मराठी बातम्या /बातम्या /मनी /

2000% चा जबरदस्त रिटर्न! 33 रुपयांचा हा मल्टिबॅगर स्टॉक पोहोचला 721 रुपयांपार, तुमच्याकडे आहे का हा शेअर?

2000% चा जबरदस्त रिटर्न! 33 रुपयांचा हा मल्टिबॅगर स्टॉक पोहोचला 721 रुपयांपार, तुमच्याकडे आहे का हा शेअर?

Multibageer Stock Investment: सेन्सेक्स-निफ्टीने विक्रमी उच्चांक गाठण्यासह 2021 मध्ये अनेक स्टॉक्स मल्टीबॅगर सिद्ध झाले आहेत. एक्सप्रो इंडिया (Xpro India Share Price) हा देखील असाच स्टॉक आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 16 नोव्हेंबर: सेन्सेक्स-निफ्टीने विक्रमी उच्चांक गाठण्यासह 2021 मध्ये अनेक स्टॉक्स मल्टीबॅगर (Investment in Multibagger Stocks) सिद्ध झाले आहेत. एक्सप्रो इंडिया (Xpro India Share Price) हा देखील असाच स्टॉक आहे. पॉलिमर प्रोसेसिंग कंपनीचा हा शेअर 2021 मध्ये आतापर्यंत 33.75 रुपयांवरून 721.65 रुपये प्रति शेअर झाला आहे. या कालावधीत या शेअरने भागधारकांना 2000 टक्क्यांहून अधिक रिटर्न दिला आहे. शेअर बाजारातील तज्ज्ञ या तेजीनंतर या मल्टीबॅगर स्टॉकवर अजूनही उत्साही आहेत. Xpro India मधील कोणतीही घसरण ही खरेदीची संधी मानली पाहिजे, असे त्यांचे मत आहे.

तज्ज्ञांच्या मते, हा शेअर प्रॉफिट-बुकिंगची वाट पाहत आहे, पण प्रॉफिट-बुकिंगचा टप्पा संपला की तो पुन्हा उसळी घेईल. त्यामुळे घसरणीवेळी गुंतवणूक करण्याची रणनिती आखा. या शेअरला 650 रुपयांच्या पातळीवर मजबूत सपोर्ट दिसत आहे.

हे वाचा-Bank of Baroda देत आहे स्वस्तात घरखरेदीची संधी! आजच आहे Mega e-Auction

वाचा काय आहे शेअर प्राइस हिस्ट्री?

गेल्या 1 महिन्यात हा शेअर 669 रुपयांवरून 721.65 रुपयांपर्यंत वाढला आहे, म्हणजेच महिनाभरात या स्टॉकने 7 टक्के परतावा दिला आहे. त्याचप्रमाणे, गेल्या 6 महिन्यांत, हा स्टॉक ₹ 118.70 वरून ₹ 721.65 पर्यंत वाढला आहे. या कालावधीत त्यात 500 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. त्याच वेळी, यावर्षी आतापर्यंत हा शेअर 33.75 रुपयांवरून 721.65 रुपयांपर्यंत वाढला आहे. या कालावधीत या शेअरमध्ये 21.38 पटींनी वाढ झाली आहे.

हे वाचा-22 रुपयांचा हा शेअर ₹10 हजारांपार, 25 हजारांच्या गुंतवणुकीचे झाले 1.14 कोटी

या आकडेवारीनुसार, जर एखाद्याने 1 महिन्यापूर्वी या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याला 1.08 लाख रुपये मिळाले असते. दुसरीकडे, 6 महिन्यांपूर्वी एखाद्याने 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याला 6 लाख रुपये मिळाले असते. त्याचप्रमाणे जर एखाद्या गुंतवणूकदाराने 2021 च्या सुरुवातीला या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याला आज त्या एक लाखाचे 21.38 लाख रुपये मिळाले असते.

(Disclaimer: बाजारातील गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीच्या अधीन असते. गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा. News18Lokmat.com कोणालाही गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही.)

First published:

Tags: Share market