशारी दाखवली तर कर्जापेक्षा जास्त पैसे मिळवाल.

कसं करायचं प्लॅनिंग?

1. कर्ज घेताना विचारपूर्वक घ्या - तुम्ही कर्ज घेताना कमी वर्षांसाठी कर्ज घेतलंत तर जास्त ईएमआय द्यावा लागेल. बऱ्याचदा गृहकर्ज 20 वर्षांपर्यंत घेतलं जातं. त्याऐवजी 30 वर्षांसाठी कर्ज घेतलं तर तुमचा ईएमआय कमी होईल.

पेट्रोलच्या दरात बदल नाही, डिझेल आणखी स्वस्त, 'हे' आहेत आजचे दर

2. तुमचा 20 वर्षाच्या कर्जाचा  ईएमआय 35,989 रुपये आहे. 30 वर्षाचं कर्ज घेतलंत तर ईएमआय 32,185 रुपये पडेल. म्हणजे तुमचे 3804 रुपये वाचतील. तुम्हाला आता योग्य आर्थिक प्लॅनिंग निवडावं लागेल.

3. तुम्ही वाचलेले पैसे म्युच्युअल फंडात गुंतवू शकता. म्युच्युअल फंडाच्या एसआयपीमध्ये गुंतवणूक करू शकता. 30 वर्षांच्या कर्जावर 3804 रुपयांची बचत होईल. ही रक्कम तुम्ही 30 वर्षांसाठी एसआयपीमध्ये टाकू शकता.

B.Com आणि MBA साठी नोकरीची संधी, 'असा' करा अर्ज

4. तज्ज्ञांच्या मते तुम्हाला 3804 रुपयांच्या रकमेवर 10 टक्के रिटर्न मिळतील. म्हणजे 20 वर्षांत तुम्ही 29 लाख रुपये वाचवू शकाल.

5. तुम्हाला 15 टक्के रिटर्न मिळालं तर ही रक्कम 57.66 लाख रुपये होईल. ही रक्कम तुम्ही 30 वर्ष गुंतवलीत तर तुम्हाला 8 टक्के रिटर्नवर 57.07 लाख रुपये मिळतील.

SBI नंतर आता 'या' 3 बँकांनी कमी केले व्याज दर, 'इतका' द्यावा लागेल EMI

6. तुमचं घर फ्री होईल. 3804 रुपयांवर तुम्हाला 10 टक्के रिटर्न मिळालं तर तुम्हाला 86.70 लाख रुपये मिळतील. 30 वर्षांत तुम्हाला कर्जावर 75.86 लाख रुपये व्याज मिळेल. म्हणजे मूळ रक्कम आणि व्याज मिळून तुम्ही 1.15 कोटी रुपये बँकेला द्याल.

7. तुम्हाला 15 टक्के रिटर्न मिळालं तर तुमची बचत 2.66 कोटी रुपयांच्या पुढे जाईल. म्हणजे 3804 रुपये दर महिन्याला तुम्ही वाचवाल आणि घर कर्जमुक्त होईल.

VIDEO: पूरग्रस्तांच्या मदतीसाठी तातडीने बोलावलेल्या बैठकीत काय म्हणाले शरद पवार?

Published by: Sonali Deshpande
First published: August 10, 2019, 12:03 PM IST

ताज्या बातम्या