Home /News /money /

YES Bank प्रकरण: राणा कपूरच्या मुलींवरही ED ची टांगती तलवार, 600 कोटींच्या व्यवहाराची चौकशी सुरू

YES Bank प्रकरण: राणा कपूरच्या मुलींवरही ED ची टांगती तलवार, 600 कोटींच्या व्यवहाराची चौकशी सुरू

येस बँक (Yes Bank) प्रकरणात राणा कपूरच्या मुली राखी कपूर टंडन, रोशनी कपूर आणि राधा कपूर यांचं नाव सुद्धा घेण्यात येत आहे. या तिघींचीही चौकशी ईडीकडून सुरू आहे.

    नवी दिल्ली, 08 मार्च : अंमलबजावणी संचलनालय (Enforcement Directorate) अर्थात ईडीने शनिवारी येस बँक (Yes Bank) प्रकरणात दिल्ली आणि मुंबईत छापे घातले. सूत्रांकडून ही माहिती समोर येत आहे. शुक्रवारी रात्री ईडीने येस बँकेचे प्रमोटर राणा कपूरच्या मुंबईतील घरावर छापे घातले. रविवारी सकाळी राणा कपूरला अटक करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार या सगळ्या प्रकरणात राणा कपूरच्या मुली राखी कपूर टंडन, रोशनी कपूर आणि राधा कपूर यांचं नाव सुद्धा घेण्यात येत आहे. या तिघींचीही चौकशी ईडीकडून सुरू आहे. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या मुलींना दिवान हाउसिंग फायनान्स कॉरपोरेशन (DHFL)ला एप्रिल ते जुलै 2018 मध्ये दिलेल्या 600 कोटींच्या कर्ज प्रकरणाबाबत प्रश्न विचारण्यात आले. आरोप असा आहे की, DHFL ने हे कर्ज डॉयट अर्बन व्हेंचर्सला दिलं, ज्याचा मालकी हक्क राणा कपूरच्या कुटुंबीयांकडे आहे. (संबधित-YES Bank ग्राहक अद्यापही नाही काढू शकत एटीएममधून पैसे, बँकेने दिलं हे उत्तर) राणा कपूरच्या मुली राधा आणि रोशनी डॉयट अर्बन व्हेंचर्सच्या संचालक आहेत. येस बँकेच्या कर्जाची परतफेड करण्यात डीएचएफएलला अपयश आलं,  तेव्हा डॉयल अर्बन व्हेंचरला 600 कोटी रुपये देण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याशिवाय ईडी इतर पाच हजार कोटींच्या अन्य व्यवहारांचीही चौकशी करत आहे. (संबधित-कोण आहेत वायव्ही सुब्बा रेड्डी, येस बँकेतून वाचवले बालाजी देवस्थानचे 1300 कोटी) त्याचप्रमाणे राणा कपूर आणि त्यांच्या परिवाराच्या मालकीच्या कंपन्यांमध्ये 3 मोठी ट्रान्झाक्शन झाली आहेत. ट्रान्झाक्शनमध्ये असणाऱ्या काही कंपन्या DHFL चे प्रमोटर्स चालवतात. एप्रिल चे जुलै 2018 दरम्यान येस बँकेने DHFLला 3,700 कोटींचं कर्ज दिलं आहे.  येस बँकेने RKW डेव्हलपर्सला सुद्धा 750 कोटींचं कर्ज दिलं होतं
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Yes bank

    पुढील बातम्या