Home /News /money /

अ‍ॅ​​​​​​​क्सिस सिक्युरिटीची Wipro ला BUY रेटिंग; 750 रुपयांचे टार्गेट, काय आहे कारण?

अ‍ॅ​​​​​​​क्सिस सिक्युरिटीची Wipro ला BUY रेटिंग; 750 रुपयांचे टार्गेट, काय आहे कारण?

Axis Security ला विश्वास आहे की कोविड-19 च्या ब्रेकआउटमुळे जागतिक स्तरावर Wipro साठी मोठ्या संधी निर्माण होतील. त्यामुळे भविष्यात कंपनीच्या व्यवसायात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

    मुंबई, 20 डिसेंबर : देशातील सर्वात मोठ्या आयटी एक्सपोर्टपैकी एक विप्रो (Wipro) बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रांना आयटी सोल्यूशन्स पुरवण्यात माहिर आहे. अशा स्थितीत Axis Sucurities ने विप्रोला आठवड्यातील सर्वोत्तम पर्याय म्हणून निवडले आहे. अ‍ॅ​​​​​​​क्सिस सिक्युरिटीने 750 रुपयांचे टार्गेट देत या स्टॉकवर खरेदीची शिफारस केली आहे. अॅक्सिस सिक्युरिटीचे म्हणणे आहे की हा स्टॉक 6-9 महिन्यांच्या कालावधीत ही पातळी गाठण्याचा प्रयत्न करेल. या शेअर्समध्ये अल्पावधीतही खरेदी दिसून येईल, असा विश्वास ब्रोकरेज फर्मने व्यक्त केला आहे. ब्रोकरेज हाऊसचे म्हणणे आहे की विप्रोचा डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन व्यवसाय मजबूत आहे. कंपनीला अलीकडेच अनेक मोठ्या डील मिळाल्या आहेत. हा करार BBSFI, रिटेल आणि CPG, मॅन्युफॅक्चरिंग वर्टिकलशी संबंधित आहे. विप्रोची डिजिटल प्रोडक्ट्स, डिजिटल टॅलेन्ट आणि S&M मध्ये गुंतवणूक सुरू ठेवण्याची योजना आहे. TATA च्या दोन शेअरमुळे Rakesh Jhunjhunwala यांना मोठा फटका, काही मिनिटात 230 कोटींचं नुकसान अॅक्सिस सिक्युरिटीला विश्वास आहे की कोविड-19 च्या ब्रेकआउटमुळे जागतिक स्तरावर विप्रोसाठी मोठ्या संधी निर्माण होतील. त्यामुळे भविष्यात कंपनीच्या व्यवसायात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. अॅक्सिस सिक्युरिटीने आपल्या अहवालात म्हटले आहे की, विप्रोने जवळपास सर्वच आघाड्यांवर चांगली कामगिरी केली आहे. तिमाही आधारावर कंपनीचे उत्पन्न 8.1 टक्‍क्‍यांनी वाढून 19,667 कोटी रुपये होते. वर्षिक 30 टक्‍क्‍यांच्या वाढीसह, तर ऑपरेटिंग नफा वार्षिक 30.8 टक्‍क्‍यांनी वाढून 3492 कोटी रुपये होता. मात्र ऑपरेटिंग मार्जिन 180 बेसिस पॉइंटने घसरून 7.7 टक्क्यांवर आला. Mutual Fund मधून पैसे काढताना या गोष्टी लक्षात ठेवा, मेहनतीच्या पैशांचं नुकसान होणार नाही निव्वळ नफ्यावर नजर टाकली तर वार्षिक 34 टक्क्यांनी वाढ होऊन 2,931 कोटी रुपये झाले आहे. पुढे जाऊन, BFSI, हाय टेक मीडिया लाइफ सायन्स आणि कम्युनिकेशन्स सारख्या वर्टिकलचा कंपनीला फायदा होईल अशी अपेक्षा आहे. याशिवाय, आर्थिक वर्ष 2022 च्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीची डील पाइपलाइन देखील उद्योगांमध्ये सर्वात मजबूत पातळीवर आहे. दुसऱ्या तिमाहीत कंपनीचे 2.1 अब्ज डॉलर किमतीचे डील झाले. हे पाहता कंपनीच्या व्यवसायात आणखी वाढ अपेक्षित आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Investment, Money, Share market

    पुढील बातम्या