नवी दिल्ली, 29 एप्रिल: कोरोनाच्या (coronavirus) दुसऱ्या लाटेने (Second Wave of COVID-19) आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट जास्त भयानक आहे. म्युटंट झालेला हा विषाणू ज्येष्ठांसह तरुणांसाठीही जास्त घातक ठरत असून अनेक जणांना रुग्णालयात भरती व्हावं लागतंय. त्यामुळे या कठीण काळातएक चांगला आरोग्य विमा काढून आपल्या आणि आपल्या कुटुंबीयांची काळजी घेतली पाहिजे. विमा (insurance) काढण्यासंबंधी लोकांकडून वारंवार विचारल्या जाणाऱ्या काहीप्रश्नांची उत्तरं आज आम्ही तुमच्यासाठी आणली आहेत.
मी कोणत्या प्रकारचा हेल्थ इन्शुरन्स (health insurance) निवडायला हवा?
तुम्ही कोणता इन्शुरन्स निवडावा हेपूर्णपणे तुमच्या आरोग्यावर अवलंबून आहे. यासह, तुम्ही राहत असलेलं शहर आणि तिथल्या आसपासच्या रुग्णालयात दाखल होण्यासाठी लागणाऱ्या खर्चावर अवलंबून आहे. उदाहरणार्थ, दक्षिण मुंबई या उच्चभ्रू परिसरात राहणाऱ्या एखाद्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये दाखल करणं महाग आहे. पण, अचानक काही झाल्यास त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्याची शक्यता जास्त आहे, त्यामुळे या भागात राहणाऱ्या व्यक्तीला मोठी रक्कम असलेला विमा काढावा लागेल.
(हे वाचा- दररोज फक्त 167 रुपये बचत करून कोट्यधीश होण्याची संधी; जाणून घ्या या स्कीमबाबत)
साथीच्या आजारात मी माझ्या कुटुंबासाठी कोणती विमा योजना निवडावी?
कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी वेगळा आरोग्य विमा काढण्यास प्राधान्य द्या. हा विमा जरी कौटुंबिक योजनेचा भाग असला तरी कुटुंबातील प्रत्येकासाठी त्यांची विम्याची स्वतंत् ररक्कम असायला हवी. एखादी महामारी अथवा साथीचा रोग आल्यास कुटुंबातील बऱ्याच सदस्यांना रुग्णालयात दाखल करावं लागू शकतं अशावेळी फॅमिली प्लॅन्समधील मर्यादांमुळे कुटुंबाला नाहक त्रास सहन करावा लागतो.
कोणते टॉप-अप प्लॅन (Top-up plans)असतात आणि त्यापैकी मी कोणता घ्यावा?
एक योग्य हेल्थकेअर प्लॅन घेतल्यानंतर टॉप-अप्सची निवड देखील करा. टॉप-अप्स या आरोग्यसेवा योजना आहेत, ज्या मूलभूत रकमेची हमी संपल्यानंतर वाढीव खर्चाची भरपाई करतात. प्रति लाख टॉप-अप्सच्या कव्हरची किंमत कमी आहे. तसंच,येणाऱ्या वर्षांत,आरोग्यासाठी लागणारा खर्च वाढेल आणि आपली आताची विमा रक्कम पुरेशी ठरणार नाही. वय वाढल्यानंतर नवीन किंवा अतिरिक्तकव्हर मिळवणं महाग पडतं अशावेळी टॉप अप प्लॅन कामी येतात.
(हे वाचा-30 एप्रिलपूर्वी पूर्ण करा ही 4 महत्त्वाची आर्थिक कामं, मिळेल चांगला फायदा)
काही गंभीर आजारांसाठी विमा कव्हर (Insurance Cover) उपलब्ध आहे. भविष्यात तुम्हाला किंवा तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीला गंभीर आजाराचं निदान झाल्यास ही टॉप अप कव्हर फायदेशीर ठरतात.
परदेशात उपचाराचा खर्च भागवू शकतील अशा काही योजना आहेत का?
होय. ज्यांना मोठे प्रीमियम परवडतील, त्यांनी परदेशात उपचारांची गरज भासल्यास आरोग्य योजनांची माहिती घ्यावी. मेडिकल इमरजेन्सी (Medical Emergency) आल्यास रुग्णाला विमानाने विदेशात न्यायची गरज भासल्यास काही आरोग्य योजना त्याचा खर्च करतात.
मी आणि माझ्या कुटुंबासाठी एक हेल्थ पॉलिसी पुरेशी आहे का?
मेडिक्लेम नावाची केवळ एकच आरोग्य विमा योजना असायची ते दिवस गेलेत. तुम्ही नोकरदार असाल तर तुम्हाला एम्प्लॉयरने एक विमा कव्हर दिलेले असते. मात्र, त्यात अॅडीशन म्हणून तुम्ही एक स्वतंत्र पॉलिसी किंवा टॉप-अप्स घेऊ शकता. शक्य असल्यास त्यामध्ये परदेशात एअरलिफ्ट करून नेणाऱ्या आणि उपचाराचा खर्च करणाऱ्या पॉलिसीची समावेश करू शकता.
तसेच, हेल्थ इन्शुरन्स कव्हर हे नॉन लाईफ इन्शुरन्स कंपनीने (Non-Life Insurance Company) दिले आहे की, लाईफ इन्शुरन्स कंपनीने ते एकदा तपासा. जर, नॉन लाईफ इन्शुरन्स कंपनीने कव्हर दिलेलं असेल आणि तुमची इन्शुरन्सची रक्कम उपचार खर्चापेक्षा जास्त असेल तरी तुम्हाला फक्त उपचार खर्चाचीच रक्कम मिळते. मात्र, यामध्ये तुम्ही दरवर्षी इन्शुरन्सच्या रकमेसाठी दावा करू शकता. या उलट,जर इन्शुरन्स कंपनीने कवर दिलेले असेल तर,तुम्हाला उपचार खर्चासह तुमची सर्व रक्कम मिळते.
मी जिथे काम करतो तिथे माझा इन्शुरन्स काढलेला आहे. तरी मला आणखी एक हेल्थ इन्शुरन्स काढण्याची गरज आहे का?
होय, ते गरजेचे आहे. सध्याच्या अनिश्चिततेच्या काळात नोकरी जाणं ही वास्तविकता आहे.तुम्ही जर तुमची नोकरी गमावली तर तुमच्या एम्प्लॉयरने दिलेला विमाही गमवाल. त्यामुळे तुम्ही तुमच्यासाठी आणि कुटुंबीयांसाठी एक स्वतंत्र इन्शुरन्स प्लॅन घेणे आवश्यक आहे.
तज्ज्ञांचा सल्ला
तुमच्या गुंतवणूकीच्या पोर्टफोलिओप्रमाणे (portfolio), तुमचा हेल्थ इन्शुरन्स साथीच्या रोगांसाठी उपयुक्त आहे की नाही हे तपासणे गरजेचे आहे. तसेच तुमच्या विम्याच्या प्लॅन्सबद्दल सर्व माहिती कुटुंबाला देऊन ठेवा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Coronavirus, Health, Insurance, Money, Wellness