Home /News /money /

Nifty 50 आणि Nifty Bank मध्ये बदल होणार? कोणते शेअर्स होणार इन-आऊट?

Nifty 50 आणि Nifty Bank मध्ये बदल होणार? कोणते शेअर्स होणार इन-आऊट?

मार्च 2022 मध्ये निफ्टी निर्देशांक पुन्हा संतुलित केला जाईल. निफ्टी 50, बँक निफ्टी आणि निफ्टी आयटी निर्देशांकात हे बदल शक्य आहेत, तर निफ्टी निर्देशांकातील हे बदल एप्रिल 2022 पासून लागू होतील.

    मुंबई, 6 डिसेंबर : पुढील वर्षी एप्रिलपासून Nifty 50, Nifty Bank आणि Nifty IT निर्देशांकाच्या शेअर्समध्ये बदल होऊ शकतात. या सर्व निर्देशांकांमध्ये काही स्टॉक्स वगळले जाऊ शकतात आणि काही स्टॉक या निर्देशांकांमध्ये समाविष्ट केले जाऊ शकतात. कोणते स्टॉक बाहेर होतील आणि कोणते समाविष्ट होतील या दृष्टीने डिसेंबर महिना अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यात शेअर्सच्या समाविष्ट करण्याचे किंवा बाहेर करण्याचे निकष ठरवले जातात. मनीकंट्रोलच्या वृत्तानुसार, CNBC- Awaaz च्या यतीन मोटा यांनी Edelweiss च्या अहवालाचा हवाला देत यासंबंधीची माहिती दिली आहे. यतीन यांच्या मते, निफ्टीच्या निर्देशांकात बदल होतील. मार्च 2022 मध्ये निफ्टी निर्देशांक पुन्हा संतुलित केला जाईल. निफ्टी 50, बँक निफ्टी आणि निफ्टी आयटी निर्देशांकात हे बदल शक्य आहेत, तर निफ्टी निर्देशांकातील हे बदल एप्रिल 2022 पासून लागू होतील. दोन मोठ्या ब्रोकरेज फर्मची ICICI Bank शेअर खरेदीची शिफारस, टार्गेट प्राईज दोघांचीही वेगळी निफ्टीमध्ये कोणत्या स्टॉक्सचा समावेश होणार? यतीन यांनी Edelweiss चा हवाला देत सांगितले की, यावेळी अपोलो हॉस्पिटल्सचा (Appolo Hospital) निफ्टी 50 मध्ये समावेश करण्यात येऊ शकतो. कारण यामध्ये 17.5 कोटी डॉलर्सची खरेदी होताना दिसली. अपोलो हॉस्पिटल्स शेअर निफ्टी 50 मध्ये समाविष्ट होऊ शकला नाहीत, तर Info Edge (Naukari) सामील होण्याचे संकेत आहेत. या शेअरमध्ये 14.4 कोटींचा इनफ्लो दिसला आहे. अपोलो हॉस्पिटल्स दमदार कामगिरीच्या आधारावर निफ्टीमध्ये आपले स्थान मजबूत करू शकतो. दुसरीकडे, IOC ला निफ्टीतून बाहेर जाऊ शकतो. कारण या शेअरमध्ये 10 कोटीं डॉलरचा आउटफ्लो दिसला आहे, म्हणजेच सुमारे 10 कोटीं डॉलरची विक्री झाली आहे. Multibagger Stock : 'या' केमिकल शेअरची दमदार कामगिरी, वर्षभरात 130 टक्के रिटर्न्स निफ्टी बँकेत बदल शक्य निफ्टी बँकेतही या वेळेचा बदल दिसून येऊ शकतात. अहवालानुसार, बँक ऑफ बडोदामध्ये 6.3 कोटी डॉलरच्या खरेदीच्या जोरावर बँक निफ्टीत समावेश केला जाऊ शकतो. तर RBL बँकेत 2.8 कोटींच्या विक्रीमुळे शेअर बँक निफ्टीतून बाहेर पडू शकते. निफ्टी आयटी इंडेक्समध्ये कोणाची एंट्री? निफ्टी आयटी इंडेक्सबद्दल बोलायचे तर पर्सिस्टंट सिस्टीम्समध्ये (Persistent Systems) 3.5 कोटी डॉलर गुंतवणुकीमुळे, निफ्टी आयटी निर्देशांकात समाविष्ट होण्याचा प्रबळ दावेदार बनला आहे, तर एल अँड टी टेक सर्व्हिसेसमध्ये (L&T Tech Services) 2.8 कोटी डॉलरच्या विक्रीमुळे निफ्टी आयटीतून बाहेर जाऊ शकतो.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Investment, Share market

    पुढील बातम्या