कामाचे तास वाढणार! 12 तासांपर्यंत असतील Working Hours, संसदेत पोहोचला प्रस्ताव

कामाचे तास वाढणार! 12 तासांपर्यंत असतील Working Hours, संसदेत पोहोचला प्रस्ताव

दिवसाला 12 तास काम, मात्र आठवड्यातील 48 तास अनिवार्य...कसं असेल गणित?

  • Share this:

नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर : कामगार मंत्रालयाने (Ministry of labor) संसदेत नुकतीच एक संहिता पास केली आहे. त्यानुसार कामाच्या तासांमध्ये ( Working Hours) वाढ करुन 12 तास प्रतिदिवस करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. सध्या एका दिवसात 8 तासांपर्यंत काम करावे लागते. मंत्रालयाने व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाच्या अटी (ओएसएच) संहिता 2020 च्या समूदा नियमाअंतर्गत अधिकतम 12 तास काम करण्याचा प्रस्ताव दिला आहे.

या दरम्यान ब्रेकचाही समावेश आहे. 19 नोव्हेंबर 2020 रोजी अधिसूचित केलेल्या या मसूद्यात आठवड्यातील कामाचे तास 48 इतके ठेवण्यात आले आहे. सध्याच्या नियमांनुसार आठवड्यातील एक दिवस सुट्टी आणि 6 दिवसातील प्रत्येक दिवशी 8 तास कामाचे असतात. कामगार मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितलं की, ही पद्धत भारतातील परिस्थिती पाहून ठरविण्यात आली आहे. या मध्ये दिवसभरातील काम वाटून दिलेलं आहे. यामुळे कामगाराला ओव्हरटाइमच्या भत्त्याच्या माध्यमातून अधिक कमवण्याची सुविधा मिळेल. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, आम्ही मसूदा नियमांमध्ये महत्त्वाच्या पैलूंकडे लक्ष दिलं आहे. त्यात 8 तासांहून अधिक काम करणाऱ्या सर्व कामागारांना ओव्हरटाइम मिळू शकेल.

हे ही वाचा-भारतीय रेल्वेबरोबर सुरू करा हा व्यवसाय, दर महिन्याला होईल लाखोंची कमाई

ओएसएच संहिताच्या मसूदा नियमांनुसार कोणत्याही दिवशी ओव्हरटाइममध्ये 15 ते 30 मिनिटांची वेळ 30 मिनिटांपर्यंत धरली जाईल. सध्याच्या व्यवस्थेनुसार 30 मिनिटाच्या कमी काळासाठी ओव्हरटाइम धरला जाणार नाही. मसुद्यानुसार कोणताही व्यक्ती कमीत कमी अर्ध्या तासाच्या मध्यांतराशिवाय 5 तासांहून अधिक सतत काम करणार नाही. आठवड्यानुसार कामाचे तास अशा स्वरुपात आखले जातील, ज्यात आठवड्यातील कामाचे तास 48 इतके राहतील.

मसुदेतील नियमांनुसार कोणत्याही कामगाराला आठवड्यात 48 पेक्षा जास्त वेळ काम करण्याची आवश्यकता नाही. शिवाय असं करण्याची परवानगीही दिली जाणार नाही. कामाच्या तासांची अशा प्रकारे आखणी करावी लागेल ज्यात ब्रेकच्या वेळेसह कोणत्याही दिवशी कामाचे तास 12 हून अधिक असता कामा नये.

Published by: Meenal Gangurde
First published: November 21, 2020, 3:55 PM IST
Tags:

ताज्या बातम्या