मराठी बातम्या /बातम्या /मनी /

एका फोटोनं बददलं आयुष्य; मुंबईच्या 77 वर्षाच्या आजीनं सुरू केला व्यवसाय, महिन्याला कमवतायेत 3 लाख

एका फोटोनं बददलं आयुष्य; मुंबईच्या 77 वर्षाच्या आजीनं सुरू केला व्यवसाय, महिन्याला कमवतायेत 3 लाख

या वयात स्वतःचा व्यवसाय सुरू करणाऱ्या (Women Start Business of Homemade Food) आजीबाईंची कथा अत्यंत भावनिक आहे. लग्नानंतर काही वर्षातच इमारत कोसळल्यानं त्यांच्या अडीच वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला. यानंतर काही वर्षातच त्यांच्या दोन्ही मुलांचाही मृत्यू झाला.

पुढे वाचा ...
  • Published by:  Kiran Pharate

मुंबई 25 एप्रिल : 77 वर्षीय आजीबाई उर्मिला जमनादास आशेर यांचा दिवस रोज सकाळी 5.30 वाजताच सुरू होतो. त्या आपली सुनबाई राजश्री आणि नातासाठी चहा आणि नाश्ता बनवतात आणि मग वृत्तपत्र वाचत बसतात. यानंतर त्या त्यांच्या 'गुज्जू बेन ना नास्ता' या नाश्त्याच्या दुकानात (Women Start Business of Homemade Food) आलेल्या मुंबईतल्या लोकांच्या ऑर्डर पूर्ण करण्यासाठी स्वादिष्ट असं जेवण बनवतात.

राजश्रीसह आणखी दोन लोकांची मदत घेऊन दुपारपर्यंत या ऑर्डर देण्यास त्या सुरुवात करतात. भारतातील अनेक महिला घरच्या घरी जेवण बनवून ऑर्डर घेत असतात. मात्र, उर्मिला आजींची कथा जरा वेगळी आहे. उर्मिला यांनी आयुष्यातला संघर्ष आणि त्रास कमी करण्यासाठी वयाच्या 77 व्या वर्षी हा व्यवसाय सुरू केला आहे.

लग्नानंतर काही वर्षातच इमारत कोसळल्यानं त्यांच्या अडीच वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला. यानंतर काही वर्षातच त्यांच्या दोन्ही मुलांचाही मृत्यू झाला. त्यांच्या एका मुलाला ब्रेन ट्यूमर होता, तर दुसऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. अशात उर्मिला यांच्याकडे केवळ त्यांचा नातू हर्षच राहिला होता.

हर्षनं 2012 मध्ये एमबीए पूर्ण केलं आणि भारतातील पर्यटनाला चालना देण्यासाठी ओमान मंत्रालयासोबत काम केलं, 2014 मध्ये त्यांनी वाणिज्य दूतावास आणि व्यापाऱ्यांच्या वाणिज्य दूतावासांना सहकार्य करण्यासाठी आपली नोकरी सोडली. 2019 मध्ये एका दुर्घटनेमध्ये हर्षला आपला वरचा ओठ गमवावा लागला. या घटनेनंतर घराच्या बाहेर निघणं हर्ष टाळत होते आणि डिप्रेशनमध्ये गेले होते, असं त्यांनी सांगितलं. अशात घराची आर्थिक परिस्थिती बिकट झाली होती. अशात आजीनं हर्षला विश्वास दिला.

मागील वर्षी लॉकडाऊनदरम्यान हर्ष आपली आजी उर्मिला जमनादास यांच्यासोबत होते. उर्मिला जमनादास गुजराती लोणचं अतिशय चविष्ट बनवत. हर्षनं आपल्या आजीनं बनवलेल्या या लोणच्याचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आणि याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला.

हर्षनं सांगितलं, की जेव्हा मागणी वाढली तेव्हा आम्ही प्रोडक्टही वाढवले. लोणच्यासोबतच गरम नाश्तादेखील ते लोकांना पोहोच करू लागले. हळूहळू व्यवसाय वाढत गेला आणि त्यांनी 'गुज्जू बेन ना नास्ता' नावानं एक दुकानही सुरू केलं. या नावाचा अर्थ असा होता, की गुजराती बहिणीच्या हातचा नाश्ता. लोक दुकानात येऊन तसंच ऑनलाईन या पदार्थांची ऑर्डर देतात. गरम नाश्त्याची ऑर्डर केवळ मुंबईकरांचीच घेतली जाते. मात्र, चिप्स, लोणचं, कुकीज, खाखरा हे पदार्थ मुंबईबाहेरही विकले जातात.

हे सर्व पदार्थ उर्मिला आजी स्वतः बनवतात. तर, हर्ष मार्केटिंगचं काम पाहातो. याशिवाय त्यांनी दोन महिला आणि तीन मुलांनाही कामासाठी ठेवलं आहे. उर्मिला यांच्या दोन्ही सुनादेखील या कामात त्यांची मदत करतात. आता प्रत्येक महिन्याला या व्यवसायातून त्या 2 ते 3 लाखाची कमाई करतात.

First published:

Tags: Business News, Food, Money, Small business