मराठी बातम्या /बातम्या /मनी /

आयटी क्षेत्रात वरदान ठरतंय Work From Home; कंपन्यांसह 'या' कर्मचाऱ्यांनाही मोठा फायदा

आयटी क्षेत्रात वरदान ठरतंय Work From Home; कंपन्यांसह 'या' कर्मचाऱ्यांनाही मोठा फायदा

Work From Home Culture: आता अनलॉक झालेलं आहे तरी देखील वर्क फ्रॉम होम करून घेण्यावर आयटी कंपन्यांनी भर दिल्याचं चित्र आहे. यामुळं नवजात मुलांच्या माता आणि दिव्यांग व्यक्तींना देखील काम करण्याची संधी मिळत आहे.

Work From Home Culture: आता अनलॉक झालेलं आहे तरी देखील वर्क फ्रॉम होम करून घेण्यावर आयटी कंपन्यांनी भर दिल्याचं चित्र आहे. यामुळं नवजात मुलांच्या माता आणि दिव्यांग व्यक्तींना देखील काम करण्याची संधी मिळत आहे.

Work From Home Culture: आता अनलॉक झालेलं आहे तरी देखील वर्क फ्रॉम होम करून घेण्यावर आयटी कंपन्यांनी भर दिल्याचं चित्र आहे. यामुळं नवजात मुलांच्या माता आणि दिव्यांग व्यक्तींना देखील काम करण्याची संधी मिळत आहे.

मुंबई, 16 ऑक्टोबर: जवळपास गेल्या दोन वर्षांपासून जगभरात कोरोनाने (Coronavirus Pandemic in India) धुमाकूळ घातला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर लॉकडाऊन (Coronavirus Lockdown) करण्यात आलं. लॉकडाऊनमध्ये ज्या कंपन्यांना घरून काम करून घेणं शक्य होत त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी 'वर्क फ्रॉम होम'चा (Work From Home) पर्याय खुला करून दिला. अशा कंपन्यांमध्ये प्रामुख्यानं आयटी (Work From Home in IT Companies)  कंपन्यांचा समावेश होतो. लॉकडाऊनपूर्वी देखील आयटी कंपन्यांमध्ये काही प्रमाणात वर्क फ्रॉम होम अस्तित्वात होतं. मात्र, लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर या कंपन्यांनी आपला बहुतांश कारभार घरूनच सुरू केला. आता अनलॉक झालेलं आहे तरी देखील वर्क फ्रॉम होम करून घेण्यावर आयटी कंपन्यांनी भर दिल्याचं चित्र आहे. यामुळं नवजात मुलांच्या माता आणि दिव्यांग व्यक्तींना देखील काम करण्याची संधी मिळत आहे.  या गोष्टीचा समाजावर सकारात्मक परिणाम होत असल्याची माहिती केरळ आयटी पार्कचे (Kerala IT Park) मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) जॉन एम थॉमस यांनी दिली. TV9 ने याबाबत वृत्त दिलं आहे.

वाचा-Gold Price: ₹48,000 पेक्षा कमी झाले सोन्याचे दर, आता गुंतवणुकीची योग्य संधी?

अनलॉकनंतर आता हळूहळू सर्व उद्योगधंदे पुन्हा पूर्वपदावर येत आहेत. 18 महिन्यांपेक्षा जास्त काळ घरातून काम केल्यानंतर कर्मचारी आता त्यांच्या ऑफिसमध्ये परतत आहेत. केरळमधील कंपन्या पुढील वर्षाच्या सुरुवातीला कोविड -19 निर्बंधांमध्ये शिथिलता देऊन आणि कर्मचाऱ्यांचं लसीकरण पूर्ण करून पुन्हा ऑफिसमधून काम सुरू करण्याचा विचार करत आहेत. मात्र, आयटी कंपन्या घर आणि ऑफिस अशा दोन्ही ठिकाणाहून काम सुरू ठेवण्याचा विचार करत आहेत, अशी माहिती जॉन एम थॉमस यांनी दिली. यामागची कारणं देखील त्यांनी स्पष्ट केली आहेत.

नवजात मुलांच्या माता आणि दिव्यांगांसाठी फायदेशीर WFH

थॉमस यांनी शुक्रवारी (15 ऑक्टोबर) जारी केलेल्या एका निवेदनात म्हटलं आहे की, 'वर्क फ्रॉम होम'ला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. या गोष्टीचा आयटी क्षेत्र आणि समाजावर सकारात्मक परिणाम झाला आहे. वर्क फ्रॉम होममुळं नवजात मुलांच्या माता आणि दिव्यांग व्यक्तींना फायदा झाला आहे. ते घरून आपल काम करू शकत आहेत. अशा कर्मचाऱ्यांची भर पडल्यानं एकूणच कर्मचारी संख्या देखील वाढली आहे. याशिवाय शहरांमधील ट्रॅफिक समस्या देखील काही प्रमाणात कमी झाली आहे.'

वाचा-Adani Group च्या या कंपनीचा IPO येणार, SEBI ने दिली मंजुरी; कमाईची सुवर्णसंधी!

आयटी क्षेत्रामध्ये वर्क फ्रॉम होमचे फायदे दिसत असले तरी त्याचे काही तोटे देखील समोर आले आहेत. काही लोकांना घरी काम केल्यामुळं मानसिक तणावाला सामोर जावं लागल आहे. आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्सच्या मते, महामारीमुळे लोकांच्या शारीरिक तसंच मानसिक आरोग्यासंबंधीच्या संकल्पना पूर्णपणे बदलल्या गेल्या आहेत. 86 टक्के लोक आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी विविध गोष्टी करण्यामध्ये गुंतलेले आहेत. 'पोस्ट कोविड' या नावानं ओळखल्या जाणाऱ्या स्थितीमध्ये लोकांच्या एकूणच आरोग्यावर काय फरक पडला आहे यासाठी आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्सनं (ICICI Lombard General Insurance) केलेल्या सर्व्हेमध्ये ही बाब समोर आली आहे.

आरोग्यासंदर्भात जागरुकता वाढली

शारीरिक तसंच मानसिक आरोग्यासंबंधीच्या वर्तनातील एकूण बदल समजून घेण्यासाठी, आयसीआयसी लोम्बार्ड जनरल इन्शुरन्सनं 1 हजार 532 हून अधिक नागरिकांची माहिती घेऊन एक राष्ट्रीय सर्व्हे केला आहे. विविध मेट्रो शहरांमध्ये राहून वर्क फ्रॉम होम केलेल्या नागरिकांचा यामध्ये समावेश आहे. कोविडनंतरच्या काळात निरोगी आयुष्य जगण्याबाबत लोक जागृक होत असल्याचं चित्र आहे. त्यामुळं हेल्थ आणि वेलनेस उत्पादनांचा वापर करण्याकडे नागरिकांचा कल वाढत आहे. त्याचप्रमाणे, हेल्थ इन्शुरन्सच (Health insurance) देखील महत्त्व वाढत असल्याचं सर्व्हेतून समोर आलं. सर्व्हेत सहभागी झालेल्या 3 पैकी दोघांना चांगल्या जीवनशैलीचं महत्त्व माहीत होतं. पण जे थोड्या प्रमाणात घरून काम करत होते त्यांच्या मनावर कोविडमुळे परिणाम झाल्याचं या सर्व्हेमध्ये लक्षात आलं. तर, 89 टक्के लोकांनी आपल्या कंपनीकडे हेल्थ आणि वेलफेअर प्रोग्राम सुरू करण्याची मागणी केली. तर केवळ 75 टक्के लोक आपल्या कंपनीकडून मिळणाऱ्या वागणूक आणि सुविधांमध्ये समाधानी दिसले.

First published:

Tags: Corona, Corona updates, Lockdown, Work from home