Home /News /money /

Car Loan : कार लोन घेताना 'या' गोष्टींचा नक्की विचार करा, नक्कीच फायदा होईल

Car Loan : कार लोन घेताना 'या' गोष्टींचा नक्की विचार करा, नक्कीच फायदा होईल

कार फायनान्स ही देखील एक लाँग कमिटमेंट आहे. परंतु अनेक वेळा कारला वित्तपुरवठा करताना लोक काही गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे भविष्यात काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. म्हणूनच अशा परिस्थितीत कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 18 डिसेंबर : स्वतःची कार घेणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. कार फायनान्सिंग (Car Finance) ग्राहकांना नंतर पैसे देण्याची सुविधा देते. कार लोन (Car Loan) देण्यापूर्वी तुमचे उत्पन्न, क्रेडिट स्कोअर आणि क्रेडिट हिस्ट्री देखील विचारात घेतली जाते. कार फायनान्स ही देखील एक लाँग कमिटमेंट आहे. परंतु अनेक वेळा कारला वित्तपुरवठा करताना लोक काही गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे भविष्यात काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. म्हणूनच अशा परिस्थितीत कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे. स्वतःचा खर्च जाणून घ्या तुमच्या मासिक उत्पन्नाचं योग्य प्रकारे कॅल्क्युलेशन करणे महत्त्वाचे आहे. तुमचा EMI इतका जास्त नसावा ज्यामुळे तुमच्या घर खर्चाचं आणि लाईफस्टाईलचं संतुलन बिघडेल. इतर सर्व खर्च लक्षात घेऊन आपत्कालीन परिस्थितींचा नेहमी विचार करा. उर्वरित कर्ज किंवा विम्यासाठी पगारातील काही पैसे राखीव ठेवावे. मुलभूत खर्च वगळता जे पैसे शिल्लक राहतील त्यातून इतर गरजा भागवा जेणेकरुन तुमच्या खर्च खिशाला जड होणार नाही. Mutual Fund : SIP सुरु करण्याची योग्य तारीख कोणती? पेमेंट वेळेत न झाल्यास काय होतं? कर्जाचा कालावधी निश्चित करा तुम्ही निश्चितपणे दीर्घ कालावधीसाठी कर्ज मिळवू शकता. पण कमी वेळेत तुम्ही कर्ज फेडाल तितकं चागलं होईल. कार लोन 7 वर्षांपर्यंत मिळते, तुम्ही हवे असल्यास ते कमी करू शकता. अशा परिस्थितीत, तुम्हाला एकाच वेळी म्हणजे डाऊन पेमेंट थोडे अधिक भरावे लागेल, परंतु त्याचे व्याज देखील कमी असेल. यासाठी आधी तुमच्याकडे पुरेशी रक्कम असल्याची खात्री करा. Star Health Insurance IPO मध्ये गुंतवणूकदारांचं 10 टक्के नुकसान, मात्र राकेश झुनझुनवालांनी कमावले 5418 कोटी प्रोसेसिंग फीमध्ये बार्गेनिंग करा प्रोसेसिंग फी भरताना बँकेशी तुम्ही योग्य पद्धतीने बार्गेनिंग केली पाहिजे. जर तुम्ही बँकेशी व्यवस्थित बार्गेनिंग केली तर तुम्हाला भरपूर सूट मिळू शकते. प्रोससिंग फी सुमारे 5000 पर्यंत असू शकते जी तुम्ही कमी करू शकता.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Car, Loan

    पुढील बातम्या