PMC नंतर ही बँक बुडण्याचा धोका, खातेदारांचा जीव टांगणीला

PMC नंतर ही बँक बुडण्याचा धोका, खातेदारांचा जीव टांगणीला

पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँक म्हणजेच PMC बँक बुडाल्यानंतर बँकांच्या खातेदारांना आपल्या पैशांबद्दल चिंता वाटते आहे. कोणती बँक आपल्या पैशांच्या दृष्टीने सुरक्षित आहे याबद्दल ग्राहक जागरुक आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 23 जानेवारी : पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँक म्हणजेच PMC बँक बुडाल्यानंतर बँकांच्या खातेदारांना आपल्या पैशांबद्दल चिंता वाटते आहे. कोणती बँक आपल्या पैशांच्या दृष्टीने सुरक्षित आहे याबद्दल ग्राहक जागरुक आहेत. त्यातच यस बँकेच्या (Yes Bank)भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)चे चेअरमन रजनीश कुमार यांना यस बँकेबद्दल मोठं विधान केलं आहे. ब्लूमबर्ग या न्यूज एजन्सीशी बोलताना SBI चे अध्यक्ष रजनीश कुमार म्हणाले, यस बँक विकत घ्यायची असेल तर आमच्याकडे पुरेसा निधी नाही. यस बँकेची मार्केट व्हॅल्यू 80 टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. बँकेचा शेअर 80 टक्क्यांनी खाली आला आहे. त्याची किंमत 40 रुपयांपर्यंत खाली आलीय.

यस बँकेचं बॅलन्सशीट 4 हजार कोटी डॉलर म्हणजेच सुमारे 2. 84 लाख कोटी रुपये आहे. मार्केटमध्ये या बँकेचा मोठा वाटा आहे. त्यामुळेच ही बँक बुडू दिली जाणार नाही. यस बँकेच्या समस्यांवर लवकरच उपाय काढला जाईल, असंही रजनीश कुमार यांनी सांगितलं.

(हेही वाचा : Aadhaar Card वरचा मोबाइल नंबर बदलणं आता झालं सोपं, असं करा हे काम)

मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात देशातल्या दोन वरिष्ठ बँक अधिकाऱ्यांनी यस बँकेबद्दल मत व्यक्त केलं होतं. यस बँकेची खरेदी करण्यासाठी कोटक महिंद्रा बँक ही सगळ्यात योग्य बँक आहे, असं त्यांचं म्हणणं होतं. अॅक्सिस बँकेचे सीईओ अमिताभ चौधरी यांनी आपली बँक छोटी बँक असल्याचं म्हटलं होतं. आम्ही बँकेचा विस्तार वाढवण्याचा प्रयत्न करतोय, असं ते म्हणाले. बँकेचा विस्तार वाढला तर कोणत्याही स्तरावरची एखादी बँक आम्ही विकत घेऊ शकू, असं अमिताभ चौधरी यांनी सांगितलं. आमच्याऐवजी उदय कोटक यांची कोटक महिंद्रा बँक यस बँकेची खरेदी करू शकेल, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.

(हेही वाचा : PF च्या नियमांत होणार मोठा बदल, तुम्हाला होणार फायदा)

Yes Bank अडचणीत

यस बँकेचे चेअरमन राणा कपूर यांना रिझर्व्ह बँकेने पदावरून हटवलं तेव्हापासूनच या बँकेचे वाईट दिवस सुरू झाले. बँकेच्या कामकाजाबद्दल त्याचवेळी नकारात्मक बातम्या येत होत्या. यामुळे बँकेचे खातेदारही चिंतेत आहेत. RBI ने स्विफ्ट कम्प्लायन्सेसमध्ये दुर्लक्ष केल्याप्रकरणी बँकेवर एक कोटींचा दंड लावला. बँकेच्या आर्थिक व्यवहारांबद्दलच्या प्रणालीला स्विफ्ट कम्प्लायन्सेस असं म्हणतात. त्याचबरोबर बँकेच्या QIP ला कोणीही खरेदीदार मिळाला नाही. यामुळे गुंतवणूकदारांचा बँकेवरचा भरवसा उडाला. राणा कपूर यांनी आधीच ही बँक सोडली आहे. आता ते आपली भागीदारीही विकत आहेत. यस बँकेच्या वाईट आर्थिक स्थितीमुळे खातेदारांनाही चिंता वाटते आहे.

=========================================================================

First published: January 23, 2020, 3:48 PM IST
Tags: moneySBI

ताज्या बातम्या