मराठी बातम्या /बातम्या /मनी /

कोविड काळात मोबाइलमधील UMANG अ‍ॅप वापरुन काढता येईल PF Advance, वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

कोविड काळात मोबाइलमधील UMANG अ‍ॅप वापरुन काढता येईल PF Advance, वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

PF Account

PF Account

तुमच्या मोबाइलवरून उमंग (UMANG) अ‍ॅपद्वारे पीएफ अकाउंटमधून अ‍ॅडव्हान्स पैसे काढू शकता. त्यासाठी तुम्हाला फक्त काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

मुंबई, 22 जानेवारी: सध्या देश कोरोना (Covid-19) महामारीच्या तिसऱ्या लाटेचा सामना करत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अनेक नोकरदारांना हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी लागणाऱ्या पैशांची चणचण भासू लागली आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत नोकरदारांवर आलेला आर्थिक भार कमी करण्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) गेल्या वर्षी ईपीएफ (EPF) सदस्यांना त्यांच्या ईपीएफ अकाउंटमधून अ‍ॅडव्हान्स ( advances) रक्कम काढण्याची परवानगी दिली. कामगार मंत्रालयाने ( Labor Ministry) तसं स्पष्ट केलं होतं. तुम्हीदेखील तुमच्या मोबाइलवरून उमंग (UMANG) अ‍ॅपद्वारे पीएफ अकाउंटमधून अ‍ॅडव्हान्स पैसे काढू शकता. त्यासाठी तुम्हाला फक्त काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

ईपीएफओ अकाउंटमधून उमंग अ‍ॅपद्वारे असे काढता येतील पैसे

- उमंग अ‍ॅपवर लॉग इन करा

- EPFO ऑप्शन निवडा

- Employee Centric Services यावर क्लिक करा

- Raise Claim हा ऑप्शन निवडा

- तुमचा UAN तपशील भरा आणि तुमच्या अकाउंटमध्ये लॉग इन करण्यासाठी वन-टाइम पासवर्ड (OTP) प्राप्त करण्यासाठी 'Get OTP' वर क्लिक करा.

- ओटीपी टाका आणि लॉगिन पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या बँक अकाउंट नंबरचे शेवटचे चार अंक टाका. ड्रॉप डाउन मेनूमधून सदस्य आयडी निवडा. त्यानंतर 'Proceed for claim' वर क्लिक करा.

- तुम्हाला तुमच्या पत्त्याबाबतची माहिती भरावी लागेल. योग्य माहिती भरल्यानंतर 'नेक्स्ट'वर क्लिक करा.

- चेक इमेज अपलोड करा. एकदा सर्व तपशील आणि आवश्यक माहिती भरल्यानंतर तुमचा क्लेम फाइल केला जाईल.

हे वाचा-बेरोजगार, गरीबांसाठी केंद्र सरकार योजना आणण्याच्या तयारीत; थेट खात्यात येतील पैस

भारतामध्ये कोरोनाचा फैलाव होऊन आता दोन वर्षं होऊन गेली. या महामारीमुळे अनेक जण आर्थिक संकटात सापडले. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून लॉकडाउन करण्यात आलं. लॉकडाउन काळात अनेकांचे रोजगार गेले व त्यांच्यावर अचानक आर्थिक संकट कोसळलं. अचानक नोकरी गेल्यामुळे आणि नवीन नोकरी मिळण्याची शाश्वती नसल्यामुळे आर्थिक अडचणीतून बाहेर कसं यायचं, असा प्रश्न अनेकांसमोर पडला होता. त्यातच घरातल्या कोणाला कोरोना संसर्ग झाल्यास त्याचा हॉस्पिटलचा खर्च कसा करायचा, असा प्रश्नही अनेकांसमोर उभा राहिला होता.

कोरोना संकटामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या पीएफ सदस्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. कारण कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी संघटनेने पीएफ अकाउंटमधून अ‍ॅडव्हान्स काढण्याची परवानगी दिली. रोजगार गमावलेल्या किंवा वेतन कपात झालेल्यांना या निर्णयामुळे निधीची मदत होऊ शकते. आता कोरोनाची तिसरी लाट पुन्हा सुरू झाली आहे. अशा वेळी पुन्हा एकदा पीएफ अकाउंटचा हातभार लागू शकतो

First published:

Tags: Epfo news, Pf, Pf news