Article 370 : काश्मीरच्या सुंदर खोऱ्यात घर घ्यायचंय? एका प्लॉटची ही आहे किंमत

Article 370 : काश्मीरच्या सुंदर खोऱ्यात घर घ्यायचंय? एका प्लॉटची ही आहे किंमत

सोचो की झीलोंका शहर हो... लहरों पे अपना एक घर हो.. 'मिशन काश्मीर' या सिनेमातलं मधलं गाणं तुम्हाला आठवत असेल. असंच आपलंही एक सुंदर घर असावं आणि तेही काश्मीरमध्ये. हे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आता एक संधी आहे.

  • Share this:

श्रीनगर, 6 ऑगस्ट : सोचो की झीलोंका शहर हो... लहरों पे अपना एक घर हो.. 'मिशन काश्मीर' या सिनेमातलं मधलं गाणं तुम्हाला आठवत असेल. असंच आपलंही एक सुंदर घर असावं आणि तेही काश्मीरमध्ये. हे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आता एक संधी आहे.

काश्मीरमधलं कलम 370 रद्द केल्यानंतर आता भारतातल्या कुणालाही काश्मीरमध्ये मालमत्ता खरेदी करता येणार आहे. त्यामुळे लगेचच काश्मीरमधल्या प्लॉटच्या किंमतींची चर्चा सुरू झाली आहे.

रिअल इस्टेट तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही वर्षांत श्रीनगरमध्ये घरांची मागणी वाढते आहे. इथे घर, प्लॉट, व्हिला, फार्म हाऊस यासोबतच व्यावसायिक कारणांसाठी गाळे घेण्यासाठी रीघ लागली आहे.

अर्थात काश्मीरबाहेरच्या कुणाला इथे घर घ्यायचं असेल तर ही प्रक्रिया मोठी आहे. कारण याबद्दलची कायदेशीर प्रक्रिया अजून पूर्ण व्हायची आहे. पण तरीही जाणून घेऊया काश्मीरमधल्या घरांच्या किंमती काय आहेत...

इस्लामाबादमध्ये संजय राऊत यांची पोस्टर्स, पाकिस्तानमध्ये हडकंप

श्रीनगर जिल्हा प्रशासनाच्या पोर्टलवर श्रीनगरच्या प्लॉटच्या मार्केट व्हॅल्यूबद्दल एक सर्क्युलर जारी केलं आहे. श्रीनगरमधल्या उत्तरेचा तालुका असलेल्या शालीमारमध्ये एक हजार चौ.फूट प्लॉटसाठी 9 लाख 73 हजार रुपये आहे. अनंतनाग, पहलगाम या भागांतही मालमत्ता खरेदीची मागणी वाढली आहे.

2018-19 च्या तुलनेत यावर्षी श्रीनगरमध्ये जमिनीच्या किंमतींमध्ये 5 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्याचवेळी पुलवामा आणि अनंतनागमध्ये सुमारे 7 टक्क्यांची वाढ झाली आहे.

याआधी काश्मीरबाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला काश्मीरमध्ये मालमत्ता घेण्याचा अधिकार नव्हता. आता मात्र काश्मीरचा विशेष दर्जा रद्द झाल्यामुळे इथल्या विकासाला चालना मिळेल तसंच पर्यटन व्यवसायही वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त होते आहे.

तुमचा खिसा भरलेला असेल तर श्रीनगरमधल्या दल लेकच्या काठाला किंवा गुलमर्ग- सोनमर्गमध्ये हिमवर्षावात नाहण्यासाठी तुम्हीही एखादं सुंदर घर बांधू शकता.

====================================================================================

भयंकर! पाण्याच्या प्रचंड लोंढ्याने क्षणांत सारा रस्ता वाहून नेला; भूस्खलनाचा LIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 6, 2019 08:34 PM IST

ताज्या बातम्या