मराठी बातम्या /बातम्या /मनी /Architectural Style साठी जगप्रसिद्ध आहेत 'ही' मंदिरं; एकदा तरी भेट नक्की द्या

Architectural Style साठी जगप्रसिद्ध आहेत 'ही' मंदिरं; एकदा तरी भेट नक्की द्या

वास्तुकलेमध्ये इमारती आणि प्रकल्पांव्यतिरिक्त मानवी जीवनातील जवळपास सर्व पैलूंचा समावेश होतो.

वास्तुकलेमध्ये इमारती आणि प्रकल्पांव्यतिरिक्त मानवी जीवनातील जवळपास सर्व पैलूंचा समावेश होतो.

वास्तुकलेमध्ये इमारती आणि प्रकल्पांव्यतिरिक्त मानवी जीवनातील जवळपास सर्व पैलूंचा समावेश होतो.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई: दरवर्षी ऑक्टोबर महिन्यातील पहिल्या सोमवारी जागतिक स्थापत्य दिन साजरा केला जातो. या निमित्त महान जागतिक वास्तुशिल्प नमुन्यांचं स्मरण केलं जातं. वास्तुकलेमध्ये इमारती आणि प्रकल्पांव्यतिरिक्त मानवी जीवनातील जवळपास सर्व पैलूंचा समावेश होतो. याचा आपल्या समाजावर खूप मोठा प्रभाव आहे.

    वास्तुकलेनं मानवजातीच्या प्रगतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. इंटरनॅशनल युनियन ऑफ आर्किटेक्ट्स या संस्थेने 1985 मध्ये जागतिक स्थापत्य दिनाची सुरुवात केली. भारतात, प्राचीन काळापासून मंदिरांच्या रूपात स्थापत्यशास्त्राला वाव मिळालेला आहे.

     थार रेगिस्तान के गेरू रंग के परिदृश्य के बीच ये एक बीते युग के अवशेष हैं. जैसलमेर में बड़ा बाग मंदिर, राजस्थान की रॉयल्टी की याद में बनाया गया है. जो विशिष्ट राजस्थानी वास्तुकला की एक झलक देता है. इमसें गोल पतले खंभे हैं और बलुआ पत्थर की नक्काशी है. (फोटो ANI)

    भारतात अशी अनेक आश्चर्यकारक मंदिरं आहेत जी तिथल्या देवतांसाठीच नाही, तर मंदिरांच्या संरचनेसाठीदेखील प्रसिद्ध आहेत. देशातील वेगवेगळ्या प्रदेशात प्राचीन राजवटी आणि राज्यांची अभिरुची व श्रद्धा दर्शवणारी अनेक अद्वितीय मंदिरं आहेत. अशाच काही भव्य मंदिरांची माहिती आपण जाणून घेऊया.

     मीनाक्षी मंदिर, जिसे मीनाक्षी-सुंदरेश्वर मंदिर के नाम से भी जाना जाता है. यह द्रविड़ वास्तुकला का एक प्रमुख उदाहरण है, जो भारत के दक्षिणी राज्यों में आम हिंदू वास्तुकला की एक शैली है. यह हिन्दू देवता शिव (“सुन्दरेश्वरर” या सुन्दर ईश्वर के रूप में) एवं उनकी भार्या देवी पार्वती (मीनाक्षी या मछली के आकार की आंख वाली देवी के रूप में) दोनो को समर्पित है. (फोटो ANI)

    राजस्थानमधील जैसलमेर येथे एक भव्य 'बाग मंदिर' आहे. थर वाळवंटातील गेरू रंगाचं हे मंदिर जुन्या काळाची साक्ष देत आजही उभं आहे. राजस्थानमधील राजघराण्याच्या स्मरणार्थ हे मंदिर बांधलं गेलं आहे. ज्यामध्ये पारंपरिक राजस्थानी वास्तुकलेचं प्रतिबिंब दिसतं. मंदिरात गोलाकार खांब आणि वाळूच्या दगडात नक्षीकाम केलेलं आहे.

    दक्षिण भारतातील मंदिरं आपल्या अनोख्या द्रविड स्थापत्यशैलीसाठी प्रसिद्ध आहेत. त्यामध्ये मदुराई येथील मीनाक्षी मंदिराचा प्रामुख्याने समावेश होतो. या मंदिराला 'मीनाक्षी-सुंदरेश्वर' या नावानंही ओळखलं जातं. मीनाक्षी मंदिर हे द्रविड वास्तुकलेचं एक प्रमुख उदाहरण आहे. हे मंदिर, हिंदू देवता शिव (सुंदरेश्वर) आणि त्यांची पत्नी देवी पार्वती (मीनाक्षी म्हणजे जिचे डोळे माशांच्या आकाराचे आहेत अशी देवी) या दोघांनाही समर्पित आहे.

      कोणार्क में सूर्य मंदिर, जो सात घोड़ों द्वारा उठाए गए विशाल रथ के आकार में है. यह वास्तुकला की पारंपरिक ओडिशा शैली को प्रदर्शित करता है, जिसे कलिंग वास्तुकला के रूप में भी जाना जाता है. यह मन्दिर सूर्य देव को समर्पित है, जिन्हें स्थानीय लोग 'बिरंचि-नारायण' कहते थे. (फोटो ANI)

    कोणार्क येथील सूर्य मंदिर जगप्रसिद्ध आहे. सात घोडे जुंपलेल्या विशाल रथाच्या आकारातील हे मंदिर आहे. कलिंग वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. पारंपरिक ओडिशा वास्तुकलेमध्ये या मंदिराची निर्मिती केलेली आहे. कोणार्कचं मंदिर सूर्यदेवाला समर्पित आहे. स्थानिक लोक सूर्यदेवाला 'बिरांची-नारायण' असंही म्हणत.

    चोल राजांनी आपल्या कार्यकाळात अनेक भव्य मंदिरांची उभारणी केली. तंजावर येथील बृहद्देश्वर मंदिराचाही त्यामध्ये समावेश होतो. चोल साम्राज्याच्या काळात बांधलेलं हे मंदिर शंकराचं आहे. हे प्रसिद्ध मंदिर तमीळ स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. त्यात कोरीव खांब आणि मोठी गोपुरं (गेटहाउस) आहेत. ज्यांचा प्रवेशद्वार म्हणून वापर होतो. ग्रेनाइटपासून बनवलेलं हे जगातील पहिलं आणि एकमेव मंदिर आहे.

      विट्ठल मंदिर, हम्पीविट्ठल मंदिर हम्पी का सबसे असाधारण वास्तुशिल्प शोपीस है. अद्भुत ध्वनिकी वाले प्रसिद्ध संगीत स्तंभों का आवास, यह मंदिर परिसर की दीवारों और गेटवे टावरों के साथ एक विशाल परिसर के रूप में बनाया गया है. तुंगभद्रा नदी के दक्षिण किनारे पर स्थित यह मंदिर मूल दक्षिण भारतीय द्रविड़ मंदिरों की स्थापत्य शैली का प्रतिनिधित्व करता है. (फोटो ANI)

    कर्नाटक राज्यातील हंपी हे ठिकाण आपल्या स्थापत्यकलेच्या वास्तूंसाठी प्रसिद्ध आहे. हंपीतील विठ्ठल मंदिर हे तेथील सर्वांत विलक्षण वास्तुशिल्प आहे. विस्तीर्ण जागेवर ध्वनीशास्त्राचा आश्चर्यकारक वापर करून हे मंदिर बांधण्यात आलं आहे. या मंदिरातील संगीत स्तंभ, भिंती, टेहाळणी मनोरे लोकांच्या आकर्षणाचं केंद्र आहेत. तुंगभद्रा नदीच्या दक्षिण तीरावर वसलेलं हे विठ्ठल मंदिर दक्षिण भारतीय द्रविड स्थापत्य शैलीचं प्रतिनिधित्व करतं.

    वरील सर्व मंदिरं आपल्या विलक्षण स्थापत्यशैलीमुळे जगप्रसिद्ध आहेत. दरवर्षी जगभरातील अनेक पर्यटक आणि भाविक या मंदिरांना भेटी देतात.

    First published: