मराठी बातम्या /बातम्या /मनी /

YES Bank खातेधारकांना दिलासा! या दिवशी हटवणार बँकेवरील सर्व निर्बंध

YES Bank खातेधारकांना दिलासा! या दिवशी हटवणार बँकेवरील सर्व निर्बंध

संकटग्रस्त येस बँकमध्ये (Yes Bank) 7,250 कोटी रुपये गुंतवण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ला परवानगी मिळाली आहे. त्याचप्रमाणे येस बँकेवरील निर्बंध हटवण्यासंदर्भात नोटिफिकेशन जारी करण्यात येणार आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar
नवी दिल्ली, 13 मार्च : केंद्रीय कॅबिनेट बैठक (Cabinet Meeting) झाल्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी महत्त्वाच्या निर्णयांबाबत घोषणा केली आहे. संकटग्रस्त येस बँकमध्ये (Yes Bank) 7,250 कोटी रुपये गुंतवण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ला परवानगी मिळाली आहे. गुंतवणुकीसंदर्भात सीतारामन यांनी सांगितलं की, SBI येस बँकेमध्ये 49 टक्के भागीदारी खरेदी करेल. एसबीआयला 10 रुपये प्रति शेअर या दराने येस बँकेचे 725 कोटी शेअर खरेदी करण्यास परवानगी मिळाली आहे. SBI 3 वर्षांसाठी आपली भागीदारी 26 टक्क्यांपेक्षा कमी करू शकत नाही. (संबधित-येस बँकेच्या पुनर्रचनेसाठी कॅबिनेटची मंजूरी, SBI करणार 7,250 कोटींची गुंतवणूक) त्याचप्रमाणे काही खासगी गुंतवणूकदारही येस बँकेत गुंतवणूक करणार आहेत. त्यांच्यासाठी लॉक इन पीरियडही 3 वर्षांचा असेल. नोटिफिकेशन जारी केल्यानंतर 3 दिवसात हटणार निर्बंध बैठकीनंतर अर्थ मंत्र्यांनी सांगितलं की, अर्थ मंत्रालयाकडून लवकरच येस बँक प्रकरणात (Yes Bank Crisis) नोटिफिकेशन जारी करण्यात येणार आहे. येस बँक खातेदारांसाठी महत्त्वाची बातमी अशी आहे की, हे नोटिफिकेशन आल्यानंतर 3 दिवसांच्या आत येस बँकेवरील निर्बंध हटवण्यात येणार आहेत. 3 दिवसांमध्येच  मोरेटेरियम पीरियड (Moratorium On Yes Bank) संपवण्यात येईल. 7 दिवसांमध्ये करणार नवीन बोर्डाची निर्मिती अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं की, नोटिफिकेशन जारी केल्यानंतर 7 दिवसांमध्ये बँकेच्या नवीन बोर्डाची नियुक्ती करण्यात येईल. नवीन बोर्डाची निर्मिती झाल्यानंतर आरबीआयने नियुक्त केलेले प्रशासक प्रशांत कुमार यांना हटवण्यात येईल. सीतारामन यांनी सांगितले की, नवीन बोर्डामध्ये काही सदस्य स्टेट बँक ऑफ इंडियाचे सुद्धा असतील. (हे वाचा-सुवर्णसंधी! 1,097 रुपयांनी घसरले सोन्याचे दर, शुक्रवारचे भाव इथे पाहा देशांतर्गत शेअर मार्केटमध्ये झालेल्या घसरणीबद्दल अर्थमंत्र्यांना विचारलं असता त्यांनी सांगितले की, सरकार या प्रकरणात सखोल लक्ष घालत आहे.
First published:

पुढील बातम्या