मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Mutual Fund मध्ये गुंतवणूक करताना 'या' गोष्टींवर लक्ष द्या, नक्कीच जास्त रिटर्न्स मिळतील

Mutual Fund मध्ये गुंतवणूक करताना 'या' गोष्टींवर लक्ष द्या, नक्कीच जास्त रिटर्न्स मिळतील

योग्य पोर्टफोलिओचा नियम असा आहे की गुंतवणूक करण्यापूर्वी एखाद्याने गुंतवणुकीचा उद्देश आणि कालमर्यादा ठरवली पाहिजे. गुंतवणुकीची मर्यादा जितकी जास्त असेल तितके इक्विटी फंडातील वाटप जास्त असेल आणि परतावा चांगला मिळेल.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 4 डिसेंबर : म्युच्युअल फंड (Mutual Fund) नक्कीच चांगला परतावा देतात, परंतु बाजाराच्या अधीन असल्यामुळे जोखीम पूर्ण राहते. तुम्ही तुमचा गुंतवणुकीचा पोर्टफोलिओ (Mutual Fund Portfolio) वैविध्यपूर्ण ठेवल्यास, तुम्ही कमी तोट्यात अधिक नफा मिळवू शकाल. म्युच्युअल फंड पोर्टफोलिओमध्ये, तुमची गुंतवणूक एकाच ठिकाणी नसून अनेक वेगवेगळ्या फंडांमध्ये असावी म्हणजेच पोर्टफोलिओ वैविध्यपूर्ण असावा.

योग्य पोर्टफोलिओचा नियम असा आहे की गुंतवणूक करण्यापूर्वी एखाद्याने गुंतवणुकीचा उद्देश आणि कालमर्यादा ठरवली पाहिजे. गुंतवणुकीची मर्यादा जितकी जास्त असेल तितके इक्विटी फंडातील वाटप जास्त असेल आणि परतावा चांगला मिळेल.

जोखीम क्षमतेनुसार गुंतवणूक (Mutual Fund SIP Investment)

बाजारातील सर्व चढ-उतारानंतर, म्युच्युअल फंडातून 15 टक्क्यांपर्यंत परतावा मिळतो आणि हा परतावा तुमच्या पोर्टफोलिओच्या विविधतेवरही अवलंबून असतो. जर तुम्ही जास्त जोखीम घेऊ शकत असाल तर इक्विटी ऍलोकेशन जास्त असू शकते. लक्षात ठेवा, जोखीम जास्त आहे, तर परतावा जास्त आहे. जर तुमची जोखमीची क्षमताकमी असेल, तर इक्विटीमधील गुंतवणूक कमी करावी लागेल. येथे तुम्ही जास्त परताव्याची अपेक्षा करू शकत नाही. मग डेट फंडात गुंतवणूक करणे तुमच्यासाठी चांगले राहील.

पेनी स्टॉकचा धमाका! 2 रुपयांचा स्टॉक 74 रुपयांवर, सहा महिन्यात 1 लाख बनले 34 लाख

गुंतवणूक करण्यापूर्वी अभ्यास करा (Investment Tips)

म्युच्युअल फंडात कोणी काय सांगितले किंवा ऐकले याच्या आधारे गुंतवणूक करू नका. गुंतवणूक करण्यापूर्वी फंड हाऊसच्या परताव्याच्या हिस्ट्रीचा अभ्यास करुन खात्री करा. परताव्याच्या केवळ एक-दोन वर्षांची माहिती नाही, तर सुमारे दहा वर्षांची नोंद पाहिली पाहिजे. तुम्हाला फंड हाउसच्या व्यवस्थापकांबद्दल देखील माहिती असणे आवश्यक आहे.

Business Idea : रेल्वेसोबत काम करुन महिन्याला हजारो रुपये कमावण्याची संधी, काय करावं लागले

म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ तयार करा (Mutual Fund Portfolio)

इक्विटी आणि डेट फंडांचा वेगळा पोर्टफोलिओ तयार करा. डेट पोर्टफोलिओमध्ये व्याजदर जोखीम आणि क्रेडिट जोखीम याची काळजी घ्यावी लागेल. व्याजदरातील बदल डेट पोर्टफोलिओच्या परताव्यावर परिणाम करू शकतात. तुम्ही डेट फंडात गुंतवणूक करत असाल तर अल्प मुदतीसाठी गुंतवणूक करा. व्याजदरातील बदल दीर्घकालीन गुंतवणुकीवर परिणाम करतात.

First published:

Tags: Investment, Money, Mutual Funds