Home /News /money /

घाऊक बाजारात महागाईचा कहर; WPI दर 12 वर्षांत सर्वोच्च पातळीवर गेल्याने सामान्यांचं कंबरडं मोडलं

घाऊक बाजारात महागाईचा कहर; WPI दर 12 वर्षांत सर्वोच्च पातळीवर गेल्याने सामान्यांचं कंबरडं मोडलं

नोव्हेंबर महिन्यात WPI आधारित महागाई दराने (WPI Inflation at 12 Year High) नवा उच्चांक गाठला आहे. भाज्या, फळं आणि दूध या जीवनावश्यक गोष्टीच महाग झाल्याने थेट सर्वसामान्यांवर याचा परिणाम होत आहे.

    नवी दिल्ली, 14 डिसेंबर: सामन्यांच्या खिशाला दिवसेंदिवस चापच बसत आहे. जीवनावश्यक वस्तूंसाठी मोठी किंमत मोजावी लागत आहे. दरम्यान महागाई संदर्भात समोर आलेली सर्वसामान्यांच्या अडचणीच आणखी भर टाकणारी आहे. नोव्हेंबर महिन्यात घाऊक बाजारातील महागाई दराने (WPI Inflation at 12 Year High) नवा उच्चांक गाठला आहे. हा दर आता 14.23 टक्क्यांवर पोहोचला आहे, जो ऑक्टोबर महिन्यात 12.54 टक्के होता. दरम्यान वर्षभरापूर्वी नोव्हेंबर 2020 मध्ये घाऊक किमतीवर आधारित महागाई दर 2.29 टक्के होता. धक्कादायक बाब म्हणजे, घाऊक किमतीवर आधारित महागाई दराचा हा आकडा 12 वर्षांच्या सर्वोच्च पातळीवर आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने ही आकडेवारी जाहीर केली आहे.  WPI ची आकडेवारी एप्रिल 2005 पासून सर्वोच्च स्तरावर आहे. ऑक्टोबर महिन्यात असणारी 12.54 टक्क्यांची आकडेवारी ही  पाच महिन्यातील सर्वोच्च होती. हे वाचा-तुम्हाला का आली आहे Income Tax Notice? जाणून घ्या कशाप्रकारे द्याल उत्तर खाद्यपदार्थांच्या घाऊक महागाईचा दर 3.06 टक्क्यांवरून 6.70 टक्क्यांवर पोहोचला आहे. मॅन्युफॅक्चरिंग आयटम्सचा महागाई दर 11.92 टक्क्यांवर पोहोचला आहे, तर इंधनाचा महागाई दर 39.81 टक्क्यांवर पोहोचला आहे. भाज्यांच्या किमतीत 3.91 टक्क्यांची वाढ झाली आहे. हे वाचा-35 पैशांचा शेअर पोहोचला 200 रुपयांवर! 3 वर्षात 1 लाखाचे बनले 5 कोटींपेक्षाही जास दरम्यान भारतातील किरकोळ महागाई दर नोव्हेंबरमध्ये 4.91 टक्क्यांच्या तीन महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली आहे. याचे मुळ कारण अन्नधान्य, विशेषतः भाज्यांच्या किमतीत झालेली वाढ आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये महागाई वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे अन्नपदार्थ, कच्चे तेल, खनिज तेल, बेसिस मेटल्स, नैसर्गिक वायू, रसायने यांच्या किमतीत झालेली वाढ. खाद्यपदार्थांच्या किमती मागील महिन्यात -1.69 टक्क्यांच्या तुलनेत यावेळी 4.88 टक्क्यांनी वाढल्या आहेत.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या