जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तीनं गर्लफ्रेंडसाठी घेतलं 552 कोटींचं घर, पाहा VIDEO

जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तीनं गर्लफ्रेंडसाठी घेतलं 552 कोटींचं घर, पाहा VIDEO

जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्ती जेफ बेजोसनं नवं घर खरेदी केलंय. या घरात 12 बेडरूम्स आहेत.

  • Share this:

मुंबई, 07 जून : जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्ती जेफ बेजोसनं नवं घर खरेदी केलंय. या घरात 12 बेडरूम्स आहेत. न्यूयाॅर्कच्या मॅनहॅटन भागात हे घर आहे. आपली पत्नी मॅकेंजीबरोबर घटस्फोट घेतल्यानंतर हे घर खरेदी केलंय. बेजोस या घरात गर्लफ्रेंड लाॅरेन सांचेजबरोबर राहणार आहे. या नव्या घरासाठी त्यानं 8 कोटी डाॅलर्स खर्च केले. त्याची भारतीय किंमत आहे 552 कोटी रुपये. बेजोसचं हे घर 17 हजार स्क्वेअर फीट आहे. त्याची कॅलिफोर्निया, टेक्सास आणि वाॅशिंग्टन इथेही घरं आहेत.

बेजोसच्या नव्या घरात काय आहे खास? - यात 12 बेडरूम्स, 1 पेंटहाउस आणि दोन फ्लॅट्स आहेत. हे पेंटहाउस तीन मजली आहे. बंगल्यात एक लाउंज, बॉर्डरूम, गोल्फ सिम्युलेटर, स्क्रीन रूम, गेम रूम आणि प्ले रूम आहेत. बेजोस अगोदर या घराला आपला दुसरा हेडक्वार्टर बनवायच्या विचारात होते. पण नंतर त्यानं हे रद्द केलं.

पोस्टात पैसे गुंतवायचेत? 'या' आहेत फायदेशीर योजना


मोदींच्या कार्यकाळात RBI नं केले मोठे बदल, आता वाचतील तुमचे पैसे


अमेरिकेच्या इतिहासात सर्वात महागडं घर - बेजोसनं हे घर 554 कोटी रुपयांमध्ये घेतलंय. मॅनहॅटनमध्ये ही रियल इस्टेट प्राॅपर्टीची मोठी किंमत नाही. या वर्षी जानेवारीत अब्जाधीश केन ग्रिफिननं इथे 1,650 कोटींना घर खरेदी केलं. हे घर अमेरिकन इतिहासात सर्वात महागडं घर आहे.

दर महिन्याला मिळवा 60 हजार रुपये पेन्शन, मोदी सरकारच्या योजनेचा घ्या फायदा

बेजोस यशस्वी उद्योगपती आहेत. कधी काय करायचं त्यांना अंदाज असतो. हेच घर जर त्यांनी 2017मध्ये खरेदी केलं असतं तर 668 कोटी रुपयांना पडलं असतं. आता तिथे प्राॅपर्टीच्या किमती 21 टक्क्यांनी कमी झाल्यात.


VIDEO : शिवीगाळ करत स्थानिक आणि परप्रांतीय पुरोहितांच्या दोन गटात तुफान हाणामारी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 7, 2019 06:57 PM IST

ताज्या बातम्या