'या' व्यवसायाला आहे खूप मागणी, महिन्याला कमवाल 40 हजार रुपये

तुम्ही घरबसल्याही हा व्यवसाय करू शकता. जवळजवळ 70 हजार भांडवलात तुम्ही व्यवसायाची सुरुवात करू शकता.

News18 Lokmat | Updated On: Apr 16, 2019 01:05 PM IST

'या' व्यवसायाला आहे खूप मागणी, महिन्याला कमवाल 40 हजार रुपये

मुंबई, 16 एप्रिल : कॅज्युएल वेअर म्हणून हल्ली बरेच स्त्री-पुरुष टी शर्ट घालतात. अगदी आॅफिसमध्येही टी शर्ट वापरला जातो. तुम्हाला कमी भांडवलात व्यवसाय करायचा असेल तर टी शर्ट पेंटिंगचा व्यवसाय उत्तम आहे. कारण वेगवेगळ्या प्रिंटच्या टी शर्टची बाजारात मागणी आहे.

अनेक शाळा आपल्या विद्यार्थ्यांसाठी टी शर्ट प्रिंट करून घेतात. कंपनीज आपल्या कर्मचाऱ्यांसाठी टी शर्ट प्रिंट करून घेतात. काही जण त्यांना आवडेल असं काही टी शर्टवर प्रिंट करून घेतात.

त्यामुळे या व्यवसायात फायदा आहे. तुम्ही घरबसल्याही हा व्यवसाय करू शकता. जवळजवळ 70 हजार भांडवलात तुम्ही व्यवसायाची सुरुवात करू शकता. त्यामुळे तुम्हाला 30 ते 40 हजार दर महिन्याला कमाई होऊ शकते.

मुंबईची कंपनी Indian Dyes Sales Corporationचे मालक विनय शहा यांनी सांगितलं, कपड्यांची सामान्य प्रिंटिंग मशीन 50 हजार रुपयांमध्ये मिळते आणि त्यातून काम सुरू होऊ शकतं. त्यानुसार प्रिंटिंगसाठी तुम्ही पांढऱ्या रंगाचा टी शर्ट 120 रुपयाला खरेदी करू शकता. त्याची प्रिंटिंगची किंमत 1 रुपयापासून 10 रुपयापर्यंत आहे. तुम्ही तो टी शर्ट 200 ते 250 रुपयापर्यंत विकू शकता. म्हणजे जवळपास 50 टक्के फायदा तुम्हाला मिळू शकतो.

तुम्ही टी शर्टची विक्री स्वत: करू शकता. त्यासाठी आॅनलाइनची मदत घेऊ शकता. हे माध्यम कमी खर्चाचं आहे. एक तर तुम्ही तुमचा ब्रँड बनवा किंवा ई काॅमर्स प्लॅटफाॅर्मच्या मदतीनं टी शर्ट विका. यात तुम्ही महाग मशीन वापरलीत तर जास्त चांगली क्वालिटी आणि जास्त टीशर्ट तयार करू शकता.

Loading...

टी शर्टच्या प्रिंटिंगसाठी तुम्हाला प्रिंटर, हिट प्रेस, कम्प्युटर, कागद आणि कच्चा माल म्हणून टी शर्टची गरज आहे. तुम्हाला मोठ्या प्रमाणात काम करायचं असेल तर 2 लाखापासून 5-6 लाखापर्यंत तुम्ही गुंतवणूक करू शकता.

सर्वात स्वस्त मशीन ही मॅन्युअल असते. म्हणजे हातानं चालवावी लागते. त्यात एक टी शर्ट एका मिनिटात तयार होऊ शकतो.

विनय शहा सांगतात, एका टी शर्टच्या सामान्य प्रिंटिंगवर 1 ते 10 रुपयांचा खर्च होतो. चांगलं प्रिंटिंग हवं असेल तर 20 ते 30 रुपयांमध्ये हा खर्च होतो. तुम्ही आॅटोमेटिक मशीन घेतली तर खर्च थोडा वाढतो.


नितीन गडकरींची विरोधकांवर मिश्किल टिप्पणी; काय म्हणाले गडकरी पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 16, 2019 01:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...