सेमी अ‍ॅटोमॅटिक मशीन शोधताय? मग व्हर्लपुलच्या ACE XL चा विचार कराच

सेमी अ‍ॅटोमॅटिक मशीन शोधताय? मग व्हर्लपुलच्या ACE XL चा विचार कराच

कपडे धुणं हे खूप जिकिरीचं काम असतं. नशिबानं, वाॅशिंग मशीन तुमचा बराच त्रास कमी करते, कपड्यांवरचा सर्व मळ काढून टाकते.

  • Share this:

कपडे धुणं हे खूप जिकिरीचं काम असतं. नशिबानं, वाॅशिंग मशीन तुमचा बराच त्रास कमी करते, कपड्यांवरचा सर्व मळ काढून टाकते,  शिवाय तुमचा वेळही वाचवते. प्रत्येक घरात वाॅ शिंग मशीन असतेच. तिच्याशिवाय तुम्ही राहूच शकत नाही.

अनेक वर्ष व्हर्लपुल या कपडे धुण्याच्या त्रासापासून तुमची सुटका करतेय. या मशीन्सच्या रेंजही खूप आहेत. अगदी तुम्हाला परवडेल अशा कमी किमतीपासून ते जास्त आधुनिकतेपर्यंत आणि तुमच्या गरजा पूर्ण करेल अशा जास्तीत जास्त क्षमता असणाऱ्या माॅडेलपर्यंत व्हर्लपुल मशीन सेवा देते.

व्हर्लपुल आता आणखी एक नवं माॅडेल घेऊन आलीय. ही आहे ACE XL सेमी अ‍ॅटोमॅटिक वाॅ शिंग मशीन. यामुळे कपडे धुण्याचा तुमचा अनुभव आणखी सोपा होईल. ही मशीन तीन कपॅसिटीजमध्ये आहे. १०.५, ९.५ आणि ९ किलो. यात तुम्हाला रंगांचे पर्यायही भरपूर आहेत. ग्रेफाइट ग्रे ( राखाडी),कोरल रेड ( लाल), राॅयल पर्पल ( जांभळा ) आणि सिल्व्हर ग्रे असे रंगांचे पर्याय आहेत. ACE XL मध्ये भरपूर नवी तंत्र वापरली आहेत. यात 3D स्क्रब तंत्रज्ञान, 3D लिंट फिल्टर, 3D टर्बो इम्पिलर इत्यादी तंत्रांनी मशीन सुविधापूर्ण बनलंय. याची किंमतही अगदी वाजवी आहे. मशीनची किंमत १५०० रुपयांनी सुरू होते. तुमच्या रोजच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ही योग्य किंमत आहे. ACE XL नं आपल्या सोयीसुविधा आणि डिझाइनमुळे आयएफ डिझाइन अवाॅर्ड पटकावलंय. हे मशीन आपली कामगिरी आणि डिझाइन यामुळे नंबर १ ठरलंय.

बाजारात उपलब्ध असलेल्या सेमी अ‍ॅटोमॅटिक मशीनपेक्षा वेगळं असलेलं व्हर्लपुल ACE XL वाॅ शिंग मशीनची वैशिष्ट्य पाहा –

एकाच वेळी १४ किंग साइज बेड शिट्स धुतले जातात

तुम्ही जास्त कपडे धुण्यासाठी लाॅण्ड्रीच्या शोधात आहात? काळजी सोडा. १०.५ किलोपर्यंत क्षमता आणि अनोखं 3D टर्बो इम्पिलरमुळे कितीही जास्त कपडे असले तरी तुम्हाला ते चांगल्या प्रकारे धुऊन मिळतील, याबद्दल खात्री बाळगा. स्प्रिंग लोडेड 3D स्क्रब पॅड्समुळे कपडे वर-खाली घुसळले जातात. त्यामुळे अगदी १४ किंग साइज बेडशिट्सवरचा मळही एकाच वेळी साफ होतो.

10 पक्के डाग काढते

केचअप, तेल, फळांचा ज्युस आणि बुटांचं पाॅलिश  यामुळे तुम्ही हैराण आहात? पण आता तुम्हाला याची काळजी अजिबात करावी लागणार नाही. ACL XL १० प्रकारचे वेगवेगळे डाग तिच्या 3D SCL XL क्रब टेक्नाॅलाॅजीमुळे  काढून टाकते.

हाय स्पेन क्षमता वाॅशिंग मशीनमध्ये १४०० RPM स्पीड स्पेन मोटर आहे. त्यामुळे जास्त कपडे असले तरीही ते जलद आणि अत्योत्कृष्ट ड्राय केले जातात.

3D लिंट फिल्टर

वाॅशिंग मशीनमध्ये अत्याधुनिक ट्रिपल लेयर्ड फल्टरेशन तंत्र वापरलंय. त्यामुळे कपड्याचा मऊपणा टिकून राहतो आणि तुमचे कपडे प्रत्येक धुण्यानंतर स्वच्छ आणि चमकदार राहतात.

हार्ड वाॅटर वाॅश

वाॅशिंग मशीनमध्ये वापरलेल्या तंत्रज्ञानामुळे तुमच्या डिटर्जंटचा जास्तीत जास्त चांगला वापर होतो. यामुळे हार्ड वाॅटर असलं तरीही मळ आणि डाग निघून जातात.

वाॅटरप्रूफ आणि शाॅकप्रूफ कंट्रोल पॅनल

अनेकदा वाॅ शिंग मशीनमध्ये कपडे धुताना पाण्याची गळती होईल याची भीती असते. शिवाय वाॅ शिंग मशीन बऱ्याचदा घराबाहेर ठेवल्यानं पावसामुळे बिघडेल अशीही काळजी असते. ACL XL मध्ये वाॅटरप्रूफ आणि शाॅकप्रूफ कंट्रोल पॅनल आहे. त्यामुळे पाणी कन्ट्रोल कम्पोनन्टमध्ये शिरणारच नाही. त्यामुळे तुम्ही पाण्याची गळती होईल किंवा मेन्टेनन्सची चिंता असे विचार अजिबातच करू नका. निर्धास्त राहा.

5 वाॅश प्रोग्राम्स

ACL XL  मध्ये अनेकविध वाॅश सायकल्स आहेत. तुम्हाला हव्या त्या प्रकारचे वाॅश तुम्ही करू शकता. म्हणजे डेलिकेट, जेंटल, नाॅर्मल, नाॅर्मल प्लस आणि स्टेन वाॅश (डाग काढण्यासाठी ). तुमच्या कपड्यांप्रमाणे तुम्हाला या मशीनमध्ये कपडे धुता येतील.

मशीन हलवणं सोपं

मोठं वाॅशिंग मशीन एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलवणं कठीण जातं.ACE XL ला चाकं आहेत. त्यामुळे मशीन कुठेही हलवणं सोपं आहे.

IF डिझाइन अवाॅर्ड  विजेते

ACE XL मध्ये फक्त वरील गोष्टी नाहीत, तर ते दिसायलाही आकर्षक आहे. मशीनचं चमकदार झाकणं आणि आतली सगळी पातीही तितकीच स्टाइलिश आहेत. यामुळेच मशीननं IF डिझाइन अवाॅर्ड २०१९ पटकावलंय. IF डिझाइन अवाॅर्ड खूप महत्त्वाचं मानलं जातं. यासाठी या वर्षी ५० देशांतून ६४०० एन्ट्रीज आल्या होत्या.

मशीनमध्ये असलेल्या इतक्या सगळ्या सुविधा आणि स्टाइल यामुळे कपडे धुण्याचा तुमचा अनुभव नक्कीच आल्हाददायक होतो. व्हर्लपुल ACE XL जास्त काळ चालेल अशा पद्धतीनंच तयार केलंय. मशीन पूर्ण संरक्षक आहे आणि ५ वर्षांची दिली जाणारी वाॅरन्टी म्हणजे मशीन खूप काळ चांगलं काम करतं याचंच द्योतक आहे. हे वाॅशिंग मशीन वीज वाचवतं म्हणूनच त्याला 5 स्टार्स दिले आहेत.

तुम्ही व्हर्लपुल ACE XL खरेदी करण्यासाठी जवळच्या दुकानाला भेट द्या किंवा इथे क्लिक करा. कपडे धुण्याचा अद्वितीय अनुभव घेण्यासाठी तयार राहा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 5, 2019 05:19 PM IST

ताज्या बातम्या