मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Yes Securities ची 'या' स्टॉकमध्ये गुंतवणुकीची शिफारस, वर्षभरात 370 टक्के रिटर्न्स

Yes Securities ची 'या' स्टॉकमध्ये गुंतवणुकीची शिफारस, वर्षभरात 370 टक्के रिटर्न्स

Acrysil Ltd चा दुसऱ्या तिमाहीतील निकालानुसार या कालावधीत कंपनीच्या विक्रीत वार्षिक आधारावर 58 टक्के वाढ झाली आहे. Yes Securities चे म्हणणे आहे की परदेशातील बाजारपेठांमध्ये Quartz sinks च्या वाढत्या मागणीचा कंपनीला फायदा झाला आहे.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 16 नोव्हेंबर : शेअर बाजारात गुंतवणूकदारांची (Share Market Investors) संख्या मोठी आहे. त्यातही अनेक गुंतवणूकदार असे असतात ज्यांना कोणत्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करावी याबाबत मोठा संभ्रम असतो. अशा गुंतवणूकदारांसाठी अनेक ब्रोकरेज फर्म, तज्ज्ञ विविध स्टॉक्सची शिफारस करत असतात. Yes Securities ने एका शेअरची शिफारस केली आहे. Acrysil Ltd असं या शेअरचं नाव आहे.

Acrysil Ltd चा दुसऱ्या तिमाहीतील निकाल मजबूत आहे. या कालावधीत कंपनीच्या विक्रीत वार्षिक आधारावर 58 टक्के वाढ झाली आहे. Yes Securities चे म्हणणे आहे की परदेशातील बाजारपेठांमध्ये Quartz sinks च्या वाढत्या मागणीचा कंपनीला फायदा झाला आहे. जगभरातील लोक स्टेनलेस स्टीलच्या सिंकऐवजी क्वार्ट्स पासून बनवलेल्या सिंकला प्राधान्य देत आहेत, ज्यामुळे कंपनीला फायदा झाला आहे.

ब्रोकरेज हाऊसला अपेक्षा आहे की स्टेनलेस स्टीलच्या सिंकपेक्षा (Stainless Steel Sinks) क्वार्ट्ज सिंकला प्राधान्य देण्याचा हा ट्रेंड कायम राहील आणि पुढील पाच वर्षांत त्याचा बाजारातील हिस्सा 10 टक्क्यांवरून 20 टक्क्यांपर्यंत वाढेल. Acrysil ही जगातील 4 कंपन्यांपैकी एक आहे जी जर्मन तंत्रज्ञानावर आधारित किचन क्वार्ट्स सिंक बनवते. येस सिक्युरिटीजचे म्हणणे आहे की, आर्थिक वर्ष 2021-24 या कालावधीत, Acrysil च्या व्हॉल्यूममध्ये वार्षिक आधारावर 33 टक्के वाढ होऊ शकते.

Sigachi Industries शेअरमध्ये लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशी तेजी कायम, गुंतवणूकदारांची बंपर कमाई

या बाबी लक्षात घेऊन, Yes Securities ने Acrysil चे BUY रेटिंग कायम ठेवत आपलं टार्गेट 1023 वरून 1150 पर्यंत वाढवले ​​आहे. Acrysil Ltd या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये यावर्षी आतापर्यंत 370 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे, तर गेल्या 12 महिन्यांत हा स्टॉक 410 टक्क्यांनी वाढला आहे.

SBI ची खास सुविधा, एटीएम कार्ड नसतानाही काढा पैसे; काय आहे प्रोसेस?

वाढती मागणी लक्षात घेऊन Acrysil Ltd ने क्वार्ट्स सिंक तयार करण्याची क्षमता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आर्थिक वर्ष 2023 च्या दुसऱ्या तिमाहीपर्यंत, कंपनीचे दुसरे युनिट अतिरिक्त 2 लाख क्वाड सिंकचे उत्पादन सुरू करेल. यासोबतच, Acrysil आपली स्टेनलेस स्टील क्षमता 90,000 युनिट्सवरून 180,000 युनिट्सपर्यंत वाढवणार आहे. यामुळे कंपनीच्या टॉप लाइनमध्ये आणखी वाढ दिसून येईल. येस सिक्युरिटीजचे म्हणणे आहे की 2021-24 या आर्थिक वर्षात कंपनीच्या महसुलात 33 टक्क्यांहून अधिक वाढ होईल.

First published:

Tags: Investment, Money, Share market