नवी दिल्ली, 31 जानेवारी : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 2023-24 या आर्थिक वर्षाचं बजेट एक फेब्रुवारी 2023 रोजी संसदेत सादर करतील. तत्पूर्वी, आज (31 जानेवारी 2023) केंद्र सरकारने आर्थिक पाहणी अहवाल अर्थात इकॉनॉमिक सर्व्हे संसदेत सादर केला. बजेटच्या आधी सादर केला जाणारा हा सर्व्हे म्हणजे एक फायनान्शिअर डॉक्युमेंट असतं. गेल्या आर्थिक वर्षात भारताचा आर्थिक विकास नेमका कसा झाला, याचा आढावा घेऊन, त्याचं विश्लेषण/विवेचन या सर्व्हेमध्ये केलेलं असतं.
यासाठी उद्योग, शेती, औद्योगिक उत्पादन, रोजगार, महागाई, निर्यात आदी क्षेत्रांतल्या माहितीची मदत घेतली जाते. मुख्य आर्थिक सल्लागार अर्थात चीफ इकॉनॉमिक अॅडव्हायझर यांच्या माध्यमातून हा सर्व्हे सादर केला जातो. डॉ. अनंत नागेश्वरन हे भारताचे विद्यमान चीफ इकॉनॉमिक अॅडव्हायझर असून, त्यांनी याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सल्लागार म्हणूनही काम पाहिलं आहे.
Budget 2023 : 'या' 5 अर्थमंत्र्यांनी बजेटमध्ये लावला शायरीचा तडका, जाणून घ्या कोण आहेत हे मंत्री!
28 जानेवारी 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या केंद्र सरकारने डॉ. अनंत नागेश्वरन यांची केंद्रीय अर्थ मंत्रालयात नवे चीफ इकॉनॉमिक अॅडव्हायझर म्हणून नियुक्ती केली. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचं सदस्यपदही त्यांनी याआधी सांभाळलं होतं. गेल्या वर्षी 31 जानेवारी रोजी त्यांनी त्याआधीचे चीफ इकॉनॉमिक अॅडव्हायझर संजीव सान्याल यांच्या नेतृत्वाखालच्या टीमसह इकॉनॉमिक सर्व्हेचा मसुदा तयार केला होता.
मोदी सरकारमध्ये ही महत्त्वाची पदं भूषवण्याआधी ते Krea युनिव्हर्सिटीतल्या 'IFMR ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेस'मध्ये अर्थशास्त्राचे प्रतिष्ठित व्हिजिटिंग प्रोफेसर होते. त्याआधी त्यांनी भारत आणि सिंगापुरातल्या अनेक प्रतिष्ठित बिझनेस स्कूल्समध्ये अध्यापनाचं कार्य केलं आहे.
Budget 2023: बजेटचे डॉक्यूमेंट ऑनलाइन पाहायचेय? ही आहे प्रोसेस
2019 ते 2021 या कालावधीत नागेश्वरन गुजरातमध्ये आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा प्राधिकरणात ऑनररी सीनिअर अॅडव्हायझरीच्या हंगामी सदस्य म्हणूनही कार्यरत होते.
1994 ते 2011 या 17 वर्षांच्या काळात त्यांनी कॉर्पोरेट क्षेत्रात करिअर केलं. त्या काळात ते युनियन बँक ऑफ स्वित्झर्लंडमध्ये करन्सी इकॉनॉमिस्ट होते. तसंच, क्रेडिट सुइस प्रायव्हेट बँकिंगमध्ये आशियात रिसर्च आणि इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायझर्सचे प्रमुख, तसंच ग्लोबल चीफ इन्व्हेस्टमेंट ऑफिसर म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे.
आयआयएम-अहमदाबाद या प्रतिष्ठित संस्थेतून नागेश्वरन यांनी मॅनेजमेंट या विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आहे. त्यासोबतच त्यांनी मॅसाच्युसेट्स विद्यापीठातून इम्पीरिकल बिहेवियर ऑफ एक्स्चेंज रेट्स या विषयात डॉक्टरेट प्राप्त केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Business News, Money