परप्रांतीयांसाठी ही शहरं आहेत जगात सर्वात महाग! 10 पैकी 8 शहरं आशियात; पण त्यात मुंबई मात्र नाही

दुसऱ्या देशातून आलेल्यांना एखाद्या नव्या देशात स्थलांतर व्हायचं असेल, तर ही 10 शहरं ठरू शकतात महाग. जगातल्या सर्वांत महाग 10 शहरांमधली 8 आशियात आहेत. त्यात मुंबई नाही, हे विशेष.

News18 Lokmat | Updated On: Jul 6, 2019 06:13 PM IST

परप्रांतीयांसाठी ही शहरं आहेत जगात सर्वात महाग! 10 पैकी 8 शहरं आशियात; पण त्यात मुंबई मात्र नाही

परदेशी जाऊन स्थायिक व्हायचं असेल तर कुठलं शहर सगळ्यांत महाग? एका अभ्यासामध्ये वेगवेगळ्या शहरांत जवळपास 200 जीवनावश्यक खर्चांविषयी निरीक्षण केलं गेलं. राहणं, खाणं, घरगुती वस्तू, मनोरंजन, वाहतूक, कपडे या घटकांचा विचार केला गेला आणि सर्वांत महाग कोणतं शहर ठरलं पाहा...

मर्सर या कंसलटिंग संस्थेने जगातील आर्थिकदृष्ट्या Iसर्वात महाग असणाऱ्या शहरांची यादी तयार केली. त्यामध्ये अव्वल नंबरवर न्यूयॉर्क शहराचं नाव दिलं आहे. त्यामागोमाग कोणती शहरं आहेत हे जाणून घ्या. (फोटो : Reuters)

चीनमधील शेन्झेन हे शहराचं नाव यादीत आहे . यादीमध्ये हे शहर दहाव्या स्थानावर आहे. अभ्यासात समोर आलेल्या माहितीनुसार, आशियामध्ये वाढलेल्या परदेशी गुंतवणूकीमुळे वस्तू, सुविधा आणि निवास यांच्या गुणवत्तेमध्ये वाढ झाली आहे. (फोटो : Reuters)

अमेरिकेतील सुप्रसिद्ध शहर न्यूयॉर्क यानेसुद्धा टॉप 10 च्या यादीत नाव कोरलं आहे. डॉलरच्या जोरामुळे अमेरिकेतली अनेक शहरं शर्यतीमध्ये होती. पण, सर्वांना मागे टाकत न्यूयॉर्क यादीत समाविष्ट झालं आहे. (फोटो : Reuters)

चीनमधील आणखी एका शहराचं नाव यादीमध्ये आहे ते शहर म्हणजे बीजिंग. (फोटो : Reuters)

Loading...

तुर्कमेनिस्तानमधील अश्गबत हे शहरसुद्धा महाग आहे. या यादीसाठी करण्यात आलेल्या निरीक्षणात असं दिसलं की, चलन आणि आयातीवरील वाढता कर यामुळे यादीमध्ये हे शहर सातव्या क्रमांकावर आहे. (फोटो : Reuters)

चीनमधील पर्यटन, तंत्रज्ञान, अर्थव्यवस्था हे अव्वल नंबरवर आहे. त्यामुळेच चीनमधील तिसऱ्या शहराचा समावेश यादीत आहे. शांघाय हे शहर सहाव्या क्रमांकावर या यादीमध्ये आहे. या शहराचं राहणीमान अतिश उच्चभ्रू आहे आणि असं असलं तरी, अनेक कंपन्यांना या शहरात व्यवसाय करणे शक्य नाही. (फोटो : Reuters)

धरतीवरील स्वर्ग म्हणवल्या जाण्याऱ्या स्वित्झर्लंडमधील एका शहराचं नावही या यादीत आहे. झुरिच हे शहर आहे महागड्या शहरांमध्ये पाचव्या क्रमांकावर. युरोपातील हे एकमेव शहर आहे जे टॉप दहाच्या यादीमध्ये आलं आहे. त्याची अनेक कारणं आहेत. त्यापैकी एक म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवरील चालू असलेलं व्यापार युद्ध आणि डॉलरच्या तुलनेत कमजोर होत असलेलं स्थानिक चलन. (फोटो : Reuters)

साऊथ कोरिओमधील सेओल या शहराने चौथा क्रमांक पटकावला आहे. 2018 मध्ये करण्यात आलेल्या टॉप शहरांच्या यादीमध्ये सिओल पाचव्या क्रमांकावर होतं. (फोटो : Reuters)

सिंगापॉर हे शहर तिसऱ्या स्थानावर आहे. बेट असलेलं हे शहर मागिल वर्षात चौथ्या क्रमांकावर होतं. (फोटो : Reuters)

सिंगापूर हे शहर तिसऱ्या स्थानावर आहे. समुद्रातलं एक बेट असलेलं हे शहर मागील वर्षात चौथ्या क्रमांकावर होतं. (फोटो : Reuters)

जपानमधील टोकियो हे शहर दुसऱ्या क्रमांकावर आहे. जपानची राजधानी असणारं टोकियो शहर दुसऱ्या स्थानावर असण्याचं कारण म्हणजे राहणीमानाच्या गुणवत्तेमध्ये वाढ झाली आहे. (फोटो : Reuters)

सध्याच्या चलनाच्या दरानुसार स्थलांतरितांसाठी जगातलं सगळ्यात महाग शहर आहे हाँगकाँग. ते या यादीत पहिल्या स्थानावर आहे. (फोटो : Reuters)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 6, 2019 06:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...