Home /News /money /

LPG Cylinder: गृहिणींचं बजेट कोलमडणार! 1 जुलैपासून गॅस सिलेंडर महागणार?

LPG Cylinder: गृहिणींचं बजेट कोलमडणार! 1 जुलैपासून गॅस सिलेंडर महागणार?

पेट्रोलियम वितरण कंपन्यांनी 1 मे रोजी व्यावसायिक वापरासाठी 19 किलो LPG सिलेंडरची किंमत वाढवली होती. यामध्ये सुमारे 100 रुपयांची वाढ करण्यात आली होती.

    मुंबई, 28 जून : येत्या 1 जुलैपासून एलपीजी सिलेंडरच्या (LPG Cylinder) किमती वाढणार की कमी होणार? असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण होत आहे. कारण जून महिना संपत आला आहे आणि काही दिवसात जुलै महिना सुरु होईल. तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी किमतीचा आढावा घेतात आणि एलपीजीच्या किमती ठरवतात. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) या सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपनीने 1 जून 2022 रोजी एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत सुमारे 135 रुपयांनी कपात करण्याची घोषणा केली होती. IOCL ने इंडेन गॅस सिलेंडरच्या दरात कपात केली. तेल कंपन्यांनी घरगुती गॅसच्या ग्राहकांना किमतीत दिलासा दिला नसला तरी एलपीजीच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत कंपनीने ही कपात केली आहे. हॉटेल, रेस्टॉरंट आणि ढाब्यांमध्ये व्यावसायिक सिलेंडरचा वापर केला जातो. सध्या घरगुती 14.2 किलो एलपीजी सिलेंडरची किंमत अजूनही 19 मे प्रमाणेच ग्राहकांना उपलब्ध आहे. एका माशामुळे मच्छिमाराचं नशीब पालटलं; 3 तास चाललेल्या बोलीनंतर एवढा महाग विकला गेला एक मासा 1 जून नंतर एलपीजीची किंमत किती होती? पेट्रोलियम कंपनी IOCL ने जाहीर केलेल्या नवीन दरानंतर व्यावसायिक वापरासाठी 19 किलो LPG सिलेंडरच्या किंमतीत बदल करण्यात आला आहे. पेट्रोलियम कंपनीने व्यावसायिक वापरासाठी 19 किलोच्या सिलेंडरमध्ये 135 रुपयांची कपात केली होती. या कपातीनंतर देशाची राजधानी दिल्लीत 19 किलोचा व्यावसायिक एलपीजी सिलेंडर 2354 ऐवजी 2219 रुपयांना मिळत आहे. त्याचबरोबर कोलकात्यात 2454 ऐवजी 2322, मुंबईत 2306 ऐवजी 2171.50 आणि चेन्नईत 2507 रुपयांऐवजी 2373 रुपये दराने ग्राहकांना उपलब्ध होत आहे. 1 मे रोजी 19 किलोचा सिलेंडर 100 रुपयांनी महागला पेट्रोलियम वितरण कंपन्यांनी 1 मे रोजी व्यावसायिक वापरासाठी 19 किलो LPG सिलेंडरची किंमत वाढवली होती. यामध्ये सुमारे 100 रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्याच वेळी, मार्चमध्ये दिल्लीमध्ये 19 किलोच्या एलपीजी सिलेंडरची किंमत केवळ 2012 रुपये होती. 1 एप्रिल रोजी ते 2253 पर्यंत वाढले आणि 1 मे रोजी ते 2355 रुपयांवर पोहोचले. नवीन स्मार्टफोन घेणाऱ्यांसाठी काही दिवसात स्वस्तात फोन खरेदीची संधी? कंपन्या बंपर डिस्काऊंट देऊ शकतात मे महिन्यात घरगुती सिलेंडरच्या दरात दोनदा वाढ घरगुती एलपीजी सिलेंडरबाबत बोलायचे झाले तर पेट्रोलियम वितरण कंपन्यांनी मे महिन्यात सिलेंडरच्या किमतीत दोनदा वाढ करून ग्राहकांना दणका दिला होता. मे महिन्यात पहिल्यांदाच 7 तारखेला घरगुती सिलेंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. तर 19 मे रोजी घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरातही वाढ करण्यात आली होती. 7 मे रोजी एलपीजीच्या दरात 50 रुपयांनी वाढ करण्यात आली, त्यानंतर 19 किलोचा व्यावसायिक सिलेंडर सुमारे 10 रुपयांनी स्वस्त करण्यात आला. त्याच वेळी, 19 मे रोजी त्याची किंमत 8 रुपयांनी वाढली.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Gas, LPG Price, Money

    पुढील बातम्या