मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Year Ender 2021: BSE 500 मधील 'या' स्टॉक्समुळे गुंतवणूकदारांना मोठा फटका

Year Ender 2021: BSE 500 मधील 'या' स्टॉक्समुळे गुंतवणूकदारांना मोठा फटका

संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (Institutional Investors) खरेदी, मजबूत लिक्विडिटी आणि सुधारित मॅक्रो फॅक्टर्स वर्षभर सेंटिमेंट्सना सपोर्ट देत राहिले. ओमिक्रॉनमुळे (Omicron) कॅलेंडर वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत बाजारावर दबाव राहिला.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 31 डिसेंबर : 2021 मध्ये बेंचमार्क बीएसई सेन्सेक्सने (Sensex) 20 टक्क्यांहून अधिक परतावा दिला असला तरी, यावर्षी बीएसई 500 निर्देशांकातील जवळपास 100 शेअर्समुळे गुंतवणूकदारांना फटका (Investors Loss) बसला. मात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (Institutional Investors) खरेदी, मजबूत लिक्विडिटी आणि सुधारित मॅक्रो फॅक्टर्स वर्षभर सेंटिमेंट्सना सपोर्ट देत राहिले. ओमिक्रॉनमुळे (Omicron) कॅलेंडर वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत बाजारावर दबाव राहिला.

उज्जीवन स्मॉल फायनान्सचे सर्वाधिक नुकसान झाले

दलाल स्ट्रीटवरील नुकसान झालेल्यांमध्ये, उज्जीवन स्मॉल फायनान्सचा (Ujjivan Small Finance) स्टॉक 28 डिसेंबर रोजी 53 टक्क्यांनी घसरून 18.55 रुपयांवर होता, जो एका वर्षापूर्वी 31 डिसेंबरला 39.30 रुपयांच्या तुलनेत होता.

प्रचंड तोटा, वाढता NPA आणि मोठ्या संख्येने राजीनामे यामुळे उज्जीवन स्मॉल फायनान्सवर दबाव राहिला. 30 सप्टेंबर रोजी संपलेल्या सहामाहीत कर्जदात्याला 507.27 कोटी रुपयांचा तोटा झाला, मागील वर्षी याच कालावधीत 150.65 कोटी रुपयांचा नफा झाला होता. त्याच वेळी, आर्थिक वर्ष 22 च्या दुसऱ्या तिमाहीत, अॅडव्हान्सच्या तुलनेत त्याचा एकूण NPA 11.80 टक्क्यांच्या पातळीवर पोहोचला.

Pension Scheme : EPS ची 15 हजारांची मर्यादा हटणार, लिमीट आता दुप्पट होणार

या स्टॉक्समध्येही घसरण

स्ट्राइड्स फार्मा (49 टक्के), स्पंदना स्फुर्ती फायनान्शियल (42 टक्के), गल्फ ऑइल ल्युब्रिकंट्स इंडिया (39 टक्के), आयओएल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स (38 टक्के), बंधन बँक (38 टक्के) या स्टॉक्समध्येही मोठं नुकसान झालं आहे.

वर्षाच्या अखेरीस RBL बँकेला मोठा धक्का बसला. खरेतर, 25 डिसेंबर रोजी आरबीआयने कम्युनिकेशन विभागाचे प्रभारी मुख्य महाव्यवस्थापक योगेश दयाल यांची बँकेच्या संचालक मंडळावर अतिरिक्त संचालक म्हणून नियुक्ती केली होती. नंतर त्याच दिवशी, बँकेने एक्सचेंजेसना कळवले की RBL बँकेचे दीर्घकालीन एमडी आणि सीईओ विश्ववीर आहुजा तात्काळ रजेवर गेले आहेत. त्यानंतर, कार्यकारी संचालक राजीव आहुजा यांना तीन महिन्यांसाठी अंतरिम एमडी आणि सीईओ म्हणून नियुक्त करण्यात आले, ज्यासाठी नियामक मंजुरी आवश्यक असेल. त्यामुळे आरबीएलच्या शेअरवर दबाव कायम आहे.

EPFO चा PF खातेधारकांना मोठा दिलासा! 31 डिसेंबरनंतरही करता येईल E-Nomination

या यादीत वकरंगी, एस्ट्राझेनेका फार्मा इंडिया, हॅथवे केबल अँड डेटाकॉम, डीसीबी बँक, व्हर्लपूल इंडिया, अमरा राजा बॅटरीज, जुबिलंट फार्मा, रिस्पॉन्सिव्ह इंडस्ट्रीज, एमएएस फायनान्शिअल सर्व्हिसेस, स्पाइसजेट, वॉकार्ट, प्रॉक्टर अँड गॅम्बल, जॉन्सन कंट्रोल-हिताची इंडिया या कंपन्यांचा समावेश आहे.

First published:

Tags: Money, New year, Share market