Yes Bank ने लॉन्च केलं Wellness Credit Card; आरोग्याच्या दृष्टीने मिळणार 'या' महत्त्वाच्या सुविधा

Yes Bank ने लॉन्च केलं Wellness Credit Card; आरोग्याच्या दृष्टीने मिळणार 'या' महत्त्वाच्या सुविधा

बँकेने आपल्या ग्राहकांसाठी आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी येस बँक वेलनेस (Yes Bank Wellness) आणि येस बॅँक वेलनेस प्लस (Yes Bank Wellness Plus)अशी दोन प्रकारची क्रेडिट कार्ड लाँच केली आहेत

  • Share this:

नवी दिल्ली, 17 जानेवारी : येस बँकेने ( Yes Bank )आपल्या ग्राहकांच्या आरोग्याकडे लक्ष देत नवीन सुविधा आणली आहे. बँकेने आपल्या ग्राहकांसाठी आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी येस बँक वेलनेस (Yes Bank Wellness) आणि येस बॅँक वेलनेस प्लस (Yes Bank Wellness Plus)अशी दोन प्रकारची क्रेडिट कार्ड लाँच केली आहेत. या कार्डच्या मदतीने ग्राहक आरोग्य सेवेचा लाभ घेऊ शकणार असून यामध्ये रिवार्ड पॉईंट देखील मिळणार आहेत. यासाठी कंपनीने आदित्य बिर्ला मल्टिपल अ‍ॅपवर (Aditya Birla Multiple App) करार केला असून या माध्यमातून ग्राहक हेल्थ चेकअप आणि इतर आरोग्य सेवांचा लाभ घेऊ शकणार आहेत.

ग्राहकांचे हित लक्षात घेऊन बँकेने ही सुविधा सुरु केल्याचे म्हटले आहे. यामाध्यमातून ग्राहक हेल्थ चेकअप (Health Check up), डॉक्टर कन्सल्टेशन यांसारखे विविध लाभ घेऊ शकणार आहे. याचबरोबर  हेल्थ चेकअप, राउंड द क्लॉक डॉक्टर किंवा काउंसलर हेल्पलाइन, होम बेस्ड वर्कआउट सेशन, पर्सनलाइज्ड डायट प्लान यांसारख्या सेवांचा देखील आदित्य बिर्ला मल्टिपल  अ‍ॅपवर रजिस्ट्रेशन करून फायदा घेऊ शकणार आहेत. सध्या कोरोनाच्या या संकटात अनेकजण घरून काम करत आहेत. विद्यार्थीदेखील घरून ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. नागरिकांची काळजी घेणे आणि मानसिक आणि शारीरिक विकास करण्यासाठी ही एक महत्त्वाची योजना असल्याचे बँकेने जारी केलेल्या विधानात म्हटले आहे.

Yes Bank Wellness Card मध्ये मिळणार हे फायदे

1)या कार्डची किंमत 1999 रुपये अधिक टॅक्स असणार असून विविध प्रकारच्या वापरावर यासाठी ग्राहकांना रिवॉर्ड प्वॉइंट्स देखील मिळणार आहेत.

2)डॉक्टर आणि औषधांशी संबंधित वापरासाठी हे कार्ड वापरल्यास 200 रुपये खर्चावर 20 रिवॉर्ड प्वॉइंट्स मिळणार आहेत.

3)दुसऱ्या कारणांसाठी खर्च केल्यास 200 रुपयांवर 4 रिवॉर्ड प्वॉइंट्स मिळणार आहेत.

4)दरवर्षी डोळ्यांची तपासणी, दातांची तपासणी आणि आरोग्य तपासणी केली जाणार असून यामध्ये 25 मापदंडांच्या आधारे ही तपासणी केली जाणार आहे.

5)प्रत्येक महिन्याला जिम, योगा आणि झूम्बाचे सहा फिटनेस सेशन होणार असून या पर्यायांमधून एक निवडायचा आहे.

6)कॉलवर तुम्ही डॉक्टरांशी अनलिमिटेड कन्सल्टेशन घेऊ शकता.

7)याचबरोबर डायट प्लॅन तयार करण्यासाठी मार्गदर्शन देखील मिळणार आहे.

Yes Bank Wellness Card Plus मध्ये मिळणार हे फायदे

1)वेलनेस प्लस कार्डची किंमत 2,999 रुपये अधिक टॅक्स असणार आहे

2)डॉक्टर आणि औषधांशी संबंधित वापरासाठी हे कार्ड वापरल्यास 2000 रुपये खर्चावर 30  रिवॉर्ड प्वॉइंट्स मिळणार आहेत.

3)दुसऱ्या कारणांसाठी खर्च केल्यास 200 रुपयांवर 6 रिवॉर्ड प्वॉइंट्स मिळणार आहेत.

4)दरवर्षी प्रिवेंटिव हेल्थ चेकअप केली जाणार असून यामध्ये 31 मापदंडांच्या आधारे ही तपासणी केली जाणार आहे.

5) प्रत्येक महिन्याला  जिम, योगा आणि  जूम्बाचे 12  फिटनेस सेशन होणार असून या पर्यायांमधून एक निवडायचा आहे.

6)कॉलवर तुम्ही डॉक्टरांशी अनलिमिटेड कन्सल्टेशन घेऊ शकता.

7)याचबरोबर डायट प्लॅन तयार करण्यासाठी मार्गदर्शन देखील मिळणार आहे.

8)फ्री ऑनलाइन कन्सल्टेशन आणि  फिटनेस असेसमेंट देखील मिळणार आहे.

9)डोमेस्टिक एअरपोर्ट लाउंजआणि  कॉन्टॅक्टलेस पेमेंटचा देखील फायदा मिळणार आहे.

आदित्य बिर्ला मल्टिपल  अ‍ॅपवर मिळणार या सुविधा

1)यामध्ये जिम, योगा आणि  जूम्बा सेशन मिळणार

2)घरच्या घरी वर्कआउट सेशन

3)वर्षभर  हेल्थ चेकअप

4)राउंड द क्लॉक डॉक्टर किंवा  काउंसलर हेल्पलाइन

5)डायट प्लॅनची सुविधा

Published by: Meenal Gangurde
First published: January 17, 2021, 7:41 AM IST
Tags: yes bank

ताज्या बातम्या