दिवाळी धमाका : भारतीय कंपनीने लाँच केलं जगातलं सर्वात महागडं चॉकलेट, किंमत ऐकून व्हाल थक्क

दिवाळी धमाका : भारतीय कंपनीने लाँच केलं जगातलं सर्वात महागडं चॉकलेट, किंमत ऐकून व्हाल थक्क

दिवाळीच्या दिवसांत तुम्हाला खास चॉकलेटची खरेदी करायची असेल तर हा एक खास पर्याय आहे. तुम्ही सोन्याच्या मिठाईबद्दल ऐकलं असेल. तसंच हे जगातलं सगळ्यात महागडं चॉकलेट आहे.

  • Share this:

मुंबई, 23 ऑक्टोबर : भारतातल्या ITC कंपनीने जगातलं सगळ्यात महागडं चॉकलेट लाँच केलं आहे. दिवाळीच्या दिवसांत हे चॉकलेट खरेदी करण्यासाठी कितीजणांची झुंबड उडते ते पाहावं लागेल.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे चॉकलेट एका भारतीय कंपनीने लाँच केलं आहे. (World Most Expensive Chocolate)या चॉकलेटची किंमत एका किलोला सुमारे 4.3 लाख रुपये आहे. ITC ने फेबल ब्रँडमध्ये हे चॉकलेट लाँच केलंय. लाँचिंगनंतर लगेचच या चॉकलेटची नोंद गिनिज बुक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली.

हे चॉकलेट लाकडाच्या बॉक्समध्ये उपलब्ध होईल. यात 15 ग्रॅमची ट्रफल्स असतील. एका बॉक्सची किंमत सगळे कर धरून एक लाख रुपये आहे.

ITC चे अनुज रुस्तगी म्हणाले, या चॉकलेटच्या लाँचिंगमुळे फेबल कलेक्शनमध्ये एक नवा बेंचमार्क तयार झाला आहे. आम्ही भारतीय बाजारपेठेतच नाही तर जागतिक स्तरावर यश मिळवलं आहे.

(हेही वाचा : दिवाळीच्या आधी सोन्याला झळाळी, चांदीलाही आली चमक, हे आहेत आजचे दर)

ते सांगतात, दिवाळीच्या आधी हे चॉकलेट लाँच करण्याचं खास कारण आहे. आमचं चॉकलेट टनांमध्ये विकलं जाईल, अशी अपेक्षा नाही पण त्याला प्रतिसाद चांगला मिळेल.

ITC ने फेबल ब्रँडच्या अंतर्गत 2016 मध्ये प्रिमियम चॉकलेट्स लाँच केली. जगातल्या मोठ्या शहरातल्या लक्झरी हॉटेल्सना ही चॉकलेट्स पुरवली जातात. याच कंपनीने नुकतीच काही स्वस्त पण दर्जेदार चॉकलेट्सही लाँच केली आहेत.

===============================================================================

VIDEO: पुढचे 3-4 दिवस पावसाचे, पुण्यासह राज्यासाठी हवामान खात्याने वर्तवला 'हा' अंदाज

Published by: Arti Kulkarni
First published: October 23, 2019, 5:38 PM IST

ताज्या बातम्या