मराठी बातम्या /बातम्या /मनी /

राकेश झुनझुनवाला... शेअर बाजारातील 'बिग बुल' म्हणून ओळख, काय आहे कारण?

राकेश झुनझुनवाला... शेअर बाजारातील 'बिग बुल' म्हणून ओळख, काय आहे कारण?

राकेश झुनझुनवाला ज्या शेअरला ते हात लावतील त्यात प्रॉफिट कमावण्याची ताकद त्यांची होती. म्हणून त्यांच्या पोर्टफोलिओवर नजर ठेवणाऱ्या किरकोळ गुंतवणूकदारांची संख्या मोठी आहे.

  • Published by:  Pravin Wakchoure
मुंबई, 14 ऑगस्ट : शेअर बाजारातील 'बिग बुल' अशी ओळख असणारे राकेश झुनझुनवाला यांचं वयाच्या 62व्या वर्षी निधन झालं आहे. मुंबईतील ब्रीज कँडी रुग्णालयात उपचारादरम्यान सकाळी 6.45 वाजता त्यांचा निधन झालं. राकेश झुनझुनवाला यांना भारतीय शेअर बाजारातील 'वॉरेन बफे' देखील म्हटलं जातं असे. कारण ज्या शेअरला ते हात लावतील त्यात प्रॉफिट कमावण्याची ताकद त्यांची होती. म्हणून त्यांच्या पोर्टफोलिओवर नजर ठेवणाऱ्या किरकोळ गुंतवणूकदारांची संख्या मोठी आहे. राकेश झुनझुनवाला यांना बिग बुल का म्हणायचे हे त्यांच्या पोर्टफोलियोवर नजर टाकल्यास कळून येईल. राकेश झुनझुनवाला याची संपत्ती जवळपास 33 हजार कोटींच्या जवळपास आहे. राकेश झुनझुनवाला यांच्याकडे 31 मार्च 2021 रोजी संपलेल्या तिमाहीत 37 शेअर्समध्ये सार्वजनिक होल्डिंग आहे. यामध्ये टायटन कंपनी, टाटा मोटर्स, क्रिसिल, ल्युपिन, फोर्टिस हेल्थकेअर, नाझारा टेक्नॉलॉजीज, फेडरल बँक, डेल्टा कॉर्प, डीबी रियल्टी आणि टाटा कम्युनिकेशन्स हे त्यांचे प्रसिद्ध स्टॉक्स आहेत. यात त्यांची एकूण संपत्ती 19,695.3 कोटी रुपये आहे. यामध्ये टायटन कंपनी (7,879 कोटी), टाटा मोटर्स (1,474.4 कोटी), क्रिसिल (1,063.2 कोटी) हे त्यांचे सर्वात मोठी गुंतवणूक असलेले स्टॉक आहेत. (हे ही वाचा- राकेश झुनझुनवाला यांचं निधन) राकेश झुनझुनवाला यांचा स्ट्राँग पोर्टफोलियो आणि त्यांची शेअर बाजारातील कंपन्याची समज आणि आकलन अगदी तंतोतंत होतं. त्यामुळे ते जे शेअर विकत घेत त्यात ते प्रॉफिट कमावून दाखवत असत. म्हणून 5000 रुपयांपासून त्यांनी सुरु केलेला प्रवास त्यांना हजारो कोटींच्या संपत्तीपर्यंत घेऊन आला होता. ही त्यांची खासियत होती म्हणून त्यांनी खरेदी केलेल्या शेअरमध्ये गुंतवणूक करणारे गुंतवणूदारही जास्त होतं. अकासा एअरलाईन्सची सुरुवात राकेश झुनझुनवाला यांनी 'अकासा' नावाने स्वत:ची विमान कंपनी सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वाची अकासा एअरलाईनचं पहिल्या विमानाने मुंबई-अहमदबाद असं उड्डाण भरलं होतं. Akasa Airlines ने जागतिक एरोस्पेस कंपनी Boeing ला 72 MAX 737 विमानांची ऑर्डर देखील दिली आहे.
First published:

Tags: Money, Share market

पुढील बातम्या