• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • Car Loan घेताना या गोष्टी लक्षात ठेवा, नक्कीच फायदा होईल

Car Loan घेताना या गोष्टी लक्षात ठेवा, नक्कीच फायदा होईल

कार खरेदी करण्यापूर्वी त्याचे बजेट ठरवा. तुम्हाला कोणती गाडी घ्यायची आहे हे देखील ठरवा. कार खरेदी करण्यापूर्वी सेकंडरी खर्चाची देखील माहिती ठेवा.

 • Share this:
  मुंबई, 7 नोव्हेंबर : सध्या सणासुदीचा काळ (Festive Season) आहे त्यामुळे गाड्यांची विक्री वाढू लागली आहे. बँकांच्या कार लोन (Car Loan) पोर्टफोलिओमध्येही सुधारणा होऊ लागल्या आहेत. जर तुम्हीही कार खरेदी करण्यासाठी कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. तुम्हाला सहज कर्ज घ्यायचे असेल किंवा तोटा टाळायचा असेल तर काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे. सहज आणि स्वस्त कार लोन कसे मिळवायचे याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 1. कर्ज घेण्यापूर्वी बजेट तयार करा कार खरेदी करण्यापूर्वी त्याचे बजेट ठरवा. तुम्हाला कोणती गाडी घ्यायची आहे हे देखील ठरवा. कार खरेदी करण्यापूर्वी लोक सेकंडरी खर्चाचा विचार करत नाहीत. जसं की कार विमा (Car Insurance), पेट्रोल-डिझेल खर्च, दुरुस्ती खर्च, इत्यादी मोजत नाहीत, असे उद्योग तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांचा खर्च वाढतो. त्यामुळे हा खर्च देखील लक्षात ठेवा. 2. चांगला क्रेडिट स्कोअर राखणे महत्त्वाचे केवळ कार कर्जच नाही तर कोणत्याही प्रकारचे कर्ज घेण्यासाठी चांगला क्रेडिट स्कोअर (Credit Score) आवश्यक आहे. चांगला क्रेडिट स्कोअर तुम्हाला स्वस्त आणि सुलभ कर्ज देऊ शकतो. क्रेडिट कार्डची थकबाकी आणि इतर कर्जांची वेळेवर परतफेड केल्याने तुमच्या क्रेडिट स्कोअरमध्ये भर पडते. त्यामुळे मजबूत क्रेडिट स्कोअर राखणे महत्त्वाचे आहे. Zero Down Payment मध्ये इथे मिळतेय Maruti Swift, पाहा फीचर्स आणि ऑफर 3. कोणती कार खरेदी करायची ते ठरवा गाड्या फार वेळा विकत घेतल्या जात नाहीत. त्यामुळे खरेदी करण्यापूर्वी, तुमच्यासाठी सर्वोत्तम डील कोठे उपलब्ध आहे ते ठरवा. ग्राहकाने त्याच्या गरजेनुसार कारची निवड करावी, असे तज्ज्ञांचे मत आहे. खूप महाग आणि लोकप्रिय कार नाही, तुम्ही तुमच्या गरजेची कार निवडावी. 4. डाउनपेमेंट जास्त ठेवण्याचा प्रयत्न करा कार खरेदी करताना डाउनपेमेंट जितके जास्त असेल तितका तुमचा EMI भार कमी होईल. मोठ्या डाउनपेमेंटमुळे कर्जाची मुद्दल आणि व्याज दोन्ही कमी होईल. मूळ रक्कम जितकी कमी असेल तितका कमी EMI तुम्हाला कार कर्जावर भरावा लागेल. 5. कर्जाचा कालावधी कमी ठेवा साधारणपणे बँका कार कर्जाचा कालावधी जास्त ठेवण्याचा प्रयत्न करतात. यामुळे तुमचा ईएमआय कमी होईल, असे बँकांचे म्हणणे आहे. परंतु लक्षात ठेवा की ईएमआय कमी असला तरीही, तुम्ही दीर्घ कालावधीसाठी कारचे कर्ज फेडून बँकेला अधिक पैसे भरता. कर्जाचा कालावधी जितका कमी असेल, तितके कमी तुम्हाला कर्जावरील मुद्दल आणि व्याज घटक दोन्ही भरावे लागतील. केवळ 27000 रुपयांत खरेदी करा Honda Activa 125, पाहा काय आहे ऑफर 6. वेळेवर EMI भरा कर्ज घेतल्यानंतर वेळेवर EMI भरण्याची जबाबदारी तुमची आहे. यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर तर सुधारेलच पण ग्राहक म्हणून बँकेशी तुमचे नातेही सुधारेल. ग्राहकांनी कर्जाच्या बाबतीत शिस्तबद्ध दृष्टीकोन अवलंबला पाहिजे, असे तज्ज्ञांचे मत आहे. जितक्या लवकर कर्जमुक्त व्हाल तितके चांगले.
  Published by:Pravin Wakchoure
  First published: