Home /News /money /

Growth की Dividend Mutual Fund कोणता पर्याय ठरेल फायदेशीर? वाचा डिटेल्स

Growth की Dividend Mutual Fund कोणता पर्याय ठरेल फायदेशीर? वाचा डिटेल्स

डेविडंट (Devident) आणि ग्रोथ (Growth) या दोन म्युच्युअल फंड पर्यायांपैकी (Growth vs Dividend Mutual Fund) कोणते पर्याय अधिक चांगले असतील, याबाबत संदिग्धता कायम आहे.

    मुंबई, 8 फेब्रुवारी : म्युच्युअल फंड (Mutual Fund) सध्याच्या घडीला गुंतवणूकदारांसाठी सर्वात वेगाने वाढणारा पर्याय बनत आहे. यामध्ये भरपूर पर्याय असल्याने गुंतवणूकदार इच्छित ध्येयासाठी म्युच्युअल फंड निवडू शकतात. मात्र त्यांच्यासाठी डेविडंट (Devident) आणि ग्रोथ (Growth) या दोन म्युच्युअल फंड पर्यायांपैकी (Growth vs Dividend Mutual Fund) कोणते पर्याय अधिक चांगले असतील, याबाबत संदिग्धता कायम आहे. डेविडंट म्युच्युअल फंडामध्ये, फंड मॅनेजर त्यावरील परतावा गुंतवणूकदारांमध्ये निश्चित अंतराने वितरीत करतो. हे दररोज, मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक असू शकते. याउलट, वाढीच्या पर्यायांमध्ये, म्युच्युअल फंडावरील परतावा पुन्हा गुंतवला जातो आणि ही प्रक्रिया योजनेतून पैसे काढेपर्यंत चालू राहते. गुंतवणूकदार त्यांच्या सोयीनुसार आणि गरजेनुसार दोन पर्यायांपैकी निवडू शकतात. डेविंडट म्युच्युअल फंडाचे फायदे आणि तोटे नावाप्रमाणेच, या पर्यायामध्ये, गुंतवणूकदाराला निश्चित वेळी डेविडंट दिला जातो. अशा परिस्थितीत त्याच्या हातात सतत पैशांचा ओघ सुरू असतो, पण दीर्घकाळात त्याच्याकडे मोठा निधी नसतो. या पर्यायामुळे तुम्हाला तात्काळ आर्थिक मदत मिळते, परंतु याद्वारे दीर्घकालीन टार्गेट गाठता येत नाही. शेअर बाजारात अस्थिरतेदरम्यान ब्रोकरेज फर्मची काही शेअर्सची शिफारस, चेक करा टार्गेट प्राईज ग्रोथ ऑप्शनचे फायदे काय आहेत? या म्युच्युअल फंड पर्यायांतर्गत मिळालेला परतावा पुन्हा गुंतवला जातो. यामध्ये गुंतवणूकदार जोपर्यंत योजनेतून पैसे काढत नाही तोपर्यंत त्याला व्याज दिले जात नाही. मात्र परताव्याची पुनर्गुंतवणूक केल्याने दीर्घकाळात मोठा निधी तयार होतो आणि चक्रवाढ व्याजामुळे एकूण परताव्यातही भर पडते. कोणता पर्याय कोणासाठी चांगला? तुमच्याकडे कमाईचे कोणतेही साधन नसेल किंवा निश्चित उत्पन्न मिळत नसेल, तर तुम्ही डेविडंटचा पर्याय निवडावा. निवृत्त व्यक्ती ज्याला दैनंदिन खर्चासाठी पैशांची गरज असते त्यांनीही डेविडंटचा पर्याय निवडला पाहिजे. याउलट, जर तुमच्याकडे दीर्घकालीन ध्येय पूर्ण करायचे असेल आणि तुम्ही तरुण किंवा अविवाहित असाल, तर म्युच्युअल फंड ग्रोथचा पर्याय हा उत्तम पर्याय असेल. Adani Wilmar चे शेअर साधारण लिस्टिंगनंतर मजबूत स्थितीत, गुंतवणूकदारांना आता काय करावं? दोन्ही पर्यायांवर कर किती लागणार? तुम्हाला डेविडंटचा पर्याय निवडून मिळणाऱ्या परताव्यावर तुम्हाला डेविडंट डिस्ट्रिब्युशन टॅक्स (DDT) भरावा लागेल. अशा परिस्थितीत, जे गुंतवणूकदार 20 किंवा 30 टक्क्यांच्या हायर टॅक्स ब्रॅकेटमध्ये येतात, त्यांच्यासाठी हा पर्याय किफायतशीर ठरेल. कारण DDT त्यांच्या स्लॅबपेक्षा कमी आहे. याउलट, ग्रोथ पर्याय निवडणाऱ्या गुंतवणूकदारांना 12 महिन्यांपूर्वी इक्विटी फंडातून काढलेल्या रकमेवर 15 टक्के शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स आणि त्यानंतर 1 लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे काढण्यावर 10 टक्के लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागू होईल. जर हा डेट फंड असेल तर 36 महिन्यांपूर्वी पैसे काढल्यास स्लॅबनुसार कर आकारला जाईल. त्यानंतर, पैसे काढल्यास 20 टक्के दराने दीर्घकालीन भांडवली नफा कर लागू होईल.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Investment, Money, Mutual Funds

    पुढील बातम्या