मराठी बातम्या /बातम्या /मनी /

मित्राचं कर्ज येईल तुमच्या अंगलट, लोन गॅरंटर होण्यापूर्वी नक्की वाचा ही बातमी

मित्राचं कर्ज येईल तुमच्या अंगलट, लोन गॅरंटर होण्यापूर्वी नक्की वाचा ही बातमी

मित्राचं कर्ज येईल तुमच्या अंगलट, लोन गॅरंटर होण्यापूर्वी नक्की वाचा ही बातमी

मित्राचं कर्ज येईल तुमच्या अंगलट, लोन गॅरंटर होण्यापूर्वी नक्की वाचा ही बातमी

जामीनदार ही अशी व्यक्ती असते, जी दुसर्‍या व्यक्तीला कर्ज देण्यासाठी सहमती देत असते आणि जर कर्जदारानं कर्जाची परतफेड केली नाही, तर त्या कर्जासाठी ती एकप्रकारे ती जबाबदारही असते. त्यामुळे जामीनदाराला कर्जाची परतफेड करावी लागते. गॅरंटर असणं म्हणजे कर्जदाराला मदत करणं असं नाही.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Suraj Sakunde

मुंबई, 22 नोव्हेंबर: जामीनदार ही अशी व्यक्ती असते, जी दुसर्‍या व्यक्तीला कर्ज देण्यासाठी सहमती देत असते आणि जर कर्जदारानं कर्जाची परतफेड केली नाही, तर त्या कर्जासाठी ती एकप्रकारे ती जबाबदारही असते. त्यामुळे जामीनदाराला कर्जाची परतफेड करावी लागते. गॅरंटर असणं म्हणजे कर्जदाराला मदत करणं असं नाही. ही केवळ औपचारिकता नसते. कर्जाची परतफेड करण्यासाठी कर्जदाराप्रमाणेच जामीनदारही जबाबदार असतो. जर तुम्ही जामीनदार झालात तर बँकही तुम्हाला कर्जदार मानते. गॅरेंटर बनून, तुम्ही विविध आर्थिक नियमांतर्गत येता. जेव्हा कर्जाची रक्कम किमान मर्यादा ओलांडते. तेव्हा बँक कर्ज जामीनदाराकडे कर्जाचा पाठपुरावा करते. यासाठी कोणतीही निश्चित मार्गदर्शक तत्त्वे नाहीत आणि प्रत्येक बँकेच्या कर्ज जामीनदारांसाठी वेगवेगळे नियम आहेत. त्यामुळे कर्जाचा जामीनदार होण्यापूर्वी त्याच्यासाठी सर्व अटी व शर्ती समजून घेणं आवश्यक आहे.

जामीनदार होण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा-

कर्ज जामीनदार आणि सह-कर्जदार यांच्यात फरक आहे.

सह-कर्जदार आणि कर्ज जामीनदार या संज्ञा एकमेकांच्या बदल्यात वापरल्या जातात असा विचार करणं चुकीचं आहे. कर्जदार आणि सह-कर्जदार दोघेही कर्जाची परतफेड करू शकत नाहीत आणि बँक असं गृहीत धरते की आता या कर्जाची वसुली होऊ शकत नाही, तेव्हा बँक जामीनदाराकडे पाठपुरावा करते.

लोन गॅरंटरसाठी क्रेडिट स्कोअर चांगला असणं आवश्यक -

तुमचा क्रेडिट स्कोअर गॅरेंटर असताना महत्त्वाची भूमिका बजावतो. क्रेडिट स्कोअरच्या निकषांवर तुमची आर्थिक पात्रता तपासली जाते. तुम्ही कर्जासाठी अर्ज करता तेव्हा बँका तुमच्याकडून हमी दिलेली कर्जाची रक्कमही विचारात घेतात. त्यामुळं तुम्हाला कर्ज मिळण्याची शक्यता कमी होते. तसेच प्राथमिक कर्जदाराकडून ईएमआयचे कोणतेही डीफॉल्ट किंवा अनियमित पेमेंट तुमच्या क्रेडिट स्कोअरवर नकारात्मक परिणाम करू शकते.

हेही वाचा: प्रायव्हेट जॉब करताय आणि ‘हे’ नियम माहीत नाहीत? अवघडंच राव! वाचा झटपट

जामीनदारानं पैसे देण्यास नकार दिल्यास कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते-

मुख्य कर्जदार कोणत्याही कारणामुळे कर्ज फेडण्यास अक्षम असल्यास किंवा त्याचा मृत्यू झाल्यास थकित कर्जाची रक्कम परत करण्यासाठी बँक गॅरेंटरशी संपर्क साधू शकते. तुम्ही गृहकर्जाचे जामीनदार असल्यास तुम्ही मालमत्ता विकून रक्कम वसूल करण्याची विनंती करू शकता. कर्जाची परतफेड करण्यास नकार दिल्याबद्दल बँक कायदेशीर कारवाई देखील करू शकते. बहुतेक प्रकरणांमध्ये बँक आपली देय रक्कम वसूल करण्यासाठी आपल्या मालमत्तेचा ताबा घेऊ शकते.

कर्जासाठी जामीनदार झाल्यानंतर ‘या’ जबाबदारीतून मागे हटू शकत नाही-

एकदा तुम्ही कर्जाचे जामीनदार होण्याचं मान्य केलं, तर जबाबदारीतून हात झटकता येत नाहीत. जामीनदाराच्या जबाबदारीतून मुक्त होण्याच्या प्रक्रियेसाठी बँक आणि कर्जदार दोघांकडून विनंती आवश्यक आहे. जर दुसरा कर्ज हमीदार उपलब्ध असेल तरच बँक त्यावरील बदलास मान्यता देते.

First published:

Tags: Loan