मराठी बातम्या /बातम्या /मनी /

WPI Inflation : घाऊक महागाईचा दर जुलैमध्ये 13.93 टक्क्यांवर, 5 महिन्यांतील नीचांकी पातळी

WPI Inflation : घाऊक महागाईचा दर जुलैमध्ये 13.93 टक्क्यांवर, 5 महिन्यांतील नीचांकी पातळी

WPI Inflation : जुलैमध्ये खाद्यपदार्थांच्या किमती कमी झाल्या असून घाऊक महागाई जूनमधील 14.39 टक्क्यांवरून 10.77 टक्क्यांवर आली आहे.

WPI Inflation : जुलैमध्ये खाद्यपदार्थांच्या किमती कमी झाल्या असून घाऊक महागाई जूनमधील 14.39 टक्क्यांवरून 10.77 टक्क्यांवर आली आहे.

WPI Inflation : जुलैमध्ये खाद्यपदार्थांच्या किमती कमी झाल्या असून घाऊक महागाई जूनमधील 14.39 टक्क्यांवरून 10.77 टक्क्यांवर आली आहे.

  • Published by:  Pravin Wakchoure
नवी दिल्ली, 17 ऑगस्ट : देशात वाढलेल्या महागाईवर दुहेरी दिलासा मिळाला आहे. किरकोळ महागाईनंतर घाऊक महागाई दरात घट झाली आहे. घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलनवाढ जुलैमध्ये 13.93 टक्‍क्‍यांवर घसरली, ही या महिन्यातील नीचांकी पातळी आहे. एकीकडे महागाईचा दर कमी होताना दिसत असताना आज दुधाच्या किमतीत दोन रुपयांनी वाढ झाली आहे. अमूल आणि मदर डेअर यांनी दुधाचे दर वाढवले आहेत. हळूहळू इतरही कंपन्या आपले दर वाढवू शकतात. याचा महागाई दरावर नक्कीच परिणाम होण्याची शक्यता आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने मंगळवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, जुलै महिन्यात घाऊक महागाई दर 13.93 टक्क्यांवर आला आहे, जी जुलै महिन्यातील नीचांकी पातळी आहे. जूनमध्ये घाऊक महागाईचा दर 15.18 टक्के होता, तर मे महिन्यात 15.88 टक्के आणि एप्रिलमध्ये 15.08 टक्के होता. मात्र घाऊक महागाई सलग 16 व्या महिन्यात दुहेरी अंकात राहिली ही काहीशी चिंताजनक बाब आहे. यापूर्वी जुलैमध्ये किरकोळ महागाईचा दरही 7 टक्क्यांच्या खाली आला होता. महागाईने त्रस्त नागरिकांना आणखी एक झटका! अमूल दूध महागलं, चेक करा नवीन दर
आकडेवारीनुसार, अन्नधान्य महागाईचा दर जूनमध्ये 12.41 टक्क्यांवरून घसरून जुलैमध्ये 9.41 टक्क्यांवर आला आहे. भाज्यांची महागाई 56.75 टक्क्यांवरून 18.25 टक्क्यांवर घसरली. मात्र, बटाट्याचा भाव 39.38 टक्क्यांवरून 53.50 टक्क्यांवर पोहोचला आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की, जुलैच्या महागाईच्या आकडेवारीत प्रामुख्याने खनिज तेल, अन्न उत्पादने, कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू, धातू, वीज, रसायने आणि त्याच्या उत्पादनांनी भूमिका बजावली आहे.
खाद्यपदार्थांच्या किमतीत घसरण जुलैमध्ये खाद्यपदार्थांच्या किमती कमी झाल्या असून घाऊक महागाई जूनमधील 14.39 टक्क्यांवरून 10.77 टक्क्यांवर आली आहे. मात्र, पेट्रोल आणि डिझेलसारख्या इंधनाच्या बास्केटमध्ये घाऊक महागाईचा दर वाढला असून तो 43.75 टक्क्यांवर पोहोचला आहे, जो जूनमध्ये 4.38 टक्के होता. यापूर्वी महागाई नियंत्रणात आणण्यासाठी आरबीआयने या वर्षी रेपो दरात तीन वेळा वाढ केली. मे पासून आतापर्यंत रेपो दरात 1.40 टक्क्यांनी वाढ झाली असून त्यामुळे महागाई नियंत्रणात आणण्यास मदत होत आहे.
First published:

Tags: Central government, Inflation, Money

पुढील बातम्या