Home /News /money /

क्रिप्टो ट्रेडिंगमध्ये 2021मध्ये मोठी वाढ, महिलांची Bitcoin तर पुरुषांनी Shiba Inuमध्ये ट्रेडिंगला पसंती

क्रिप्टो ट्रेडिंगमध्ये 2021मध्ये मोठी वाढ, महिलांची Bitcoin तर पुरुषांनी Shiba Inuमध्ये ट्रेडिंगला पसंती

क्रिप्टोमधील व्यापार आणि गुंतवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं या सर्व्हेमध्ये लक्षात आलं आहे. वझीर एक्सच्या एकूण युजर्सपैकी (WazirX users) 66 टक्के युजर्स हे 35 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत.

    मुंबई, 17 डिसेंबर : बिनान्स सपोर्टेड वझीर एक्सनं (WazirX) 2021 मध्ये 43 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त किंमतीचा व्यवसाय केला आहे, असं निरीक्षण बंगळुरू स्थित क्रिप्टो एक्सचेंजनं नोंदवलं आहे. क्रिप्टो एक्सचेंजनं याबाबत एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. बिटकॉईन (Bitcoin), टेथर (Tether USDT), शिबा आयनयू (Shiba Inu), डॉजकाईन (Dogecoin), वझीर एक्स टोकन (WazirX) आणि मॅटिक (MATIC) या क्रिप्टोंमध्ये एक्सचेंजवर सर्वाधिक गुंतवणूक करण्यात आली. यापैकी वझीर एक्सच्या युजर्सची संख्या 10 मिलियनपेक्षा जास्त झाली आहे, असंही या अहवालात म्हटलं आहे. हायलाईट्स अँड ऑब्झर्वेशन फ्रॉम 2021: द इयर ऑफ क्रिप्टो (Highlights & Observations From 2021: The Year Of Crypto) अस या अहवालाचं नाव आहे. क्रिप्टो अहवालाचा आधार घेऊन वझीर एक्सनंदेखील एक युजर सर्व्हे (user survey) केला आहे. या सर्व्हेतील 51 टक्के युजर्सनी आपल्याला मित्र आणि कुटुंबातील सदस्यांकडून क्रिप्टोच्या वापराबाबत मिळालेले सल्ले (crypto-based recommendations) ऐकून क्रिप्टोमध्ये ट्रेडिंग सुरू केल्याचं सांगितलं. सर्व्हेतील 44 टक्के युजर्सच्या एकूण गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये (investment portfolio) 10 टक्के क्रिप्टोचा समावेश असल्याचं दिसून आलं. सर्वात महत्वाचं म्हणजे, यावर्षात वझीरएक्सच्या महिला वापरकर्त्यांच्या (female users) संख्येत 1009 टक्क्यांनी वाढ झाली आहे तर पुरुष वापरकर्त्यांच्या संख्येत 829 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. महिलांनी बिटकॉइनमध्ये ट्रेडिंगला पसंती दर्शवली असून पुरुषांनी मात्र शिबा इनूला जास्त पसंती दिली आहे असं या सर्व्हेतील एक निरीक्षण आहे. क्रिप्टोमधील व्यापार आणि गुंतवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं या सर्व्हेमध्ये लक्षात आलं आहे. वझीर एक्सच्या एकूण युजर्सपैकी (WazirX users) 66 टक्के युजर्स हे 35 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. सर्व्हेमध्ये सहभागी झालेले 54 टक्के युजर्स क्रिप्टो स्पेसमध्ये (crypto space) करिअर करण्यास इच्छुक आहेत. यातील बहुतेकांना Entrepreneurship, फायनान्स आणि बिझनेस डेव्हलपमेंटमध्ये रस आहे. फिटनेसवर लक्ष देणाऱ्यांसाठी खास SBI Pulse card; वेलकम बेनिफिट म्हणून 4999 रुपयांचं स्मार्टवॉच फ्री अहवालानुसार, यावर्षी क्रिप्टोला महानगरं आणि टियर-I शहरांसोबतच लहान शहरांमध्येही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. गुवाहाटी, करनाल, बरेली यांसारख्या लहान शहरांमधून क्रिप्टो ट्रेडिंगमध्ये सहभागी होणाऱ्यांच्या संख्येत 700 टक्क्यांनी वाढ झाली आहे. याशिवाय WazirX NFT मार्केटप्लेसनं 962 पेक्षा जास्त क्रिएटर्सना, 2021 मध्ये 12 हजार 600 NFT निर्मिती करण्याची संधी दिली. त्यापैकी पाच हजार 267 पेक्षा जास्त NFTची दोन लाख 62 हजार 896 WRXला (2.4 कोटी रुपये) विक्री झाली आहे. काही टॉप ट्रेडिंग NFTs मध्ये Mvmnt कलेक्शन, क्रिप्टो कराडी कलेक्शन, क्रिप्टो मँक्स आणि मेटावासी कलेक्शन - अभीशेप्स, यश श्याते - सायबर मिथिक्स, मिलनझार्ट - सायबर स्कल फोर्स कलेक्शन यांचा समावेश होतो. दरम्यान, मेटाव्हर्स अॅप्स हे मुख्य प्रवाहात आल्याने DeFi, NFTs, GameFi यांचा वापर वाढू शकेल अशी वझीरएक्सला अपेक्षा आहे. DeFi, NFTs, GameFi यामध्ये वापरकर्ते डेटा विकत घेऊन व्हर्च्युअल इकॉनॉमीत मोठी कमाई करू शकतात. एका वर्षात पेनी स्टॉकमुळे गुंतवणूकदारांचे 1 लाख बनले 20 लाख; तुमच्याकडे आहे का? वझीर एक्सचे सीईओ निश्चल शेट्टी म्हणाले की, “लोक आता क्रिप्टोकरन्सीकडे एक पर्यायी संपत्ती म्हणून पाहत आहेत. सरकार देखील क्रिप्टोकरन्सीवर रेग्युलेशन्स लावण्याच्या विचारात आहे. त्यामुळे भारत हा क्रिप्टोकरन्सी व्यवहार करणाऱ्या इतर प्रगत देशांच्या पंक्तीत जाऊन बसेल. सरकारचा पाठिंबा आणि संस्थांचा सहभाग योग्य प्रमाणात मिळाल्यास देशातील या लोकप्रिय होत असणाऱ्या संपत्तीचे भविष्य आणखी उज्ज्वल असेल, याची भारताला आणखी आत्मनिर्भर होण्यासही मोठी मदत होईल.” दरम्यान, बहुप्रतीक्षित क्रिप्टो रेग्युलेशन बिल (crypto regulation bill) संसदेत येण्यास उशीर होण्याची शक्यता आहे. 2022 मध्ये जानेवारीच्या अखेरीस किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीपर्यंत हे बिल संसदेत सादर केलं जाणार नाही, असं वृत्त माध्यमांनी दिलं आहे.
    First published:

    Tags: Cryptocurrency, Investment

    पुढील बातम्या